पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अभिराम भडकमकर यांची ‘सीता’ कादंबरी: स्त्रीशक्तीचे नवे दर्शन| समिक्षात्मक लेख

इमेज
अभिराम भडकमकर यांची ‘सीता’ कादंबरी: स्त्रीशक्तीचे नवे दर्शन Seeta:Abhiram Bhadkmakar  अभिराम भडकमकर यांची ‘सीता’ ही कादंबरी वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने आणि दीर्घकाळ मनात राहते – लेखकाने रामायणातील सर्वात परिचित, पवित्र आणि बहुधा एकांगी ठरलेल्या पात्राला नव्याने, अधिक सखोल, मानवी आणि जटिल रूपात उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. पारंपरिक कथनात सीता प्रामुख्याने पतिव्रता, दुःखसहनशील, शांत आणि नियतीची बळी म्हणून चित्रित होते. तिचे अस्तित्व बहुतांशी रामाच्या चरित्राच्या, धर्माच्या आणि सामाजिक अपेक्षांच्या चौकटीतच मर्यादित राहते. भडकमकर मात्र तिला विचार करणारी, स्वाभिमानाने उभी राहणारी, कठीण क्षणीही स्वतःचे अस्तित्व आणि आत्मसन्मान जाणणारी स्त्री बनवतात. हा दृष्टिकोनच कादंबरीचे मुख्य आकर्षण आहे आणि तो तिला केवळ पौराणिक पुनर्लेखनापलीकडे नेतो. पात्रचित्रणाची खोली आणि दुहेरीपणा कादंबरीची सर्वात मोठी ताकद म्हणजे सीतेचे पात्रचित्रण. हनुमंताच्या शब्दांतून सुरू होणारे “कणखर करारी स्त्री” हे वर्णन केवळ घोषणा राहत नाही. ते संपूर्ण कथनात सातत्याने टिकून राहते आणि वाचकाला सतत जाणवत राहते. लक्ष्मण मूर्च...

तृष्णा, स्वप्न आणि मानवी विकारांचे महाकाव्य : वि. स. खांडकरांची ‘ययाती’

इमेज
तृष्णा, स्वप्न आणि मानवी विकारांचे महाकाव्य : वि. स. खांडेकरांची ‘ययाती’ ​मराठी साहित्याच्या पटलावर वि. स. खांडेकर यांचे नाव एका दीपस्तंभासारखे आहे. खांडेकरांचे इतर सर्व साहित्य वाचल्यानंतर जेव्हा वाचक ‘ययाती’ या कादंबरीकडे वळतो, तेव्हा त्याला एका गोष्टीची प्रकर्षाने जाणीव होती—लेखकाने आपल्या संपूर्ण आयुष्यातील विचारांचा, जीवनविषयक तत्त्वज्ञानाचा आणि समृद्ध भाषाशैलीचा ‘अर्क’ या एका कादंबरीत ओतला आहे. १९६० चे साहित्य अकादमी पारितोषिक आणि १९७९ चा सर्वोच्च 'ज्ञानपीठ पुरस्कार' मिळवणारी ही कलाकृती आजही वाचकांच्या पसंतीस उतरून 'बेस्ट सेलर' (Best Seller) च्या यादीत अव्वल स्थानी विराजमान आहे. ​  स्वप्नरंजकता की मानवी आशेचा धागा? ​खांडेकरांच्या लेखनावर अनेकदा अशी टीका केली जाती की त्यांनी 'वास्तविक जगण्यापेक्षा' स्वप्न, कल्पना आणि आदर्शांवर जास्त भर दिला. परंतु, माणसाच्या आयुष्याचे मूळ सत्य हे आहे की—स्वप्न आणि आशा हाच माणसाच्या जगण्याचा खरा धागा असतो. ​कठोर वास्तवाच्या दाहकतेत होरपळणाऱ्या माणसाला जेव्हा साहित्यातून एका स्वप्नाळू आणि तात्त्विक जगात नेले जाते, तेव्हा त्या...

नाना,अजून तुम्ही हवे होता?

इमेज
" मृत्यू सदैव माझ्या सोबत असतो.या जगात कुणी बरोबर राहिलं किंवा नाही,शेवटी तो प्रत्येकाला भेटतोच.मृत्यूला टाळू शकेल असं कुणीच नसतं." असं नाना नेहमी म्हणतं. Nana Patekar नाना पाटेकरांनाही शेवटी गाठलं त्यानी. खरतर जीवन हीच एक रंगभूमी असते. विधाता प्रत्येकाला एक भूमिका देतो. प्रत्येक जण वाट्याला आलेली ती भूमिका वठवतो, आपापल्या परीने. कुणी कंजूषी करत नाही. कसूरही करत नाही. जीव ओतून जो तो स्वतःला वठवत राहतो. सिद्ध करत राहतो. Nana Patekar कुणी दखल घेतं; कुणी नाही. एक दिवशी पडदा पडतो. अंक संपतो. काही भूमिका मनात खोलवर रुजत जातात. मनाच्या तळाशी शेवाळत राहतात. काळजाची सलगी असते ना त्यांची? नाना पाहिले चित्रपटात... नाना पाहिले पडद्यावर... नाटकात. नाना कधी भेटले नाहीत, पण फार अप्रूप होतं त्यांचं. Nana Patekar अभिनय असेल. स्पष्ट बोलणं असेल. समाजभान असेल. सामाजिक बांधिलकी असेल. या साऱ्या गोष्टींपेक्षा त्यांचं जगणं व जीवनविषयक वस्तुनिष्ठ दृष्टिकोन मला जास्त भावला होता. दुसऱ्यांचे अश्रू पुसण्याचा छंद जडून घेतला होता त्यांनी. फाटक्या-तुटक्या शेतकऱ्यांच्या डोईवरचं फाटकं आभाळ शिवून देण्याचा विड...