पोस्ट्स

मार्च, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भोंदूबाबा कॅप्टन खरात आणि मूर्ख राजकारणी.

इमेज
भोंदूबाबा कॅप्टन खरात आणि मूर्ख राजकारणी. कॅप्टन्स फाईल पाहिल्यानंतर तुम्हाला राग आला की हसू आलं?का त्या राजकारण्याची कीव आली? का किळस वाटली?  शेवटी घटना घडल्यानंतर आपल्याला काय वाटतयं हे महत्वाचं आहे ना? मला तर जॅम हसू आलंय.काय पागल लोक असतात हे ? काय थाटमाट असतो राजकरणी लोकांच? काय रूबाब असतात त्यांचे? तुम्ही बघितला ना? भोंदू बाबाच्या मागे कश्या शेपट्या हालवत फिरत आहेत हे लोक?   हे आडाणी आहेत का? हे शिकले नाहीत का? हे उच्चशिक्षित आहेत ना मग यांची अक्कल अशी शेणं  का खाते ?   कुणी माणूस ब्रम्हांडनायक असतो  का? काळी जादू किंवा तंत्रविदया नावाचा काही प्रकार अस्तित्वात असू शकतो का?अंकशास्त्रात पण तो निपुण होता म्हणे..!! तो कृष्णाचा अवतार नि त्याच्याकडे जाणारी प्रत्येक  महिला ही राधा...?? काय भंकसगिरी ही? शाळेत हे सामान्य विज्ञान तर हे शिकले असतील ना? अगदी शाळकरी पोरामध्ये जेवढा वैज्ञानिक  दृष्टिकोन दिसून येतो तेवढा पण यां राजकीय गेंडयांना नसावा का?  थोडी तरी तर्क बुध्दी जागी ठेवा ना? निव्वळ अक्कलच शेण खाल्ल्यासारखं हे कशी वागतात?  त्या...

मृत्यूला जराशी थांबवणारे डाॅ.दिवाकर गुळोजकर

इमेज
मृत्यूला जराशी थांबवणारे डाॅ.दिवाकर गुळोजकर   मरण कुणाला चुकलं नाही.मरणाच्या हजारो वाटा असतात.मृत्यू शेवटी जीवाला गाठतोचं.काही माणसं आसतात एखाद्या जीवाला मृत्यूच्या जबड्यातून सोडवणारे. त्या काळाला पण ठणकावून सांगणारे "जरा थांब रे..!!!"  असतं काही माणसात सामर्थ्य.असेच सामर्थ्य असलेले डाॅक्टर होते दिवाकर गुळोजकर. त्यांच्या निधनाची बातमी ऐकली.अनेक आठवणी उचंबळून आल्या. त्या आठवणी पापण्या ही ओल्या करून गेल्या. 2003 ची घटना आहे.आमच्या आण्णांला म्हणजे वडीलांना त्यांनी मृत्यूच्या दारातून ओढून काढले होते.ठणठणीत बरे ही केले होते.आण्णाला असेच बीड मध्ये एका नामवंत डाॅक्टरच्या हाॅस्पीटल मध्ये आटमीट केलं होतं.ते नामवंत ही होते आणि सिव्हीलमध्ये वैद्यकीय अधिकारी ही होते. आम्ही त्यांच नाव ऐकून त्या हाॅस्पीटल मध्ये गेलेलो.मला भेटलेले ते एक मूर्ख व घंमेडी डाॅक्टर होते.आण्णांच्या तब्येतीत सुधारणा करण्याऐवजी त्यांनी त्यांना बेशुद्ध केले. आण्णा गंभीर झाल्यानंतर तुम्ही त्यांना घेऊन जाऊ शकता असा सल्ला ही दिला.भरमसाठ बील ही हातावर ठेवलं . आण्णा बेशुद्ध झाले असले तरी त्यांचा ताप कमी होत नव्ह...

थांबा , युध्द सुरू आहे..!!

इमेज
Eran war and India   जगात युध्द सुरू आहे.त्याचे  परिणाम जगासोबत  आपल्याला भोगावे लागणार कारण आपण याच जगात राहतो. गॅस,पेट्रोल व डिझेलचा तुटवडा होणारच आहे. सरकार नीट सांगत नाही.जनतेला  विश्वास द्यावा लागतो हे हल्लीच्या सरकारांना माहित नाही.गॅस तुटवडा दाखवून काळा बाजार ही सुरू झाला आहे.साठेबाजी वाढवू लागली. छूपेपणे दर ही वाढले आहेत.सरकार धीर ही देत नाही आणि देत माहिती नाही.अज्ञान भयंकर अश्या भयाला जन्म देते. भारतीय  नागरिकांना भयभीत करण्याचे प्रयत्न ही सुरू आहेत. देशातली जनता घाबरली नाही पाहिजे.या युध्दामुळे होणा--या परिणामाची जाणिव लोकाना द्यायला हवी. त्यासाठी जनतेला व प्रशासनाला सजग करणे आवश्यक आहे  अमेरिका आणि इराणला सोशल मिडीयावर सल्ले  देणे नक्कीच  महत्वाचं नाही.अनेक अंतरराष्ट्रीय राजकारणाचे तज्ञ माध्यमावर  ज्ञान पाजळत आहेत.  सरकार तर वादळात सापडलेल्या शहामृग डोळे बंद करून बसले आहे. आपण डोळे बंद केले की,आपल्या अंगावर  वादळ येणार नाही अश्या मूर्ख शहामृगासारखे  केंद्र सरकार वागते आहे. राज्य सरकारे आपल्या नेत्याच्या टिमकी व...

एका काॅलगर्लची डायरी भाग 7

इमेज
     भाग सातवा. Callgrils Diary एका काॅलगर्लची डायरी भाग -7 “ही तुमची मैत्रीण?” ते फोटो पाहून त्याच्या चेह-यावर आश्चर्याची अनेक चिन्हं उमटले.तो मोठयानं चित्कारला नाही हे काय कमी नव्हतं.ते फोटो त्याच्या ओळखीचं असतील का?त्याला ते फोटो पाहून नक्की काही तरी आठवत होतं. callgril's dairy “ओळखता तुम्ही हिला?”हातातला फोटो त्याच्या पुढे नाचवत त्या मोठया उत्साहाने बोलल्या.त्याला लगेच कळलं.आपलं काही तरी चुकलं.तो जरा चपापला.दात चावले.माणसाच्या मनातलं असं चेह-यावर नकळत उमटून जात. हीची तर डेड बॉडी सापडली ना? नसती झझटं आपल्या मागे लागायची. तो जरा सावध ही झाला होता. “नाही.नाही.मी ओळखत वगैरे नाही पण.” त्यानं स्वत:ला सावरलं.मॅडम त्याच्याकडेचं पहात होता.त्याच्या चेह-यावर उमटणारे भाव त्या अगदी सूक्ष्मपणे टिपत होत्या.त्याला मात्र मॅडमच्या डोळयाशी डोळा भिडता नाही आला. तेवढं धैर्यं त्याच्याकडं नसावं. “पण काय?ओळखीचा नाही पण पाहण्यातला चेहरा वाटतोय का?” “पाहण्यातला नाही.खूपचं स्मार्टं होत्या त्या.यांची डेड बॉडी सापडली का? अरे रे…!! हे नक्कीचं मरायचं वय नव्हतं.मृत्यू फारचं क्रूर असतो, नाही?सुं...