एका काॅलगर्लची डायरी भाग 9
एका काॅलगर्लची डायरी | प्रेम, वेदना आणि समाजातील वास्तवाची सत्यकथ भाग नववा पहाटेच्या पाच वाजत आल्या होत्या.पाऊस जरा थांबला होता पण राधा मॅडम थांबत नव्हत्या.त्या दोंघावर तुटून पडल्या होत्या.त्या दोन्ही शरीरामध्ये हात जोडण्या इतपत ही त्राण नव्हता राहिला.इतकं मारलं तरी ते फारसं बोलत नव्हते.मारून मारून किती मारणार?मॅडम ही घामाघूम झाल्या होत्या.तेवढयात एक कॉन्स्टेबल घाईघाईने आला. “मॅडम,आपल्या विवेक सरांचा फोन.”त्यांन निरोप दिला.विवेकचा फोन?त्या दचकल्याचं इतक्या पहाटे त्याचा कॉल का यावा?ते पण पोलीस स्टेशनमधील फोनवर.त्यांनी नॅपकीनने घाम पुसला.साडी आवरत आवरत त्या शांत चालत फोन जवळ आल्या.अजून ही त्या वर्दीत नव्हत्या.आता विवेकला काय सांगाव? सारं खरं सांगावा की खोटं? नको इतकं खरं त्याला सांगायला. फार टेन्शन घेतो तो. “विवेक तू?इतक्या पहाटे फोन?” पोलीस कॉन्स्टेबला दूर जाण्याचा इशारा करत त्या बोलल्या.विवेकचा नेमका कसा मूड काय माहित? पहाटे त्याचा अनेकदा रोमांटीक मूड असतो 'पहाटे पहाटे जाग आली. तुझी रेशमी मिठ्ठी सैल झाली.' हेच गाणं त्यानं अनेकदा पहाटे ऐकवलं आपल्याल...