पोस्ट्स

सप्टेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ह्रदय गुंतता ह्रदय हे.(भाग 4)

इमेज
  रात्रीचे दहा तरी वाजलं असतील. तृप्ती नि निलेश मार्केटमधून घरी परतत होते.आज निलेशचा मूड ही चांगला होता. बराच वेळ फिरल्यामुळे एक थकवा आला होता.एका हॉटेल जवळ त्यानं गाडी पार्क केली. ते हॉटेलात शिरले. जेवायचं की नुसतं कॉफी घ्यायचं हे त्यांनी काहीच ठरवलं नव्हतं. तसं बाहेर येण्याचं काही प्लॅन नवहता.दोघ ही गप्पात मग्न होते. समोरच्या टेबला वर एक कप्पल होतं. अर्थात त्यांच्याकडं याचं लक्ष नव्हतं.ती बाई सारखं तयांच्याकडं पहात होती. तृप्तीचं लक्ष ही गेलं पणतिनं ते इग्नोर केलं. ती दोघाकंड पहात आहे की एकटया निलेशकडं पहात आहे याचा अंदाजला घ्यावासा वाटला.तिच्या समोर जो माणसू बसला होता. तो नक्की कोण असावा तिचा? नवरा की वडील? समोर छान्‍ अक्क्ल पडलं होतं. देह कसा बसा खूर्चीत मावला होता. इतकं तंतोतंत तो कसा काय खूर्चीत बसू शकला असेल? तृप्तीला प्रश्न पडला.              जास्त वेळ त्याच्या कडं पाहण्याचा प्रयत्न तृप्ती करणार नव्हती. ते बावळट पुन्हा पहात बसायचं आपल्याकडं. आपल्या बायका, पोरी बरोबर आसल्या तरी बरीचं थोराडं माणसं दुस-याच्य बायका...

ह्रदय गुंतता हे (भाग 3)

इमेज
  तृप्ती हॉस्पीटलला पोहचली. रक्तदान ही केलं. खर तर तिला लगेच परत फिरायचं होतं पण थोडसं थकल्यासारखं वाटतं होतं. डॉक्टरंनी तिला अराम करायाला सांगितलं.तृप्तीला बराच वेळ तिथे बसावं लागणारं होतं. घर काही हाकेच्या जवळ असले तरी लगेच जाता येणार नव्हतं.श्रेया होतीच तिच्या सोबत. चहा, बिस्कीटं ही घेतले.शांत थोडी बेडवर पडली होती. बेडवर पडून भिरभिरणा-या फॅनकडं ती एक टक पहात होती.भीतीचं सावटं होतंच चेह-यावर. श्रेया आली.तिचंत हात हातात घेत बोलली,“तृप्ती, थँक्सं.तू आलीस.नाहीतर केवढं टेन्शन आलं होतं मला.” तृप्तीनं बोलण्यापेक्षा हासणं पंसत केलं.ती छानसं हासली “नाही म्हणालीसं नि परत आली?” श्रेयाला  स्वत:चं झालेलं कन्फूजन दूर करायचं होतं. अजून एक वर्षं ही झालं नव्हतं तृप्तीच्या लन्नाला. एवढं का घाबरते ती निलेशला. आपल्याला लग्नाला दोन वर्ष झालं तरी विवेकची अशी भिती नाही वाटतं. “आलेयं मी. न येणं मला आवडलं नसतं नि आलेलं निलेशला आवडणार नाही.” “निलेशला बोलू का मी? तू चांगलचं काम केलं आहे. एका माणसाला जीवंत राहण्यासाठी मदत केलीस.” “शपथ.  हे तू असं काही करणार नाहीस.” तृप्तीनं तिच्या तोंडाला हा...

गुंतता ह्रदय हे भाग2)

इमेज
  तृप्ती जरी निलेशच्या मिठीत आसली तरी तिच्या मनात मात्रं त्याचेचं विचार येत होते.खरतरं ती त्याला बोलली पण नव्हती.कोण होता तो?कुठं राहतो तो? त्याचं नाव काय? तिला काहीचं माहित नव्हतं. माहित असण्याचं कारण ही नव्हतं. ती त्याला पहील्यांदाचं पहात होती. त्याचं नाव काय असू शकेल? याचा अंदाज ती बांधू लागली. खरतर तसा अंदाज काढणं शक्य नसतं पण त्याचं काय नाव असावं अशी कल्पनाच ती करू लागली.अश्या आकर्षंक मुलांची काय नाव असतात? तिला अनेक नावं आठवू लागली.अर्थात अश्या आकर्षंक पोरांचीच.तिला इंम्प्रेस केलेल्या पोरांची. ती तिची आवडती नावं त्याला चिकटवून पाहू लागली.          तो तिच्याकडं आकर्षीत झालाय.हे तिच्या ही लक्षात आलं होतं.ती पण त्याच्याकडं खेचली जात होती. हे सारं नकळतच होतं होतं. आपलं मन सारं बंधनं तोडून त्याच्या कडं ओढलं जातं हे तिला ही कळतं होतं.तिचं वागणं ही सादास प्रतिसाद देणं असचं होतं. शाळेत असतानी अश्या प्रकाराला मुलं मुली लाईन मारणे म्हणायचे.तो लाईन मारत होता नि ती त्याला लाईन देत होती.लाईन क्लेअर झाल्यावर तो बेफीकर वागणं साहजिकचं होतं.त्याचं धाडसं वाढलं ह...

गुंतता ह्रदय हे भाग 1

इमेज
 संध्याकाळचं आकरा वाजलं होतं.कॉलनीतलं सारी सामसूम झाली होती.रस्त्यावरले बल्बं ढणाढणा जळत होतं.निलेशनं गाडी उभी केली. झटक्यात गेट उघडलं. बाईक आत मध्ये घेतली. बाईक पार्क केली. पाय आपटत आपटत चालत पाय-या चढून वर गेला.असं वर जाण्यासाठी तो लिप्टं ही वापरू शकला आसता. तो नेहमी वापर करायचा ही लिप्टचा पण आज असं काहीचं केलं नाही.तृप्ती नुसती उभी राहिली. सारं त्याचं पहात होती. भितीनं तिचं अंग थरथर होतं.त्याच्या मागं चालत जावं की लिप्टं वापरावी?तिला हा प्रश्न पडला. काही क्षणच. ती मुकाटयाने पाय-याच चढू लागली.              अजून ही निलेश रागरागनचं पहात होता पण तिची काय चूक होती? एखादं आपल्या कडं पहात असेल तर स्त्री काय करू शकते? लग्नासारख्या समारंभात तर अश्या गोष्टी घडतचं असतात. आता ते बावटं सारखचं आपल्याकडं पहात होतं.त्याला ती काय करू शकत होती.असे पागल तर जळी स्थळी काष्ठी पाषाणी भेटतचं असतात.मुलीसाठी हे नक्कीचं नवीन नव्हतं.निलेशला एवढं एक्साईड होण्यासारख कुठं काय झालं होतं? तो बावळटं  पहात असताना त्याच्याकडं तिचं लक्ष गेल होतं.सारखं सारखंच लक्ष गेलं. त्याचं...