एका काॅलगर्लची डायरी भाग 9

 एका काॅलगर्लची डायरी | प्रेम, वेदना आणि समाजातील वास्तवाची सत्यकथ


Marathi karha,marathi story


 भाग नववा
पहाटेच्या पाच वाजत आल्या होत्या.पाऊस जरा थांबला होता पण राधा मॅडम थांबत नव्हत्या.त्या दोंघावर तुटून पडल्या होत्या.त्या दोन्ही शरीरामध्ये हात जोडण्या इतपत ही त्राण  नव्हता राहिला.इतकं मारलं तरी ते फारसं बोलत नव्हते.मारून मारून किती मारणार?मॅडम ही घामाघूम झाल्या होत्या.तेवढयात एक कॉन्स्टेबल घाईघाईने आला.
“मॅडम,आपल्या विवेक सरांचा फोन.”त्यांन निरोप दिला.विवेकचा फोन?त्या दचकल्याचं इतक्या पहाटे त्याचा कॉल का यावा?ते पण पोलीस स्टेशनमधील फोनवर.त्यांनी नॅपकीनने घाम पुसला.साडी आवरत आवरत त्या शांत चालत फोन जवळ आल्या.अजून ही त्या वर्दीत नव्हत्या.आता विवेकला काय सांगाव? सारं खरं सांगावा की खोटं? नको इतकं खरं त्याला  सांगायला. फार टेन्शन घेतो तो.
“विवेक तू?इतक्या पहाटे फोन?” पोलीस कॉन्स्टेबला दूर जाण्याचा इशारा करत त्या बोलल्या.विवेकचा नेमका  कसा मूड काय माहित? पहाटे त्याचा अनेकदा रोमांटीक मूड असतो
'पहाटे पहाटे जाग आली.
तुझी रेशमी मिठ्ठी सैल झाली.'
हेच गाणं त्यानं अनेकदा पहाटे ऐकवलं आपल्याला.आज पण तसचं काही तरी करील का? नवरोबाचा काय भरोसा.त्या उच्च पदस्थ पोलीस  अधिकारी असल्या तरी शेवटी त्या विवेकाच्या पत्नीचा होत्या ना?
“पहिले तू हे सांग कशीस?तुला काही झालं तर नाही ना?”विवेकचा डायरेक्ट प्रश्न होता.त्यात काळजीचा स्वर होता.मॅडमला हे कळतं नव्हतं.विवेक पर्यंत हे सारं पोहचलं कसं? कुणी  सांगितल त्याला हे.त्याला अश्या गोष्टी न सांगितलेल्याचं ब-या असतात.उगीच काळजीची सुई त्याच्या  काळजाला टोचत राहते.
“बरीचं मी रे.मला काय झाल?पण इतक्या सकाळी तू का कॉल केलास?”
“तुझ्या फोनला काय झालय? कितीदा ट्राय केलाय मी.थकलो ग मी तुला कॉल करून करून.”
“स्वीच ऑप आहे मोबाईल.बॅटरी खत्म.तुला एवढं घाबरायला काय झालाय?तुझी बायको एक पोलीस अधिकारी आहे हे सांग ना तुझ्या भाबडया मनाला.मला काय होणार?माझ्या केसाला कुणी धक्का लावू शकतं? इतकं सोप्पं ते?”विवेक  नवरा असला तरी त्याला सारचं खरं बोलणं शक्यं नव्हतं.त्याची काळजी आणि भीती अजून वाढवायची नव्हती त्यांना. गोपनीय  माहिती ही अशी शेअर करता येत नाही.
“असं कसा तुझा फोन स्वीच ऑफ होता?तू अधिकारी आहेस.सरकारला कळयाला नको?पोलीसावरं जबाबदा-या टाकणार मग त्यांच्या अडचणी कोण सोडणार?”
“विवेक, फोन माझा स्वीच ऑफ झाला. त्याला तू सरकाराला जबाबदार धरणारेस का?”
“पोलीस अधिकारी असले तरी त्यांना पण कुटंब असतं.त्या कुटूबांत काही नाती गुंफली गेलेली असतात.त्यांचा जीव पण इतक्या काटयावर नाही घातला पाहिजे ना?”
“ऐ,बघ उठसूठ सरकारच्या नावानी बोंबा मारणं योग्य नाही. तू काय विरोधी  पक्ष नेता काय?उठ सूठ अपयशाची सारी खापरं सरकारच्या  डोक्यावर फोडायला.इट इज माय डियूटी.एवढं तर मी केलचं पाहिजे,ना?”
“तुझ्या जीवाचं बरं वाईट झालं असतं म्हणजे? त्या केसमध्ये त्या विरोधीपक्ष नेत्याचं हात आहे म्हणे?”
"तू असं काही बोलू नकोस.ते आमचं कामं.आम्ही शोधत आहोत.कुणाचा हात आहे,कुणाचा नाही हे तर आम्ही शोधत आहोत ना? सत्य बाहेर येईल लवकरचं.
"पण हे राजकारणी लोक फार विचित्र,क्रूर असतात." विवेकचा मुळातच राजकारणी लोकांवर विश्वास  नाही. विश्वास नाही हे आपण समजू शकतो पण त्याला खूप राजकारणी लोंकाचा राग पण आहे.
"तुला काहीच माहित नसताना.तू तुझं मत असं प्रदर्शित नको करायला."
"तुझ्या जीवाचं जर काही बरं वाईट  झालं तर मी सोडणार नाही त्या हरामखोरांना?" आता हा कुणाला हरामखोर म्हणत असेल? विवेकला खरचं काही माहिती करून शकते. फक्त चर्चा करू  शकतात लोक.
"माझ्या जीवाचं बरं वाईट होईल? असं का वाटतयं तुला? मला काही होत नसतं. रात्रीचं बघ ना,सारी टीम धावून आली माझ्यासाठी?ते आमचं स्टींग ऑपरेशन होतं.ते सक्सेस  झालं.ते टीम वर्कचं असतं.”
“स्टींग ऑपरेशन होत तर मला कधी सांगणार होतीस?”
“अरे,तुला सगळं सांगणारच होते मी.माझी शौर्यं कथा तुला सांगायचीचं होती.ती पण अगदी कॉमेटरी टाईप.ऑखे देखा हालं.मला तुला सरप्राईज दयायचं होतं पण ती सारी गंमतच कुणी घालवली?सारंच कसं कळलं तुला? कोणास ठाऊक?”
“न्यूज चॅनल.”    .
“क्काय? न्यूज चॅनलवर ही बातमी?”राधा मॅडमने आश्चर्यचकीत होऊन प्रश्न विचारला.त्या घटनेला  अजून  पुरे दोन तास झाले ही नव्हते.ब-याचं गोष्टी गोपनीय ठेवणं भी आवश्यक असताना मिडीयाला कोण ही महिती देत आहे.आपल्या स्टाफपैकीच कुणीतरी असणार.चौधरी हे प्रसिध्दीसाठी तर करत नाही ना? चोधरीचा,त्यांना डाऊट आला.कामापेक्षा चमकण्यात त्याला फार इंटरेस्ट असतो.चौधरीवर जरी डाऊट असला तरी त्या बोलल्या नाहीत.बोलायची वेळ नव्हतीच ही.आता बातम्या पाहून कुणी कुणी फोन केले असतील ?काय माहित?
विवेकनं न्यूज चॅनलवर बातम्या पाहिल्या.आपल्या बायकोला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला हे ऐकून कोणता पुरूष गप बसेल?
‘पोलीस ऑफीर्सस राधा मॅडमला जिवंत जाळण्याचा प्रयत्न’ ही ब्रेकींग न्यूज चॅनलवर झळकत होती. कधी पासून तो त्यांचा मोबाईल ट्राय करत होता.दोन्ही सीम कार्डंवर ट्राय करून ही संपर्क होत नव्हता.शेवटी त्यानं पोलीस स्टेशनवरच्या फोनवर ट्राय केला.
“राधा,तू नेहमीचं असा जीव तुझा मरणाच्या दाढेत देतेस.काय गरज होती?एकटीनं एवढ धाडस करायचं.”
“अरे,असं कसं बोलतोस? माझीचं काय? माझ्या खात्याची  नितांत गरज होती.सरकाराची तर फारचं गरज होती.अश्या लोकांना वेळीचं धडा नको का शिकवायला?मी एकटी नव्हते.माझी सारी टीम माझ्याबरोबर सध्याआहे.आमचा एक परप्केट प्लॅन होता.त्याचं ट्रॅपमध्ये त्याला अडकवलं आम्ही..”
“मला किती टेन्शन आलं?आणि तुझा फोन ही चालू नव्हता.तुला बोलल्याशिवाय मला चैन पडत नव्हता.”
“आता पडला का चैन?नुसतं बोलून काय होतं?”
“तुला मज्जाक सुचते काय?”
“मज्जाक नाही रे पण तू एका पोलीस अधिका-याचा नवरा आहेस हे लक्षात ठेव.असाचं जीव तळहातावर घेऊन आम्हला जगावं लागतं.जगावं लागणार ही आहे. असचं जगणं असणार आहे आमचं.लग्नापूर्वी तर फार कौतुक  होत माझं.आता काय झालय? माझ्या क्षमतावर विश्वास  नाही तुझा?”
“तुझ्या कामाचा अभिमान आहे ग पण फार भिती वाटतेय.तुझ्या पलॅन मध्ये ते अडकले. त्यांच्या ट्रॅप्मध्ये तू अडकली असतीस तर? अशी लोक खतरनाक  असतात.”
“जर तरची भाषा पोलीस खात्यात नसते. रिअल फॅक्ट महत्वाची असते.मला काही ही झालं नाही.मी सुखरूप आहे.हे खरं आहे. त रिलॅक्स  रहा.”
“गाडीत जाळण्याचा प्रयत्न केला त्या हरामखोरांनी.”
“ते जाळू शकले नाहीत मला. मला ते जाळणारच होते.मी एक अधिकारी आहे हे कळून सुध्दा ते मला जाळणारच होते.मी त्या लोंकाना या जगात नकोच आहे.”
“पण कोण लोक आहेत ते?तुझ्याशी एवढी दुश्मनी का?”
“विवेक ते माझे दुश्मन नाहीत.ते सत्याचे दुश्मन आहेत.त्यांना सत्य नको आहे कदाचित बाहेर येणार सत्यं भयानक असेल?जो पर्यंत मी सत्याच्या बाजूने प्रामाणिक आहे तो पर्यंतच ते माझे दुश्मन असणार आहेत.मी अप्रामाणिक होण्याचं ठरवलं तर ते माझे दोस्त असतील?ते वास्तवाला घाबरणारे डरपोक लोग आहेत एवढं नक्की.”
“राधा,तू डरपोक म्हणतेस त्यांना पण ते काही करू शकतात.त्यांची ताकद फार मोठी असेल?”
“भीती ही काल्पनीक असते.ते भय निर्माण करते.त्या भिती पोटी ते माझ्या जीवावर उठले होते.माझा मोबाईल फेकून दिला गाडीच्या बाहेर.गाडी लॉक करून पेट्रोल पण गाडीवर टाकले.पाऊस  जोरात असल्यामुळे त्यांना ते सहज शक्यं होत नव्हतं.गाडी बुलेट प्रूप होती.काचा ही फुटत नव्हत्या. सारं संपलं असं वाटत असतानाचं  चौधरी तिथे टायमींगला आले. पुढचा अनर्थं टळला.आता ते आणि त्यांचा मोबाईल आमच्या ताब्यात आहे.त्यांना आता कुणी ही वाचू शकत नाही.त्या हरामखोरांना मी ही सोडणार नाही.”
“तू या केसमध्ये कुणा कुणाशी पंगा घेणारेस काय माहित? एका अधिका-याला जिवंत जाळण्याचा ते प्रयत्न करत आहेत म्हणजे ते लोक साधे तर नक्कीचं नाहीत. त्यांचे हातवर पर्यंत गेलेले असणार.एवढं तर नक्कीच कळत असेल तुला?”
“ते लोक कोण आहेत हे पण कळलं आहे. त्यांच्या ताकदी पण कळल्या आहेत. त्यांची ताकद म्हणजे पैसा आहे.राधा देसाईवर ती ताकद चालत नाही.”
“कधी कधी तुझं इतक काणखर असणचं मला खतरनाक वाटतं.तू अनेक गोष्टी अंगावर घेतेस त्यामुळेच मला तुझी चिंता वाटते.”
“सत्यमेव जयते. सत्य सदैव जिंकतं असतं. ते अजिंक्य असतं.कुणी ही असोत ते.या देशात कायदयापेक्षा कुणी मोठे नाही.कायदयाचे हात इतके लांब आणि मजबूत असतात की ते गुन्हेगारच्या नरडयाला  कधी भी फास अडकवू शकतात.”
“तुझा मला सार्थ अभिमान आहे ग"
"आता माझ्या पराक्रमाचे पोवाडे गात सुटू नको. नाहीतर बाईल वेडा म्हणतील लोक तुला" मॅडम हासत हासत म्हणाल्या.त्यांना विवेकला रिलॅक्स करायचं होतं.
"चालेल मला लोक काही म्हणोत पण माझं तुझ्यावर असलेले प्रेम कमी नाही व्हायचं."
“सॉरी,यार एक पत्नी म्हणून कर्तंव्यात नक्कीचं कमी पडतेय मी.सोनू,फार काळजी नको करूस. येतेय मी विंकेडला तुझ्याकडे.काही ही कसूर ठेवणार नाही.खूप खूप प्रेम करायचं मला.मला त्यांना अजून बोलतं करायचं. पोलीसी खाक्या त्यांना दाखवावा लागेल. अजून ही त्यांचा पोपट कसा नाही झाला?ते सराईत गुन्हेगार  नाहीत पण बदमाश  नक्कीच  आहेत.बाय.. बाय..” राधा मॅडमने फोन ठेवला.कोठडीकडं चालत आल्या.

पोलीस स्टेशनच्या वेटींग रूमध्ये टीव्ही चालू होता.त्या टीव्हीवर बातमी चालूच होती.तीच काळी इन्हीव्हा गाडी.तोच वृंदावणी इमारतीचा रस्ता.पडता पाऊस.ते दोन हरामखोर.विरोधी पक्ष नेता सावंत सोबत फोटो असलेले.राघव कांडेकर व शरद मिश्रा.महिला आयोगाच्या राईकर बाईचा ही कंठशोष  चालूच होता. काठींच कोल्हं करण्यात ही राजकारणी लोक फारचं पटाईत असतात.राजकारण ही चांगलचं रंगल होतं.एखादया मुद्दयावर राजकारण रंगल की खरं-खोटं ठरवणं फार जिकीरचं होतं.अनेकदा तपासाच्या दिशा भरकटतात.आपण कुणाच्या तोंडाला कुलूप नाही लावू शकतं.राधा मॅडम पुन्हा कोठडीत गेल्या.भल्या भल्या गुन्हेगारांच्या पोपट करण्यात मॅडमचा हातखंडा  होता.तसा त्यांचा दरारा ही होता.बाहेर तांबड फुटलं होतं.त्या कोठडीत कोलदांडा घातलेले दोन शरीर विव्हळत  पडले होते.राघव कांडेकरच्या तोंडावर पाण्याचा आख्खा जगाचा शिपकारा मारत मॅडमने त्याला लाथ मारून उठवलं.
“तुला कुणाला फोन करायचा असला तर कर.तू कुणासाठी काम करतोस?”राघव कांडेकरचं टाकलेली मान दंडूक्याने उंचावत मॅडम बोलल्या.
“नाही.मी कुणाला फोन करु?” त्यांनी कसे-बसे डोळे उघडले.त्याचं थोबाड सुजलं होतं.
“मादरचोद, खोंटं बोलू नकोस.तू ज्याच्यासाठी  काम करतोस त्याला कॉल कर.”
“खरचं.मी कुणासाठी नाही काम करत.माझाचं छोटासा बीझनेस.”राधा मॅडमने त्याला बोलत केलं होतं.तो बोलू लागला होता.मॅडमने त्याच्या विषयी माहिती घेतली.त्याला बाहेरचा नाद होता हे त्यांन कबूल केलं.हॉटेल रूबीवर त्या दिवशी तो होता पण सारा वाडकर सोबत नव्हता.दुसरीचं एक मुलगी होती. अश्या मुली खरं नाव सांगत नाहींत.तो पिंकी नावाच्या कुण्या मुलीसोबत होता.असा धंदा करणा-या पन्नास-साठ टक्के मुलीचे नाव पिंकीचं असतात.
“सारा वाडकरला तू ओळखतोस का?”
“नाही. मी साराला नाही ओळखत.”
“ही फोटोतली मुलगी कधी पाहीलीस का?” त्याच्या डोळयासमोर फोटो दाखवत मॅडम त्याला विचारत होत्या.
“पाहिली पण ओळखत नाही.”
“कुठे राहत होती?
“वृंदावणी रिसिडीन्सी….त्या एरियात अनेकदा पाहिली.”
“आवडली असेलचं?” मॅडम त्याच्या डोळयात  पहात बोलल्या.त्याची नजर खाली गेली होती.
“एकदा गेलो होतो लाॅजवर तिला घेउन पण तिचं नाव माहित नाही.ती म्हणायची माझं नावं विचारायचं नाही. माझं लग्न झालेले आहे.शपथ कधीचं तिनं नाव सांगितल नाही.
“ठीक. खरं बोलं.नाहीतर तुझा एन्कांऊटरच झाला म्हणून समज.” मॅडम त्याला धमकावत बोलल्या.
"शपथ. खरं खरं सांगतोय मी.”त्यांन मॅडमच्या डोळयात पहात कसेबसे शब्द उच्चारले. त्याला आपल्या नजरेतून मॅडमला विश्वास दयायचा होता.
“चौधरी, ध्या याला स्पॉट व्हिजीटला.”राधा मॅडमने आदेश दिला आणि  त्या तरातरा निघून आल्या. पोलीस स्टेशनच्या दारात मिडीयावाल्यांची गर्दी झाली होती.

क्रमश:

----------------------------------------
परशुराम साेंडगे
---------------------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

. एका काॅलगर्लची डायरी भाग 1 | प्रेम, वेदना आणि समाजाच्या वास्तवाची सत्यकथा

युध्द पेटले आहे – जगण्याचा चंग आणि संघर्षाच्या गर्जना करणा-या माणसांच्या कविता.

झापूक झुपूक मराठी चित्रपट समीक्षा | Zapuk Zupuk Marathi Movie Review in Marathi | Suraj Chavan | Kedar Shinde