पोस्ट्स

कथामालिका लेबलसह पोस्ट दाखवत आहे

एका काॅलगर्लची डायरी भाग 9

इमेज
  एका काॅलगर्लची डायरी | प्रेम, वेदना आणि समाजातील वास्तवाची सत्यकथ  भाग नववा पहाटेच्या पाच वाजत आल्या होत्या.पाऊस जरा थांबला होता पण राधा मॅडम थांबत नव्हत्या.त्या दोंघावर तुटून पडल्या होत्या.त्या दोन्ही शरीरामध्ये हात जोडण्या इतपत ही त्राण  नव्हता राहिला.इतकं मारलं तरी ते फारसं बोलत नव्हते.मारून मारून किती मारणार?मॅडम ही घामाघूम झाल्या होत्या.तेवढयात एक कॉन्स्टेबल घाईघाईने आला. “मॅडम,आपल्या विवेक सरांचा फोन.”त्यांन निरोप दिला.विवेकचा फोन?त्या दचकल्याचं इतक्या पहाटे त्याचा कॉल का यावा?ते पण पोलीस स्टेशनमधील फोनवर.त्यांनी नॅपकीनने घाम पुसला.साडी आवरत आवरत त्या शांत चालत फोन जवळ आल्या.अजून ही त्या वर्दीत नव्हत्या.आता विवेकला काय सांगाव? सारं खरं सांगावा की खोटं? नको इतकं खरं त्याला  सांगायला. फार टेन्शन घेतो तो. “विवेक तू?इतक्या पहाटे फोन?” पोलीस कॉन्स्टेबला दूर जाण्याचा इशारा करत त्या बोलल्या.विवेकचा नेमका  कसा मूड काय माहित? पहाटे त्याचा अनेकदा रोमांटीक मूड असतो 'पहाटे पहाटे जाग आली. तुझी रेशमी मिठ्ठी सैल झाली.' हेच गाणं त्यानं अनेकदा पहाटे ऐकवलं आपल्याल...

एका काॅलगर्लची डायरी | प्रेम, वेदना आणि समाजातील वास्तवाची सत्यकथा

इमेज
एका काॅलगर्लची डायरी | प्रेम, वेदना आणि समाजातील वास्तवाची सत्यकथा Callgirl'sDairy marathi story भाग आठवा गाडीनं वेग घेतला होता.पाऊस जोरात चालू होता. त्याने मॅडमचे दोन्ही ही हात धरले होते.काचा बदं होत्या.ओरडून ही काही उपयोग होणार नव्‍हता.कॉलनीत क्वचितच गाडया येत जात होत्या.अश्या उच्चभ्रू कॉलनीच्या रस्त्याला मुळातचं कित्तीकशी  रहादारी असणार? ज्या पध्दतीने तो मॅडमला ट्रीट करत होता त्यावरून त्याचा इरादा काही चांगला नव्हता.तो फारच वासना व्याकूळ झाला होता.मुळात त्यांच्या गाडीत बसणचं चूक होतं.दोन पुरूष असतानी आपण कसं त्या गाडीत बसावं?मॅडमचा कॉन्फीडन्स त्यांना नडला की काय?अशी  भीती मॅडमलाचं वाटतं होती.                       चौधरी ही मागे दिसत नव्हता.त्यांना लोकेशनं ही कळणार नव्हतं कारण मोबाईल त्यानं फेकून दिला होता.मॅडमच्या अंगाला धरधरून घाम फुटला होता.त्यांच पडलेला पदर ही त्यांना सावरता येत नव्‍हता.त्यांनी दोन्ही हात त्यांचे गच्च पकडले होते. “प्लीज,गाडी थांबवा.मला कुठे नेत आहात.माझा मोबाईल.?” राधा मॅडम कळकळून बोलत होत्या.तो मॅडम...

एका काॅलगर्लची डायरी| भाग 7 | प्रेम, वेदना आणि समाजातील सत्यकथा

इमेज
      भाग सातवा. Callgrils Diary एका काॅलगर्लची डायरी भाग -7 “ही तुमची मैत्रीण?” ते फोटो पाहून त्याच्या चेह-यावर आश्चर्याची अनेक चिन्हं उमटले.तो मोठयानं चित्कारला नाही हे काय कमी नव्हतं.ते फोटो त्याच्या ओळखीचं असतील का?त्याला ते फोटो पाहून नक्की काही तरी आठवत होतं. callgril's dairy “ओळखता तुम्ही हिला?”हातातला फोटो त्याच्या पुढे नाचवत त्या मोठया उत्साहाने बोलल्या.त्याला लगेच कळलं.आपलं काही तरी चुकलं.तो जरा चपापला.दात चावले.माणसाच्या मनातलं असं चेह-यावर नकळत उमटून जात. हीची तर डेड बॉडी सापडली ना? नसती झझटं आपल्या मागे लागायची. तो जरा सावध ही झाला होता. “नाही.नाही.मी ओळखत वगैरे नाही पण.” त्यानं स्वत:ला सावरलं.मॅडम त्याच्याकडेचं पहात होता.त्याच्या चेह-यावर उमटणारे भाव त्या अगदी सूक्ष्मपणे टिपत होत्या.त्याला मात्र मॅडमच्या डोळयाशी डोळा भिडता नाही आला. तेवढं धैर्यं त्याच्याकडं नसावं. “पण काय?ओळखीचा नाही पण पाहण्यातला चेहरा वाटतोय का?” “पाहण्यातला नाही.खूपचं स्मार्टं होत्या त्या.यांची डेड बॉडी सापडली का? अरे रे…!! हे नक्कीचं मरायचं वय नव्हतं.मृत्यू फारचं क्रूर असतो, ना...

एका काॅलगर्लची डायरी|भाग 6 | प्रेम, वेदना आणि समाजातील सत्यकथा

इमेज
                                                                                   भाग सहावा “तुम्हाला काही बोलयचं का?”धिप्पाड देहाच्या त्या टक्कल्या माणसाजवळ जाऊन राधा मॅडम बोलल्या. ते पण त्याच्या डोळयात पहात.तो अजून ही त्यांच्याकडे ‘ऑ’ वासून पहात होता.तो मॅडमकडे आणि मॅडम त्याच्याकडे पहात होत्या आणि गर्दी दोघांकडे पहात होती.तो टक्कला असला तरी श्रीमंत माणूस असावा.स्टार्च केलेले कडक इस्त्रीचं शर्टं.ब्रँन्डेड जीन्स्.हातात सोन्याच्या अंगठया होत्या.गळयात सोन्याची जाड साखळी.श्रीमंतीचा एक माज असतो तो पण चेह-यावर आतोनात होता. “नाही.नाही..!!मला कुठं काय बोलायचं?कोण आहात आपण?”त्याला हा अनपेक्षित धक्का होता.त्याच्या नजरेत एक तुच्छता होती.ती इतकी होती की तो थुंकला नाही हे काय कमी नव्हतं.सहज तिच्याकडं पाहिलं आणि ही डायरेक्ट असं विचारते.तो अधिकच गांगरला. त्याला हे माहित नव्हतं की,तो एका पोलीस ...

एका काॅलगर्लची डायरी|भाग 5 | प्रेम, वेदना आणि समाजातील सत्यकथा

इमेज
मराठी कथा         भाग पाचवा रा खाडी रंगाची सिल्क साडी.त्यावर लेमन कलरचा शॉर्ट ब्‍लाऊज.थोडासा मेकअप करून राधा मॅडम  आरश्या समोर उभा राहिल्या.आपण या कपडयात इतका सुंदर दिसतो की,इतक्या सुंदरच आहोत? त्यांचा त्यांनाच हा प्रश्न पडला.मोकळे सोडलेले केस.त्यांनी एकदा विस्कटून पाहिले.छानसं आरश्यात पाहून हासल्या.स्वत:लाच असं स्माईल देणं त्यांना छान वाटलं.विवेकने जर या साडीमध्ये पाहिलय तर त्याला कस वाटेल? कपडयाचे कलर कॉम्‍बीनेशन्स माणसाचं सौंदर्य खुलवत असेल का? आज त्या स्वत:च्या दिसण्यावर जाम खूश होत्या.आपण सुंदर दिसत असू का सेक्सी की हॉट? विवेकचे नेमके कोणते शब्द असतील आपल्यासाठी आज?अनेक शब्दांचे तरंग मनात उमटत गेले.सेक्सी,हॉटं,मादक,ब्यूटीफूल…!!!                              आपण सेल्फी काढून विवेकला टाकावी का?त्यांना सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही.त्याला थोडेच पैसे पडतात?त्यांनी दोन तीन सेल्फी काढून बघितले पण त्यांना जाणवलं क...

एका काॅलगर्लची डायरी भाग 4| प्रेम, वेदना आणि समाजातील सत्यकथा

इमेज
  Callgril's,Dairy  पो लिस स्‍टेशनच्या आवारात गाडी शिरताना राधा  मॅडमच्या लक्षात आलं.गर्दी फारच झाली आहे. मिडीयाची एवढी गर्दी ? त्या जरा सावध झाल्या.वर्दीत असलं की सावरायचं म्हणजे नेमकं काय कराचयं? सावरायला व आवरायला वर्दीला थोडाच पदर असतोच?आपल्या केसावर हात फिरवला.शर्ट थोड नीट केलं.अधिकारी असल्यातरी अनेक पुरूषी नजरांना समोर जावं लागतच ना?शेवटी एका स्त्रीच शरीरचं ते.आंबट नजरांना कसं रोखणार?तेवढयात त्यांचा मोबाईल वाजला. "राधा देसाई ना?” समोरून आवाज आला. “ येस.. हो मीच बोलतेय. आपण कोण?” अनोन नंबर होता. “रमेश सांवत सर बोलताहेत आपल्‍याला?”रमेश सांवत विरोधी पक्ष नेता.फार बेरकी माणूस. गावठी. “मॅडम्, हाय का टायेम आमच्यासाठी दोन मिनीटे.” “असं का बोलता? बोला ना?” असचं कुचक काचक बोलणार. “त्या गृहमंत्र्याचं  ऐकून आमच्या नका  घालू तंगडयात तंगडया.” उगीच गडगडाटी हासलं. ते  हासणं नकली होत. “असं काय नाय? कायदयासमोर सारी माणसं सारखीच असतात.कायदा भेदभाव नाही करतं. सरकार –विरोधी असं काही नाही.”त्याला काय उत्तर दयावं म्हणून त्यांनी हे स्पष्टीकरण दिल. “त्या प्रकरण...

एका काॅल गर्लची डायरी -भाग 3

इमेज
        एका काॅल गर्लची डायरी -भाग 3                                            तिसरा भाग झिमझिम पाऊस सुरू होता.राधा मॅडम बाल्‍कनीत उभ्या होत्या.सारं शहरं पावसात चिंब भिजत होतं.पावसाचा पण एक सूर असतो ना? झिमझिम…! रिमझिम…!! थंडगार वारं अंगास झोंबत होतं.तसं त्यांनी अंग चोरलं. एक गोड शहरा अंगभर पसरत गेला.वा-यावर उडणारे केस त्यांनी सावरले.पाचव्या मजल्यावर त्या उभ्या होत्या.पाऊस बरसत असला तरी  रोडवरील गर्दी कमी नव्हती.दुथडी  भरून रस्ते वाहत होते.वेगवेगळया रंगाचे रेन कोटस्, छत्र्या ,वाहनं रंगीत ठिपक्यांची दिसत होते. एक विलक्षण दृश्य दिसतं होतं.माणसंच काय वाहन ही इवल्या इवल्या रंगीत ठिपक्यासारखे दिसत होती.                    पाऊस म्हणजे धरती आणि आकशाचा प्रणयचं ना? धूवाधार पावसाला सोसत राहणारी धरती.हिरवागार शालू परिधन करून पाऊस झेलत,शोषत उतावीळ प्रणयीचं ना? राधा मॅडमला उगीच कुठं तरी वाचलेली ही कवी कल्पना आठ...

एका काॅलगर्लची डायरी भाग 2

इमेज
  Marathi story                                                                       भाग -2 ब्ल्यूस्टार हॉटेलच्या भव्य हॉल मध्ये लग्‍नाच्या गर्दीत राधा मॅडमला अचानक आवाज आला.त्या वर्दीतच होत्या.त्याचं एकमेव महिला त्या लग्नात असतील की त्या साडीत नव्हत्या.नटलेल्या,सजलेल्या नव्हत्या. त्या ऑनडीयुटी सहभागी झाल्या होत्या.त्यामुळे वर्दीतच होत्या. “तुम्ही राधा.. देसाई ना?”ओळखीचा चेहरा.ओळखीचा आवाज.कोण असावा याचा अंदाज त्या बांधत बसल्या.खरतर त्यांना काहीच आठवत नव्हतं.गर्दीत असं कुणी तरी अचानक येते आणि डायरेक्टं नावानंच बोलत.त्यावेळी इतकं गोंधळून तर माणूस जाणारच ना?एक सुंदर बांधेसूद तरूण महिला त्यांच्याकडे हासत येत होती.काही क्षण त्या नुसत्या तिच्याकडे पहात राहिल्या.त्या एकटयाचं तिच्याकडे पहात नव्हत्या.अनेक नजरा तिच्यावर खिळल्या होत्या.ती बाई नटलेली असली तरी ओव्हर मेकअप मुळीच केला नव्हाता ति...

. एका काॅलगर्लची डायरी भाग 1 | प्रेम, वेदना आणि समाजाच्या वास्तवाची सत्यकथा

इमेज
एका काॅलगर्लची डायरी | प्रेम, वेदना आणि समाजाच्या वास्तवाची सत्यकथा Marathi story मराठी कथा भाग एक पहाटेचे पाच वाजले होते.पूर्वेला तांबडा रंग दाटून आला होता.वारं मंद वाहत होतं.थंडी ही चांगलीचं बोचत होती.स्वेटर,मफलिरी गुंडाळून माणसं चालत होती.स्ट्रीट लाईट जळत होत्या.गुलमोहरांच्या फुलांचा खचीचं खच पडला होता रस्त्यावर.कुणाकुणाच्या दारात पारिजाताकांचा सडा पडला होता.त्यांचा मंद पण धूंद गंध मनाला मोहित करीत होता.पाच वाजून गेल्या होत्या तरी माणसांची वर्दळ फारसी नव्हती.तुरळक तुरळक माणसं टोळक्या टोळक्यांनी चालत होते.काही नवीन पोरं पळूपळू घाम काढीत होते.            राधा देसाई ही जाँगींग करत होत्या.रनिंग केल्यामुळे अंग सारं घामेजून गेलं होतं त्यांच.अंग सारं  थबथबलेलं होतं.थोडसं थकल्या ही होत्या त्या.तेवढयात मोबाईल वाजला.               इतक्या सकाळी फोन एकतरी घरीहून तरी असावा नाहीतर पोलिस स्टेशनवरून तरी.दुसरा कॉल या नंबरवर शक्यचं नव्हतं कारण त्यांचा हा प्राव्हेट नंबर होता.अ...