भोंदूबाबा कॅप्टन खरात आणि मूर्ख राजकारणी.

भोंदूबाबा कॅप्टन खरात आणि मूर्ख राजकारणी.

कॅप्टन्स फाईल पाहिल्यानंतर तुम्हाला राग आला की हसू आलं?का त्या राजकारण्याची कीव आली? का किळस वाटली?

 शेवटी घटना घडल्यानंतर आपल्याला काय वाटतयं हे महत्वाचं आहे ना?

Captain Kharat Files


मला तर जॅम हसू आलंय.काय पागल लोक असतात हे ?

काय थाटमाट असतो राजकरणी लोकांच? काय रूबाब असतात त्यांचे? तुम्ही बघितला ना? भोंदू बाबाच्या मागे कश्या शेपट्या हालवत फिरत आहेत हे लोक? 

 हे आडाणी आहेत का? हे शिकले नाहीत का? हे उच्चशिक्षित आहेत ना मग यांची अक्कल अशी शेणं  का खाते ?  

कुणी माणूस ब्रम्हांडनायक असतो  का? काळी जादू किंवा तंत्रविदया नावाचा काही प्रकार अस्तित्वात असू शकतो का?अंकशास्त्रात पण तो निपुण होता म्हणे..!! तो कृष्णाचा अवतार नि त्याच्याकडे जाणारी प्रत्येक  महिला ही राधा...??

काय भंकसगिरी ही?

शाळेत हे सामान्य विज्ञान तर हे शिकले असतील ना? अगदी शाळकरी पोरामध्ये जेवढा वैज्ञानिक  दृष्टिकोन दिसून येतो तेवढा पण यां राजकीय गेंडयांना नसावा का?  थोडी तरी तर्क बुध्दी जागी ठेवा ना? निव्वळ अक्कलच शेण खाल्ल्यासारखं हे कशी वागतात?

 त्या भोंदूचे पाय धूणारी, ते पाय आपल्या पदराने पुसणारी एक  महिला आपल्या महिला अयोगाची अध्यक्ष आहे.58 पेक्षा जास्त महिलांचे त्यानं शोषण  केलं आहे.तो या अध्यक्ष बाईचा गुरू आहे.ती त्याला ऊन्हात  छत्री घेऊन  उभी आहे. गुरू माऊलीला ऊन्हं लागू नये म्हणून...!! एका भोंदूच्या ट्रस्टवर ट्रस्टी आहेत चाकणकर मॅडम कॅप्टन्स अशोक खरात फाईल्स

हीची कीव करावी तेवढी कमीच आहे.इतक्या मूर्ख बाईच्या हातात आपण अतिशय महत्वाच्या अयोगाची सूत्र दिली आहेत. लाज नाही वाटत थोडीपण?

ज्यांनी कुणी दिली आहेत त्याना जर लाज असेल तर त्यांनी  आपलचं स्वतःतोंड झोडून घ्यावं. प्रायश्चित्त  घ्या ना? हे असले विवेकबुध्दी दारिद्र्य..!! यांच्या हातात आपण कारभार दिला आहे.हे देश घडवणार? खुद्द शिक्षणमंत्री आपला हात बुवाच्या हातात देताहेत. डोंबल वैज्ञानिक  दृष्टिकोन  मुलांमध्ये निर्माण करणार का?

माजी मुख्यमंत्री ही चरणीलीन आहेत.अनेक मंत्री, खासदार,आमदार या विकृतबुवाच्या चरणी लीन आहेत.

आता हा मूर्खपणा सर्वपक्षीय आहे. अमक्या तमक्या पक्षांचे नेतेच त्यात आहेत असे नाही.उच्च विदयाभूषित अधिकारी,उदयोग पती सारच  इतके पागल झालेले आपल्याला दिसतात. गोर गरीबांच्या,अडाणी महिला अश्या भोंदू बांबाना बळी पडतात असा आपला समज होता पण तसं नाही.

राजकारणी आपल्याला हे लोक चाणाक्ष, हुशार, धूर्त वाटत असतात पण हे तर फारच पागल असतात. इतके अंधश्रद्धाळू आहेत यावरून हे दिसते आहे.

CaptainFiles

 सरकारने त्याला अटक केली आहे. त्याला कठोर शिक्षा केली जाईल असे काही सरकारी पक्षातील प्रवक्ते बोंबल सुटलेत.

त्याला अटक करून  सरकारने काय थोर उपकार केले आहेत का?

2013 सालीचं अंधश्रद्धा निर्मूलन  कायदा झाला आहे. तो कायदा फाट्यावर मारून हे लोक अंधश्रद्धेला खतपाणी घालत आहेत.यांना कुणी जाब विचारायचा? 

 किती दिवसापासून याचे काळे धंदे कसे सुरू होते? तो बेहिशोबी मालमत्ता  जमा करत असताना सरकारचं महसूल खातं आणि गृहात काय झोपलं होतं काय? एवढ्या मोठ्या प्रमाणात गुन्हा घडतो आहे सरकारला काहीच कळलं नाही.आपलं गुप्तहेर खातं काय करते आहे ? कडक कारवाई  करू असं म्हणलं की सरकारचं काम संपत नाही.हा गुन्हा एका दिवसात घडला नाही.सरकारी यंत्रणेचे सपशेल अपयश आहे हे.

आता हा हिंदू धर्माचा वापर करून भोंदूपणा करतो आहे म्हणून त्यावर ज्वलंत हिंदुत्ववादी काही बोलणार आहेत का? हिंदू धर्माचा सा-या मोठं नुकसान कोण करत असतील तर हे भोंदू महाराज? कळिमा फासली आहे धर्माला. विवेक बुध्दीचा वापर न करता? धर्माचे विधी करणे म्हणजे  अंधश्रद्धा आहे. हे पटतयं का तुम्हाला?

 वारकरी संप्रदायाने या सा-या गोष्टी  नाकारल्या आहेत. त्यांची खेटरांनी पूजा करावी अशी शिकवण आहे आपल्या संताची.

आता प्रबोधन तर फार सुरू आहे. उदंड झाले किर्तनकार. .!! इतकी किर्तन ऐकून ही लोक शहाणी का होत नाहीत?  किर्तनकारांनी  समाज प्रबोधन करण्यापेक्षा समाज मनोरंजन सुरू केले आहे. एका एका सप्ताहाचे बजेट काही कोटीच्या घरात गेले आहेत. एका एका किर्तनकाराचे मानधन लाखात गेले आहेत. इतकं महागडं प्रबोधन करून ही लोक अंधश्रद्धेच्या दलदलीत फसत चाललीय आहेत. सां-याचा धंदा जोरात सुरू आहे मग शहाणं कुणी करायचं लोकांना?

CaptainFiles


काही राजकारणी निव्वळ बुध्दी निघाले आहेत. किर्तनकारांना धंदे चालू ठेवायचे आहेत.सारेच माणसं सज्जनतेचा मुखडा घालून फिरत असता. मुखवटा  दूर केला की असे विकृत चेहरे समोर येतात. मग आपलीचं आपल्याला लाज वाटू लागते.

खरा प्रश्न  हा आहे की  इतके शिकलेले , श्रीमंत  व उच्च पदावर असलेली माणसं इतकी बुध्दी कशी असतात?

तुम्हाला काय वाटतय?

 परशुराम  सोंडगे,बीड

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धर्मयोगिनी अहिल्यादेवी- आजच्या पिढीला मूल्यांचा आरसा दाखवणारं पुस्तक

युध्द पेटले आहे – जगण्याचा चंग आणि संघर्षाच्या गर्जना करणा-या माणसांच्या कविता.

एका काॅलगर्लची डायरी - भाग 1