पोस्ट्स

पुराण कथा लेबलसह पोस्ट दाखवत आहे

राधा आणि भागवत पुराण: अप्रत्यक्ष उल्लेखाचे गूढ

इमेज
राधा आणि भागवत पुराण: अप्रत्यक्ष उल्लेखाचे गूढ राधा कृष्ण हिंदू धर्मात महत्वाची देवी देवता आहेत.राधा व कृष्ण यांच प्रेम अतुट होतं.तसं मानलं जात. अनेक ठिकाणी राधाकृष्णाची मंदिरे आहेत  अनेक उत्सव ही राधा व कृष्ण या नावाने साजरे करतात  राधा तत्व हे फार महत्वाचं तत्व आहे असं मानलं जातं. कृष्णाच्या सदैव ह्रदयात वास असलेली कोण असेल तर ती आहे राधा? श्रीकृष्ण चरित्र हे राधेशिवाय पूर्ण कसे होऊ शकत? आपण चरित्र म्हणतो पण राधेशिवाय कृष्णचं कसा असू शकतो? असे भक्त म्हणतात.मानतात.  इतक सारं असताना ही श्रीकृष्ण चरित्राचा महत्वाचा पौराणिक संदर्भ असलेल्या भागवत ग्रंथात मात्र राधेचा उल्लेख नाही. का? श्रीमद् भागवत पुराणात राधेचे नाव स्पष्टपणे घेतलेले नाही तरीही तिच्या अस्तित्वाची साक्ष पुराणकार साकल्याने देतात.भागवताच्या दशम स्कंधात (१०.३०.२८) गोपिकांच्या मुखातून एक ओळ निघते:  “ अनयाराधितो नूनं भगवान् हरिरीश्वरः”  “ निश्चितच या एका गोपीने भगवान श्रीहरींची पूर्ण आराधना केली आहे, म्हणून ते इतर सर्व सोडून तिच्याकडे एकांतात गेले.”  वैष्णव आचार्य विश्वनाथ चक्रवर्ती, जीव गोस्व...

सत्यवती: एक शापित कुमारी

इमेज
 सत्यवती: एक शापित कुमारी  सत्यवती: एक शापित कुमारी अकाशातून सूर्य सृष्टीवर सोनसळी प्रकाशाचा अभिषेक घालत होता.झाडांच्या पानापानावर ते सोन पिवळ उन्हं सा॔डलं होतं.यमुनेच्या गहि-या खोल प्रवाहाच्या उरावर ते  नाचत होतं.पक्ष्यांचा मंजूळ कुंजरव भवतालात सर्वदूर पसरला होता.यमुना संथ वाहत होती पण त्यात एक लयं होती.दूर पाण्यात कुणी दोन तीन नौका पैलतीरी सोडल्या होत्या. यमुनेच्या शांत निळ्या गहि-या पाण्यावर कुणी तरी ओल्या जलरंगात चित्र रेखाटवं तसं ते सारं विलोभनीय दृश्य दिसतं होतं .सत्यवती-एक- शापित- कुमारी  झाडं वेली बहरली होती.फुलं आपल्या गंधराशी वा-याच्या हवाली करत होते.तो मंद गंध  सर्वत्र दरवळला होता. रानवेली रंगबेरंगी फुलांनी डवरून आल्या होत्या. फुलपाखरं? फुलावर घिरट्या घालत होते.इतक्या शुभवेळी प्रभात समयी महर्षी पराशर मंद पावलं टाकीत किना-याकडे चालत होते.वर बांधलेल्या जटा.टोकदार दाढी.काळी पांढरी. भगवं उत्तरीय पांघरलेले.शुभ्र धवल पितांबर नेसलेले...हातात कमंडलू.लाकडी पादुकाचा टकटक अवाज करत होत्या.लाल गर्द मऊशार माती त्या पवित्र चरणस्पर्शासाठी अतुर  झालेली..!!  ...