हा मराठी साहित्य, कविता, कथा, ललित लेख आणि सामाजिक विषयांवरील विचारमंथन यांसाठी एक उत्कृष्ट मंच आहे. येथे तुम्हाला भावस्पर्शी प्रेमकथा, प्रेरणादायी लेख, राजकीय विश्लेषण, तंत्रज्ञानविषयक माहिती आणि साहित्यिक चर्चांचे वैविध्यपूर्ण लेखन वाचायला मिळेल. मराठी भाषा आणि संस्कृती जोपासण्याचा आमचा प्रयत्न असून, नवोदित लेखकांसाठी हे व्यासपीठ खुले आहे. नवीन साहित्य वाचण्यासाठी आणि तुमच्या प्रतिक्रिया द्यायला आजच भेट द्या!
मराठी ब्लॉग, कथा आणि कविता, मराठी साहित्य, ललित लेख, प्रेरणादायी लेख,मराठी वेबसाईट
काही माणसं आपल्याला भेटलेली नसतात.पाहिलेली ही नसतात तरी ते काळजात खोल तळाशी कुठतरी रुतलेली असतात. नकळत रुजलेली असतात.त्यांच आपलं एक अनोखं नातं नकळतं तयार होतं.त्या नात्याला आपण नावं नाही देऊ शकतं पण ते असतं उत्कटं आणि ओतप्रोत प्रेमात चिंबलेले...आपल्या मनाशी घट्ट गुंफले गेलेले. नात्यांच्या कृत्रिम फ्रेम मध्ये आपण त्याला बंदिस्त नाही करू शकतं. फ्रेमचं नाही करू शकलो की त्याचा शो पीसं करणं तर अशक्यच असतं.तसंच एक नावं आहे.ना.धो.महानोर.मनाच्या तळाशी एक अनोखं नातं कोरले गेलेले.
कविता गाणी वाचू लागलो.गुणगुणू लागलो तसं ना.धो.महानोर मनात ठसतं गेले.शाळेतल्या पुस्तकातील कवितेतून ते सर्व प्रथम भेटतं गेले.निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य ते उलगडत गेले.सौंदर्याचे पण पदर असतात का? अलवार ते फेडतं गेले की रूपाचं चांदणं पसरतं जाणारे? महानोरच्या शब्दांनी भारावून टाकलं होतं आमचं तारूणयं...
रान,शिवाराचं अनोख वेडं ते माणसाच्या मनात पेरतं गेले. निसर्ग आणि सौंदर्य.सौंदर्य आणि प्रेम याचं एक नाजुक बंध असतात.मनात आपसुकचं विणले गेलेले.आ
भाळ दाटून आलं की मनभर महानोरांचे शब्द थुईथुई नाचू लागतात.मन रानावनात,शेतात हुंदडतं राहतात.
नभ उतरू आलं
चिंब धरताडं ओलं.
पाऊस..म्हणजे धरती आणि नभाचा प्रणय सोहळाचं की.
या नभाने या भुईला दान द्यावे.
या मातीतून चैतन्य गावे.
पाऊस पडू लागला की पावसानं चिंब ओली रान...त्यांची.गाणी आठवतं राहतात.
दूरच्या रानांत,केळीच्या बनातं
हळदीचे उन्हं कोवळे....
हे शब्द माणसाला ठार रानवेडं करतात.
चिंब भिजलेली प्रिया...आणि झिमझिमणारा पाऊस... प्रणय धूंद मनात महानोरचे शब्द अलवार मोरपीसासारखे फिरत राहतात.शब्दांना पण स्पर्श असतो का? नाहीतर महानोरचं शब्द कानावर आदळतो राहिले की अंग भर शहारे कशाला उमटतं राहिले असते.
पावसाप्रमाणेचं उत्कटतेच्या डोहात डुंबत आलेली प्रिया आठवतं राहते.ओढ,हुरहूर ही निसर्गाच्या कणाकणात भेटतं राहते.इतके आपले असणारे शब्दं हा कवी कसं काय लिहू शकतो? असा भाबडा प्रश्न आपल्याला आपसुकचं पडतं राहतो.
शब्द काळजातून कागदावर उमटतं गेले की त्याची जिवंत कविता तयार होते. तिचं तर मनाचा ठाव घेते.आज ही रानांत गेलं की महानोर चे शब्द मनात घोळत राहतात. हिरव्यागार रानात, पिकं तरारून आलेल्या शेतात ,उनाड वारा अंगाशी लगट करताना महानोरांचे शब्द मनात तरळले नाहीतर नवलचं म्हणायचं.
मला हे कळतं नाही.माझ्या आण्णाच आणि महानोरचं काय नातं असू शकेल? रानांत गेले की महानोरचे शब्द आठवतात नि शब्द आठवले की फाटक्या कपडयातील तुटक्या झोपडीतील माझे आण्णा...!! रानावनात जातं गेलेल्या माणसाचं दु:ख वेदना त्यांचे शब्द नक्कीचं प्रसवत असतील.
या रानांत गुंतलेले प्राण माझे...
तुटकी झ़ोपडी काळीज माझे.
त्यांच्या झोपडीचे नव्हे तर काळजाचे लक्तरे लोंबकळत आहे असे भास होतात. शेतक-याचं जीवन किती कष्टप्रद असलं तरी महानोरच्या शब्दांत त्याची एक वेगळीच श्रीमंती आपणास अनुभवायला मिळते.
माणसाच्या मनात शब्द असे इतकं खरं वाटू शकेल असं साम्राज्य उभे करतात?शब्दांना पण एक अनोखं ऐश्वर्य असतं. दूरच्या रानांत,केळीच्या बनात... गर्द हिरव्या रानात..हे गाणं ऐकलं आणि रानाची ओढं निर्माण झाली नाही असा माणूस विरळच.
रान,शेती,शेतकरी आणि त्यांच्या वेदनांना ते शब्द देत राहिले. काळीज अंथरत राहिले.शब्दगंधेला बाहूत घेण्यासाठी तरसणारा हा प्रेमी काळाच्या कुशीत कायमचा विसावला.
हे पटतं नाही.रुचतं नाही. मरणं कुणाला टाळता येत नाही पण असं अचानक त्यांना आपल्यातून असं घेऊन जाणं मनाला चटका देणारं आहे.आता ते या जगात नसतील पण त्यांचे शब्द...कायम आपलं काळीज टोकरीत राहतील....जखमचं फक्त भळभळतात असं नाही.आठवणीचं पण भळभळ असतेंच की...अनावरं.
सध्या महाराष्ट्र गाजतो आहे एकाच नावानं.गौतमी पाटील.सबसे कातिल गौतमी पाटील.सोशल मीडियावर लोकांना सदैव काहीतरी चघळयाला हवं असतं.काही ना काही गाजणारचं असतं.चघळलं जाणारचं असतं.त्यात गौतमी पाटीलची लग गयी लाॅटरी...!!! तिचं नाव आणि तिचे स्टेज शो.प्रचंड व्हायरलं होत आहेत.तिच्या डान्स शोला अक्षरशःउधाण आलं आहे.सोशल मिडीयावर असंख्य रिलस् आणि शार्ट व्हिडिओने धुमाकूळ घातलेला असतो.रीलस्चा तर नुसता पाऊसच पडतं असतो ना?गौतमी पाटीलनं तर कहरचं केला आहे.(गौतमी पाटील हे नुसतं नाव या महाराष्ट्राचा किती जीबी डाटा खर्च करत असेल? मला एक पडलेला भाबडा प्रश्न.) या महाराष्ट्रातील तरूणं मुलं इतकी कलासक्त असतील,इतकी कलारसिक असतील असं कधीचं वाटलं नव्हतं.तरूणाई कलेच्या बाबतीत उदासीन होत आहे असं म्हटलं जातं. तसाच सूर सा-यांचा होता.गौतमी पाटीलच्या शोजस्ना रेकार्ड ब्रेक गर्दी होते आहे याचं कारणं काय आहे?जे तरूणाईला हवं तेचं तर ती देते आहे ना? इंदूरीकराच्या किर्तनाला सुध्दा तरूणांची गर्दी होत असे. तरूण श्रोते त्यांनी खेचून घेतले होते.तरूणाईला जे हवं ते मिळालं की ती उसळतचं असते.सध्या तरी गौतमी पाटलाच्या नावाचं तुफान आलं आहे.गौतमी महाराष्ट्रातील तरूणांची दिलं की धडकन झाली आहे.महाराष्ट्राच्या तमाम ह्लदयावर तिनं कब्जा केला आहेच.तरूणाईच्या म्हणा किंवा रसिकांच्या म्हणा.दिलावर कुणी तरी कब्जा करणारंच असतं ना? असल्या ललना त्यावर विराजमान होणारचं असतात.काल दुसरी कुणी होती.आज गौतमी आहे.उदया तिसरी कुणी असेल. हिरो आणि हिरोनीला समाज माध्यमांवर कमी नाही. नुसता ऊत आलाय.चार आठ दिवसं इथल्या तरुणाईला थिरकायला लावलं की दुसरा चेहरा येणारं असतो.इथं व्हरायटीजला कमी नाही. भरपूर पर्याय उपलब्ध असतात.गौतमी पाटील नुसते नाचते का ? नाही .ती फक्त नाचत नाही.ती नाचवते आहे.ठेका धरायला लावते आहे.सक्रिय सहभागी करते आहे प्रेक्षकांना.कदाचित हेच गौतमी पाटीलच्या रेकार्ड ब्रेक शोचं कारणं असू शकेल.
गौतमी पाटीलच्या शो ला लावणी म्हणावी का नाही?अनेक लावणी सम्राज्ञीच्या मते ती लावणी सादर करत नाही.तिच्या डान्सला लावणी म्हणता येत नाही.ते कॅफे टाईप डान्स आहे.ती लावणी डान्सर नाही तर बार डान्सर आहे.तुम्ही काय म्हणता किंवा काय म्हणत नाहीत याचं तिच्या चाहत्यांना काही देणं घेणं नाही.साखरेला गूळ म्हटलं काय किंवा खडीसाखर म्हटलं काय ? चवीत काय फरक पडणार? तसचं हे. गौतमी पाटीलचे प्रेक्षक हे काय लोक साहित्याचे अभ्यासक किंवा समीक्षक नाहीत.व्याख्या पाठ करून आपली अभिरूची ठरवायला.
लावणी ही सभ्य व सज्जन माणसाची रूची आज ही समजली जातं नाही.गावकुसा बाहेरचं लावणीच्या फडाला जागा होती.तमाश्याच्या प्रेक्षकाला आज ही सज्जन आणि सभ्य समजलं जातचं नाही.आंबटशौकिनचं लेबलं त्यांना आज ही चिकटवल जातचं की.बैठकीची लावणी चोरूनचं पाहिली जाते की.(पिकल्या पांनाचा देठ की हो हिरवा... असेल किंवा राजसा...नटले तुमच्यासाठी असेल. कारभारी दमानं....या बैठकीच्या लावण्या स्टेजवर साज-या केल्या त्या सुरेखा पुणेकरांनी तेव्हा लोकांनी तुफान गर्दी केली होती. सुरेखा पुणेकराचे पण शो असेच लोकांनी हाऊस फुल्ल केले होते.गौतमी पाटीलच्या शोलाच गर्दी होते आहे असं नाही.सुरेखा पुणेकर यांचे पण लावणीचा कार्यक्रम रेकार्ड ब्रेक होतं असतं.नटरंगी नार उडवी लावणीचा बार.गेल्या दोन दशकात अक्षरशःधुमाकूळ घातला होता.लावणीच्या सादरीकरणचं व्याकरण कुठं असली गर्दी समजून घेत असते का?आता अदा आणि इशारे यात काय फरक असेल बरं?इशारे चावट आणि अदा साजूक असतात काय?डोळा मारीत लावण्या सादर करताना अनेक नृत्यं सम्राज्ञी आपण पाहतोच की.इशारे नाहीत.खाणाखुणा नाहीत.चावटं इशारे नाहीत अशी सपक लावणी कोण बघेल बरं? लावणीचा पण एक ठसका असतो.ठसकेदार लावणी हवी असते सर्वांना.या महाराष्ट्रात राखी सावंतच्या पण तसल्या डान्सने एकेकाळी धुमाकूळ घातला होता.नाचणारं कुणी असेल तर लोक पाहणारचं.कपडे काढून जरी कुणी नाचलं तरी लोक डोळा मटकावतं ,जिभल्या चाटतं ते पाहणारचं.नकटी राखी सावंत सुध्दा लोकांनी चवीनं पाहिलीच की.महाराष्ट्रात सपना चौधरीचे ही शो लोक पहतातचं आले आहेतं.गावोगावी ही लोककला केंद्र चालूच आहेत की.त्यात वाजली जाणारी गाणी कसल्या लावणीचा प्रकारात मोडतात? स्टेजवर सादर होणा-या तमाशातून ही टिप टीप बरसा पाणी हे गीत सादर करताना ओलेचिंब ललना पाहण्याचं भाग्य वाटयला आलेले प्रेक्षक ही असतीलचं की.
मराठी गाण्यांनी तर कहर केला आहे.आंटी माझ्या झोपडीत ये. लाडा लाडानं पेललं दारू ,पोरी जरा हातानं दांड धर, तुझी चिमणी उडाली भूरृर.. अशी गाणी आवडणारी लोक असतात.
गौतमी सादर करते ती गाणी सभ्य व चांगली नसतील ही पण महाराष्ट्र ने डोक्यावर घेतलेली तर आहेत ना? गाण्यात काहीच अश्लीलता नसते का?फक्त तिच्या डान्सवरचं का आक्षेप आहेत.तिचं सादरीकरण जरूर साजूक नाही.सभ्यतेच्या कपडयात गुंडाळलेली लावणी कुठं अशी गर्दी करून पाहिली जाते असते का? तमशाला ही आंबट शोकीनांची गर्दी असते.तमशाचे द्विर्थी संवाद असेल किंवा एकंदरीत ते अंगविक्षेप असतील हे अश्लील नसतात का? नान्व्हेज जोक तर जागरण गोंधळात ही असतात की.सहकुटुंब ते पाहिले जातात.
हे सारं सांगायचं म्हणजे गौतमीच्या डान्सला समर्थन करायचं नाही.तिला अजून पाणी अंगावर ओतून ओलेती डान्स करायला भाग पाडायचे नाही. गौतमी पाटीलला होणारा विरोध हा पारंपारिकच आहे.त्यात नवीन काही घडतं नाही.आपण तरी कशाला टेन्शन घ्यायचं ?हे सार जुनचं आहे.
गौतमीचं काय कुणी तरी नाचतं आहे म्हणून तिला पाहयाला लोक येणारंचं असतात. व्यवसायीक गरज म्हणून ती जास्त बोल्ड होत आहे.ती तशी नाचते म्हणून लोक गर्दी करतात.डान्स शो करणारे कलाकार काय कमी नाहीत? गौतमीच्या शोलाच का गर्दी होते आहे?नाचणारं कुणी ही असेल तर ते पाहिले जाणारचं आहे... तुम्ही मैदानात पाहून नाही दिले तर...लोक चोरून पाहतील.नाद असतो तो.असा तसा जातं नसतो.
ग़ौतमी पाटीलची लोकप्रियत्ता कायम अशीच राहणार नाही.दुसरी एखादी फटाकडी पोरगी वेगळं नाचायला लागली की हिचा बहर ओसरेल. लोकं तिला डोक्यावर घेतील. संस्कृती च्या गप्पा वगैरे मारल्या जातील. हे असंच चालू असतं.
ही एक प्रेम कविता आहे.अतोनात प्रेम असलेली प्रिया
असता हे गावच सोडून जात आहे.शेवटचं काही बोलता नाही आलं.दाटलेल्या अनेक भावनांना सहज अाणि अप्रतिम शब्दांत पकडलं.कवी परशुराम सोंडगे यांनी.
तुझ चांदण पाऊल या परशुराम सोंडगे यांच्या प्रेम कविता संग्रहातील काही चारोळया
मनातून पाझरणारा श्रंगार रस
खास अापल्या प्रिये/प्रियासाठी
शेअर करा
परशुराम सोंडगे यांच्याच आवाजात