थांबा , युध्द सुरू आहे..!!

Eran war and India
Eran war and India 


 जगात युध्द सुरू आहे.त्याचे  परिणाम जगासोबत  आपल्याला भोगावे लागणार कारण आपण याच जगात राहतो. गॅस,पेट्रोल व डिझेलचा तुटवडा होणारच आहे.

सरकार नीट सांगत नाही.जनतेला  विश्वास द्यावा लागतो हे हल्लीच्या सरकारांना माहित नाही.गॅस तुटवडा दाखवून काळा बाजार ही सुरू झाला आहे.साठेबाजी वाढवू लागली. छूपेपणे दर ही वाढले आहेत.सरकार धीर ही देत नाही आणि देत माहिती नाही.अज्ञान भयंकर अश्या भयाला जन्म देते. भारतीय  नागरिकांना भयभीत करण्याचे प्रयत्न ही सुरू आहेत.

देशातली जनता घाबरली नाही पाहिजे.या युध्दामुळे होणा--या परिणामाची जाणिव लोकाना द्यायला हवी. त्यासाठी जनतेला व प्रशासनाला सजग करणे आवश्यक आहे 

अमेरिका आणि इराणला सोशल मिडीयावर सल्ले  देणे नक्कीच  महत्वाचं नाही.अनेक अंतरराष्ट्रीय राजकारणाचे तज्ञ माध्यमावर  ज्ञान पाजळत आहेत.

 सरकार तर वादळात सापडलेल्या शहामृग डोळे बंद करून बसले आहे. आपण डोळे बंद केले की,आपल्या अंगावर  वादळ येणार नाही अश्या मूर्ख शहामृगासारखे  केंद्र सरकार वागते आहे.

राज्य सरकारे आपल्या नेत्याच्या टिमकी वाजवण्यात गर्क आहेत.

 विरोधी पक्ष काठीचं कोल्हे  करतो आहे. नागरिक घाबरणार नाहीत याची जबाबदारी सर्वांनीच घेतली पाहिजे. नुसते बोंबा मारून काय होणार आहे?

मोदी जर खड्या आवाजात  बोलत असले तरी त्यांच्या चेह-यावर जो ताण दिसतो आहे त्यावरून  स्पष्ट जाणवत आहे. 'वे डरे हुऐ है.'

 ते घाबरले असले तरी त्यांना आपण साथ दिली पाहिजे. राजकरण  करण्याची ही वेळ नाही. सरकारने ही विरोधकासोबत चर्चा केली पाहिजे. विरोधक आणि जनता यांना विश्वास देऊन युध्दांचाया परिणामाला तोंड देण्यासाठी सक्षम बनवले पाहिजे.सजग बनषले पाहिजे. आपण भारतीय नागरिक  वर्ल्ड कप जिंकला आहे याच कैफात आहोत. क्रिकेटचा सामना जिंकणे म्हणजे युध्द जिंकणे नव्हे...!!

विश्व कप जिंकला तो हनुमानाच्या चरणी ठेऊन लीन होणारा कप्तान आपल्याला लाभला आहे हे आपलं दुदैवच आहे. जगात हसं करंन घेतले पटयाने.

या जगाला शांततेत हवी आहे. हिंसा जगाची गरज कधीच असणार नाही पण सध्या जग हिंसेच्या तीव्र  टोकावर आहे.



आता सुविचारांचे रतीब  सांगणं नक्कीचं पुरेस नाही  राष्टांनी जी भूमिका घेतली आहे ती स्पष्ट व रोख ठोक असावी. आपली पण एक परराष्ट्र  व्यवहार  नितीन राहिलीलेली आहे.त्या सुरात सा-यांना बोलावं. सरकारने गप राहयचं.काही पक्षाच्या नेत्याने एका देशाची बाजू घ्यायची. दुस-या पक्षाच्या नेत्यांनी दुस-या देशाची बाजू घ्यायची.असं कसं चालेल? सरकार तर पक्षाची असतात ना? तुमच्या विचार धारा चुलीत घाला. देशाचं परराष्ट्रव्यवहार  नितीन केय आहे? त्याला सा-यांनी प्रामाणिक राहिलं पाहिजे. प्रत्येक  नागरिकाला स्वतंत्र  मत असं शकते पण  देशाने काय करावे हे  देशाच्या धोरणानुसार करावे. या युध्दाच्या काळात भारतीय  नागरिक  फार गोंधळलेला आहे.त्याला काय करावे हेच कळत नाही.खुमनेची क्रूर हत्या झाली. आपण शोक करावा का आनंद साजरा करावा हे कळेना? देशात अंतर्गत  झालेले गोंधळ जागतिक पटलावर उमटणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. सोशल मिडीयावर  नुसता धुमाकूळ घातलेला आहे. आपल्या देशाची व पंतप्रधानाची जगात नाचक्की होते आहे  याचं भान ठेवलं पाहिजे. सरकारने पण ठोस भूमिका स्पष्ट केली पाहिजे. भारत एक लोकशाहीवादी सार्वभौम  राष्ट्र आहे हे जगाला सांगण्यापेक्षा दाखवून  देण्याची  सध्या गरज आहे नि मोठी संधी पण आहे. भारताला हिंदू राष्ट्र  करण्याच्या नादात आपण आपली जागतिक स्तरावर असलेली मूळ ओळख  तर अस्पष्ट करत नाहीत ना?



   भारतात सारं असं घडलं पाहिजे पण तसं होणार नाही. भारतीय राजकारण हे अगदी प्रारंभी पासूनच  घटनेची पायमल्ली करणारे आहे.घटनेशी अप्रामाणिक असणा-या विचारधारा पोसणारे  राजकीय पक्ष आपल्या देशात आहेत. तुम्हाला पटत की नाही पण या देशात घटनेशी  प्रामाणिक  असणा-या  नव्या पक्ष्यांची गरज आहे.

हीच आपल्या देशाची खरी आणि प्राथमिक अनिवार्यता आहे.

         परशुराम सोंडगे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धर्मयोगिनी अहिल्यादेवी- आजच्या पिढीला मूल्यांचा आरसा दाखवणारं पुस्तक

युध्द पेटले आहे – जगण्याचा चंग आणि संघर्षाच्या गर्जना करणा-या माणसांच्या कविता.

एका काॅलगर्लची डायरी - भाग 1