पोस्ट्स

डिसेंबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

तुमचा गाल आमची थप्पडं

इमेज
 तुमचा गाल आमची थप्पडं मी काॅलेजला असताना एक एकांकीका पहिली होती.पूर्वी एकांकिकाचे टायटल फार भन्नाट असतं.सोशल मिडीया नव्हती तेव्हा नाहीतर एका एका टायटेलनं तुफान राडा केला असता  सोशल मिडीयावर....!!  'तुमचा गालं..!!, आमची थप्पड..!!" अशी भन्नाट  टायटल असलेली सामाजिक  व राजकारणावर भाष्य करू शकेल अशी  एकांकिका एका स्पर्धेत  पाहण्यात आली होती. एका सामान्य नागरिकाची कशी ससेहोलपट केली जाते या व्यवस्थेमध्ये याची काही प्रसंग मोठ्या कौशल्याने त्या एकांकिकेत गुंफले होते. आम आदमीची प्रत्येक वेळेला कशी  प्रत्येक टप्प्यावर हारेशमेन्ट केली जाते हे दाखवण्याचा अफलातून  प्रयत्न त्यात केला होता. या व्यवस्थेचे आणि तुमचं नात काय ?, तुमचा गाल आणि आमची थप्पड..!! तुम्ही फक्त  मुकाटयाने गाल पुढे करा....आम्ही एक थप्पड  लावतो. थप्पड लगावण्यात एक प्रकारचा परमानंद असतो.हा आंनद दुस-याला देताना तुम्ही तक्रार करू नका.हसू नका पण सोसा.रडू नका फक्त कण्हा. तुमच्या गालात जर कुणी जोरात थप्पडं मारली तर तुम्ही काय कराल? आपल्या चिंतनशीलतेला भरपूर वाव देणारा हा प्रश्न आहे. ए...

पुष्पा-2:- राडाच पण हवाहवासा..!!

इमेज
पुष्पा-02:- एक हवाहवसा राडा..!! 'पुष्पा-02 तुम्ही  पाहिला का?' हा प्रश्न सध्या जनरली तुम्हाला कुणी ही कुठं ही विचारू शकतं.तुम्ही शाॅकेब्लस् व्हायचं नाही.साधा पिक्चर  आहे तो ..!!  नाही पाहिला तर नाही पाहिला त्यात काय एवढं? असं तर बिलकुल म्हणायचं नाही.मग 'पुष्पा-01चांगला होता की पुष्पा-02 ?' ओटीवर पाहिला की थेटरात?अशी अनेक प्रश्न तुम्हाला विचारली जाणार मग या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय देणार? आहे की नाही पंचाईत? पुष्पा-02  न पहाणं म्हणजे दिवाळीच्या सणाला लाडू न केल्यासारखं आहे.गटारी साजरी न केल्यासारखा कमी पणा आहे. अजून यांनी पुष्पा -2 नाही पाहिला रे.बिच्चारा...!! तुमची अशी कुणी कीव ही करू शकतं. तुम्ही चहा पितात,नास्ता करता,सिगारेट  ओढता ,जेवण  करता,पानं खाता आणि पुष्पा- 2 पाहत नाही? का पहात नाही तो? छे..छे..!! तुम्ही एक भयंकर चूक करत आहात. पुष्पा-2 पहाणं फार अपरिहार्य  करण्यात आलेलं आहे.कुणी केलेयं इतकं अपरिहार्य..?? तुम्ही  मला केलं.मी तुम्हाला केलं.आपणचं आपल्याला. पुष्पा-2 ने तुफान राडा केला बाॅक्स  ऑफिसवर...!! त्या राडा करणा-या गर्...