एका काॅल गर्लची डायरी -भाग 3
तिसरा भाग
झिमझिम पाऊस सुरू होता.राधा मॅडम बाल्कनीत उभ्या होत्या.सारं शहरं पावसात चिंब भिजत होतं.पावसाचा पण एक सूर असतो ना? झिमझिम…! रिमझिम…!! थंडगार वारं अंगास झोंबत होतं.तसं त्यांनी अंग चोरलं. एक गोड शहरा अंगभर पसरत गेला.वा-यावर उडणारे केस त्यांनी सावरले.पाचव्या मजल्यावर त्या उभ्या होत्या.पाऊस बरसत असला तरी रोडवरील गर्दी कमी नव्हती.दुथडी भरून रस्ते वाहत होते.वेगवेगळया रंगाचे रेन कोटस्, छत्र्या ,वाहनं रंगीत ठिपक्यांची दिसत होते. एक विलक्षण दृश्य दिसतं होतं.माणसंच काय वाहन ही इवल्या इवल्या रंगीत ठिपक्यासारखे दिसत होती.
पाऊस म्हणजे धरती आणि आकशाचा प्रणयचं ना? धूवाधार पावसाला सोसत राहणारी धरती.हिरवागार शालू परिधन करून पाऊस झेलत,शोषत उतावीळ प्रणयीचं ना? राधा मॅडमला उगीच कुठं तरी वाचलेली ही कवी कल्पना आठवली.बाल्कनीतच निशीगंधाची वेल पावसात सापडली होती.नाजूक कळी आणि तो क्रूर पाऊस.किती सोसत होती ती.त्यांना उगीच त्या निशींगंधाच्या वेलीचा ही कणवं वाटू लागला.प्रणयात इतकं समर्पण हवहवस वाटतं असतं.ही तर एक धूंदी असते.बराच वेळ त्या कळीकडे बारकाईने पहात होत्या.असा पाऊस म्हटलं की माणसाचा मूड रोमांटिक होतोच.अनेक आठवणींच पदर मनात आपोआपच उलगडत जातात.आठवणी पैठणीच्या मि-या सारख्या रेशीम मुलायम निसरडया असतील काय?आठवणी त्यांना थोपवता ही येत नव्हत्या आणि थांबवता ही.
त्यांना शौर्याची ही तीव्रं आठवण झाली.शौर्य त्यांचा पती.या शहरापासून किती तरी दूर.शौर्यं,त्या आणि धूवाधार पाऊस….!!अनेक प्रणय चित्र त्यांच्या स्मृतीपटलांसमोरून सरकू लागल्या.इतक्या सूखद कल्पना माणसाच्या मनात पाझ्रत गेल्या की मन एका अनोख्या आनदांच्या सरीत चिंबत राहत.त्या आठवाच्या त्या सरीत भिजत होत्या तर धरती पावसाच्या..!! शौर्य आणि त्यांनी पहिल्यांदा पाऊस एन्जॉय केल तो क्षण. अकादमीत असताना शौर्याचा पहीला तो ओला स्पर्शं…!! पुरूष स्पर्श. तेवढयात त्यांचा फोन वाजला.
“मॅडम,ब्ल्यू स्टार हॉटेलमधली केसबाबत मिडीयाला बोला अश्या सूचना एसपी ऑफीसच्या सूचना आहेत.” एपीआयचा शेळके यांचा फोन होता.तो फोन आला पण आठवणींची शृंखला खळकन तुटली,
“पण मिडीयाशी काय सांगायच?”
“तपासात कुणाचं प्रेसर का?संशय व्यक्त करण्यात येत आहे.आपलं स्पष्टीकरण दयायाला हवं आहे.”
“कसलं प्रेसर?बॉडी सुध्दा कुणी ताब्यात घेतली नाही. सांगा त्यांना सांकाळी पाच वाजता प्रेस घेते मी.सहयोगनगर सीटी पोलिस स्टेशनला."त्यांनी लगेच फोन कट केला.
त्यांची आठवणीची शृंखला खळकन तुटून पडली.त्यांचा मूड ऑफ झाला तरी त्या लगेच हालल्या नाहीत.काही वेळ त्या पाऊस पहात तश्याचं उभा राहिल्या. मिडीयावाल्या विषयी मनात प्रचंड राग होता.चीड होती.त्या पडत्या पावसात ही संतापाच्या धगीत भाजत होत्या.
“मादरचोद साले,कसले प्रेसर?सारं सांगायचं. तपासात काही गोपनीयाता असते की नाही.काठीचं कोल्ह करायचं असत यांना.कुणाची तरी नावं घ्यायची म्हणजे टीआरपी वाढतो आणि घबाड ही मिळते. अरे कसे सांगू? बेवारस डेड बॉडी ती.”जाग्यावरचं पाय आपटले. मादरचोद ही शिवी आपल्या तोंडात आली याचं थोड खंत त्यांना वाटली.स्त्री असून अश्या शिव्या…?? पोलिस ऑफीर्सनी प्रेमळ,लाजरबुजर नसावं अशी त्या पोस्टची अपेक्षा असते.
सारा वाडकर.एक दुदैवी जीव.सारा वाडकरचं नाव आठवलं की त्यांच्या मनात माश्या घोंगाव्यात तश्या त्या आठवणी घोंघावू लागल्या.त्या हॉटेल मधील विवस्त्र शरीर..तिचे रिपोर्टस,मिडीयावाल्याच्या बातम्या.तिला मिडीया तर वेश्या ठरून मोकळा झाला होता.सारा की शुभांगी हे मात्र त्यांना अजून ठरवता नाही आलंय. माणसाच्या तोंडाला हात लावता येत नाही.तसं मिडीयावाल्यांच्या कॅमेरा पण पाण्यात फेकता येत नाही. तो फेकता आला पाहिजे.उगीच रान पेटवत राहतात.ब्ल्यूस्टार हॉटेल मात्र यांनी एका रात्रीत फेमस करून टाकलयं.देशात सा-याचं फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये असले धंदे चालतात म्हणून काही तज्ञांनी घोषीत करून टाकलं होतं, त्यासाठी राष्ट्रीय चिंता व्यक्त करण्यत आल्या होत्या.तपासाबाबत सकाळ संध्याकाळ त्यांना माहिती दयायला पाहिजे म्हणजे बातमी दिवस भर चालवता येते.साराच्या अंत्यांविधीचं लाईव्ह प्रक्षेपण केला काही हरामखोरांनी.राधा मॅडमचा पारा चढत होता.
खरतर त्यांना साराच्या केस विषयी आता या क्षणीतरी काहीच आठवायचं नव्हतं पण सारा हे नाव त्यांच पिच्छा सोडत नव्हतं.मनाच्या पृष्ठाभागावर सारखंच ते नाव उमटतं होतं.त्या रात्री सारा बरोबर नक्की काय झाल असेल? अश्या प्रश्नांचा कापूस मन पिंजू लागलं. सारा एक स्त्री होती.तिला स्त्रीच शरीर होतं म्हणूनचं हे सारं तिच्यासोबत हे झालंय.माणसाच्या दोनच जाती.एक स्त्री व दुसरी पुरूष.या दोनमध्येच माणसांचं वर्गीकरण केलं जात.प्राण्यात ही या दोनचं जाती.वनस्पतीमध्ये पण या दोनचं जाती.स्त्रीकेशर आणि पुकेशर… सामन्यविज्ञानात शिकवलेलं सारं त्यांना का उगीच आठवू लागलं? हे त्यांना ही कळतं नव्हतं.
मिडीयांन तिची बातमी फार चालवली.अनेक स्त्रीया अश्या मरतात. प्रेत कुजतात.सडतात.याची एवढी दखल घेती जात नाही.फाईव्ह स्टार हॉटेलमधील ही घटना होती.कुणा तरी मोठा धेंडाच यात हात असेल असा मिडीयावाल्या वाटत होत.साराचे फोटो ही आपण त्यांना दिले कुणी तरी पुढं येईल असे वाटलं होतं पण कुणीचं तिला माझं म्हण्यासाठी पुढे आलं नाही.अर्थात तिचं या जगात कुणीच नसेल का? खरचं साराला कुणी नसेल का?तिला आपलं म्हणावं इतक धाडस कुणातच नसेल? साराचा अंत्याविधी सरकारला करावां लागला.अंत्याविधी सरकारी करता येतो पण दोन आश्रू सरकारी नाही वाहता येत.आपल्यासाठी कुणी रडणार नसेल तर त्याला स्वर्गात जागा भेटत नाही असं आजी म्हणायची?त्यांना आजीचे हे बोल आठवले.साराला खरचं स्वर्गात जागा मिळाली नसेल का?दोन माणसं तरी आपल्यासाठी रडावेत इतकं तरी आपण जगाचं असावं.सारा तर कुणीच असं नव्हत.आवेह मरण आलं तिला.तिच्या कपाळला टिकली होती.भांगात थोडस कुंकू.सारा तसली बाई असली तरी.कुंकू कुणाच्या नावाचं असेल ते? तो तर तपास घ्यायचा आहे.ती विवाहीत होती की.. अविवाहीत?
शुभांगीचं तर लग्न झालं होतं.साराच? बॉडी ही साराची होती कारण हॉटेल मध्ये तिचं नावं सारा वाडकर अशी नोंद होती.शुभांगी हे नाव अजून तपासात कुठंच आलं नव्हतं पण राधा मॅडमला वाटायचं की ती शुभांगीच असावी.हे पण खरं होतं की तपासाला दिशा सापडत नव्हती.त्याचं एक प्रेसर राधा मॅडमवर होतेच.गुन्हेगार चतूर होते.पुरावे काही मागे सोडले नव्हते पण गुन्हा घडला म्हणजे त्याचा काही तरी धागा हाती लागेलचं. मिडीयानी मात्रं साराला व्ही आय पी वेश्या,कॉल गर्ल ठरवलं होत.अनेक व्ही आय पी व्यक्ती प्रकरणात गुंतले असण्याच अंदाज काढले होते.बातमी मध्ये सस्पेनस वाढवण्याचा कायम प्रयत्न केला जात होता.विवस्त्र डेड बॉडी ही थीमच मुळात सनसनाटी होती.मिडीयाच्या या भंकसगिरीचा,फालतु पणाचा तपासाला ही अनेक फायदा होता.मिडीयाचा प्रभाव हा काही अंश तरी तपासावर पडतोच. हे भयंकर असतं.
सेक्स आणि नशा.कुठल्या मादक द्रव्याचं घटक ही रक्तात सापडले आहेत.फिंगर ठसे ही चार व्यक्तीच्या असावेत असा अंदाज आहे.सारा आणि कुणी एकटा पुरूष तिथं नव्हते.एकूण चार माणसं त्या रूम मध्ये होती.सीसी फुटेज मधून फार काही हाती लागलं नाही. मिडीयासमोर त्यांना बाईट दयायची होती त्याचं ही टिपण काढयाचं होतं. तपासातल्या गोष्टी उघड न करता मिडीयाला बाईट दयाच्या विचर करत होत्या.त्या फार त्वरेने पोलिस स्टेशनकडे निघाल्या. आज सारी सनसनाटी बातमी फेकून दयावी अस त्यांनी मनोमन ठरवलं होत. चेह-यावर आलेले केस मागे सारत त्या मनातली मनात हासल्या. अंगात एक अनोखा जोम संचारला होता.गाडीत वेगाने धावत होती.
(पुढील भाग लवकरच )

टिप्पण्या