हा मराठी साहित्य, कविता, कथा, ललित लेख आणि सामाजिक विषयांवरील विचारमंथन यांसाठी एक उत्कृष्ट मंच आहे. येथे तुम्हाला भावस्पर्शी प्रेमकथा, प्रेरणादायी लेख, राजकीय विश्लेषण, तंत्रज्ञानविषयक माहिती आणि साहित्यिक चर्चांचे वैविध्यपूर्ण लेखन वाचायला मिळेल. मराठी भाषा आणि संस्कृती जोपासण्याचा आमचा प्रयत्न असून, नवोदित लेखकांसाठी हे व्यासपीठ खुले आहे. नवीन साहित्य वाचण्यासाठी आणि तुमच्या प्रतिक्रिया द्यायला आजच भेट द्या! मराठी ब्लॉग, कथा आणि कविता, मराठी साहित्य, ललित लेख, प्रेरणादायी लेख,मराठी वेबसाईट
शनिवार, १ मार्च, २०२५
अनोळखी सखी: जिंदगीची हुरहूर
गुरुवार, १९ डिसेंबर, २०२४
ग्रेटभेटः सुधीर रसाळ आणि साहित्य अकादमी पुरस्कार
ग्रेटभेटः सुधीर रसाळ आणि साहित्य अकादमी पुरस्कार
पुरस्कार राव,
हे लयं भारी झालयं बघ.गुरूवर्य सुधीर रसाळला सरांना तू एकदाचं कसतरी गाठलंस.
यार,तू लयचं लेट केलसं.
जाऊ दे ते. लेट पण थेट भेटलास.
हल्ली तू पण हॅक झाल्यासारखा वागतोस.चांगली
चांगली ग्रेट माणसं तुला भेटतच नाहीत बुवा. उगीच आपलं कुणाच्या भी गळयात पडतो. ग्रेट माणसाला तू शोधलं पाहिजे.तुझं भी इम्प्रेशन डाऊन नाही झालं पाहिजे ना?
काय म्हणतोयस ?गर्दीच लय झालीय..!!
तुझं भी खरं म्हणा.तू तरी काय करणार? काही माणसांनी तुलाचं कॅपचर करून टाकलयं!
त्यामुळे तुझा भी नाईलाजच असतो म्हणा. तू तरी काय करणार?
आता खारमुरे वाटाव्यात तसचं तुला कुणाच्या गळयात बांधतात म्हणल्यावर गर्दी तर होणारचं ना? देतेत म्हणल्यावर घेणारे येणारच ना? रेवडी पहिलवानाला काय कमी असते?ते तर कवा भी लंगोट बांधून उभीच असत्यात की.
क्काय..? हौसे नवसे गवसे सारेचं येणार ना?
पण पुरस्कारराव, प्राॅब्लेम काय होतोय. गुरूवर्य रसाळ सारखी ग्रेट माणसं गर्दी कसली घुसतेत?
ते तिकडं फिरकत भी नसतेत.त्यांच काय आडलं तुझ्या वाचून?
त्यांना तुला गळयात घालून तरी फिरायची थोडी हौस असते? ते थोडचं तुला मिरवित बसणार आहेत.
ग्रेट ते ग्रेटचं...!!
ऐवढं एक लयं झॅक झालयं बघ.तू कस तरी सरांना गाठलस.त्यांच्या गळयात पडलास.
बाबा, धन्य झालास तू.
नाहीतर तुझी काय कमी थू...!! थू ...!!! सुरू नाही.आपलं भी स्टेटस राह्यलाय पाहिजे ना?
अशाचं ग्रेट माणसाच्या शोधात राहत जा.तुझी भी इज्जत राहिल.
चांगल्या ग्रेट माणसाची संगत बरी असते.
माकडासोबत खेळतं बसल्यावर....तुझी तरी काय किमती राहणार?
सर, साहित्यसेवेसाठी केलेल्या अप्रतिम कामगिरीबद्दल आम्हाला तुमचा अभिमान आहे.आपलं हार्दिक अभिनंदन..!!
आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!
#साहित्यअकादमीपुरस्कार #सुधीररसाळ #मराठीसाहित्य
शुक्रवार, २० जानेवारी, २०२३
चेहरा वाचन
||आपुलाचं संवाद आपुल्याशी||
किताबे बहूत पिढी है तुने |
मेरा चेहरा मी जरा पढो||
बता दे मेरे चेहरे पे क्या क्या लिखा है||
हे बाजीगर चित्रपटातील गाणं फार लोक प्रिय झालं होतं.मला तर ते खूपचं आवडलं होतं.चेहरा पण वाचला जाऊ शकतो हे मला तेव्हा कळलं होतं.पुस्तकं वाचायचं सोडून मी चेहरे वाचत सुटलो होतो. अर्थात चेहरे वाचत बसणं सोपी गोष्टं नसते.फार रिस्की कामं असतं. ते काही दिवस मी करण्याचा प्रयत्न केला होता.चेहरे वाचण्याची काही लिपी वगैरे असते का? लिपी वगैरे काही माहित नाही पण कला मात्र जरूर आहे. त्या माणसाला न कळता आपण त्याचा चेहरा वाचू शकतो.प्रत्येक जणचं ते वाचत असतो. पोलिस खात्यातील लोक चेहरे वाचण्यात तरबेज झालेली असतात.
ओळखीच्या आणि अनोळखी माणसांचे पण आपण चेहरे वाचत असतो. समोर आला की आपण त्याला स्कॅन करत असतो.मनाच्या मेमरीत ते एकदा. डाऊन लोड केले की पुन्हा पुन्हा त्याला वाचत बसतो.आपल्याला भेटलेली सारीच माणसं लक्षात राहत नाहीत.सारीच माणसं कुठल्याश्या नाजूक नात्यांच्या धाग्यात गुंफली जात नाहीत.ह्रदयातल्या आपुलकीच्या ओलाव्यांन ओथंबून येतं नाहीत. बोलल्याशिवाय माणसाचं मन कळत नाही आणि दिसणा-या सा-यांच माणसाला आपण बोलू ही शकत नाहीत. सारीच माणसं आपल्याला कशाला बोलत बसतील?आपण नुसतं पाहून ही माणसं समजून घेत असतो. तसाच प्रयत्न असतो आपला.माणसाचे चेहरे पण बोलके असतात.
तुम्ही कुण्या नटाच्या किंवा नटीच्या प्रेमात पडलाय का कधी?एखादा खेळाडू,एखादी माॅडेल तुम्हाला जाम आवडली असणार.त्यांना आपण कधी भेटलेलो नसतो.भेटणारं ही नसतो. तरी ते आपल्याला का आवडतात?एखाद्या गर्दीत एखादा चेहरा मनात रूतून बसतो.संपूर्ण अनोळखी गर्दीत सुध्दा आपल्याला काही माणसं प्रेमळ, काही खडूस,काही लबाड,काही क्रूर,काही समजस़ वगैरे वाटत राहतात.अर्थात आपण त्यांना भेटलेलो नसतो.आपला चेहरा वाचला जातोय हे लक्षात आलंयं म्हणून ही काही सावरलेली, बावरलेली माणसं आपण पाहतो.
आपण जरं वाचलं जाणारं असू तर आपण सावध राहायला हवं ,नाही का? चेहरा प्रसन्न, सोज्वळ ठेवावा लागेल.अंतरंगच चेह-यावर उमटतं जातं.ते लपवता येत नाही.अ़तरंग चांगल कसं करायचं?चांगली पुस्तके आणि चांगली माणसं वाचायची. मग सोप्पं की. काय?
सुप्रभात
परशुराम सोंडगे
|| Youtuber|Blogger||
रविवार, ६ नोव्हेंबर, २०२२
आशा आणि त्याग
||आपुलाच संवाद आपुल्याशी||
या जगातील माणसाच्या दुःखाचं कारण आशा आहे.बुध्दांने शोधलेले मानवी दुःखाचं मूळ.आशेची पाळंमूळं खणून काढण्यासाठी माणसाची तडफड आपण अनेक धर्म ग्रंथाच्या पानापानावर पाहतच आलो आहोत.आशेशिवाय जीवन अशक्य आहे.वैराग्य,निरपेक्ष कर्म,अश्या अनेक संकल्पनाला माणसांनी जन्म दिला.त्यांची उकल करण्यातच आयुष्यभर माणूस झिजत राहिला.वैराग्य,निरपेक्ष कर्म यांचा अनुभव कुणी घेतला असेल बरं?कर्मकांडाचे जोखड आपल्या अंगावरती ओढून माणूस आशा नष्ट करण्यासाठी झुंजत राहिला.कुठल्याचं जीवाची पिच्छा आशा सोडत नाही.
जीव जीवनलोलूप असतो.मरण कुणालाचं नको असते.ते किती ही अटळ असलं तरी ही. त्याला हजारोवाटा असल्यातरी.
जगण्याची लालसा जीवाला संघर्षाच्या चरक्यात कोंबते.दुःखाची डोंगरची डोंगर अंगावर कोसळत असतानाही माणूस सुखाच्या क्षणासाठी धडपडत राहतो.
तुम्ही असा प्रसंग कधी पाहिला आहे का? नागाच्या जबडयात सापडलेला बेडूक.आपण जबड्यात असून ही समोरचा किटक पकडण्याचा त्याचा प्रयत्न.प्रयत्न केविलवाणा असला तरी जगण्याची लालसा जीवला जुंपून ठेवते. त्या बेडकाच्या जीभेवर वळवळणारी असते ना? ती आशा असते.
आशाचा समूळ नाश अशक्य आहे पण आशा कमी करू शकतो.इच्छा नष्टं नाही पण इच्छेची तीव्रता कमी करू शकतो. छाताडावर गोळया झेलतं मरणाला ही शरण आणणारे अतुलनीय शौर्य आपण पहातोच की.आशेचा त्यागाकडे प्रवास शक्य आहे.त्यागातून ही आनंद मिळतो. त्याग आनंदाचे साधन आहे.
मित्र हो,सोप्पं की मग आनंदाचा मार्ग.आपण योगी नाही पण जरा त्यागी तर होऊया.बघूया ना आज जमतयं का?
सुप्रभात...!!!
परशुराम सोंडगे
Youtuber|| Bloger||
शनिवार, ५ नोव्हेंबर, २०२२
सकारात्मक उर्जा
|| आपुलाच संवाद आपुल्याशी ||
माणसाच्या पाणी,अन्न,वस्त्र व निवारा या मुलभूत गरजा आहेत.
गरजांचा प्राधान्यक्रम आपल्याला योग्य ठरविता आला की आयुष्याचं पलॅनिंग जमलच की.
हल्ली गरजांचा प्राधान्य क्रम ठरविताना आपला संभ्रम होतो आहे.आपण नेमकं इथचं गोंधळून जात आहोत.
या मुलभूत गरजा इतकचं सकारात्मक विचारांनाही आपणं प्राधान्य दिले पाहिजे.श्रींमतीत व ऐश्रर्यात लोळत असलेली व शरीराने धष्टपुष्टं असलेली माणसं ही मनानं खचलेली असतात तर भिकारी,दरिद्री व विकलांग ही उत्तूंग स्वप्न उराशी बाळगून जग जिंकण्यासाठी धडपडत असतात.
विचारांची उर्जा बाहेरून लपेटता नाही येत.सकारात्मकतेची कॅप्सूल किंवा टॅब्लेट नसते बाजारात.ती अंतरंगातूनचं उसळावी लागते.मानवी पण हे प्रचंड उर्जेचा स्त्रोत आहे. मन ती उर्जा बाहेर फेकत असते.तिच उर्जा माणसाला आतून पेटवते,तेवत ठेवते.प्रखर करते.चकाकी आणते.
उलट नकरात्मक उर्जा माणसाला काळवंडून टाकते.काजळून टाकते.ग्रासून टाकते. निस्तेज करते. शेवटी माणसाच्या विझण्याचे कारण ठरते.
सुविचार वाचून माणसं सुविचारी होत नाहीत.शाळकरी जीवनात काय आपण कमी सुविचार पाठ करतो? चांगला विचार करणा-या सवयीचं गुलाम व्हावं लागतं.तीच गुलामी माणसाला या जगाचं सिंकदर करत असते.
सकारात्मक विचारच माणसाला आकाश कवेत घेण्याचं बळ देतो.नकारात्मकता माणसाच्या जीवनातील आनंद गोठून टाकते.पंखातले अवसान गिळुन टाकते.नकारात्मकताच माणसाला नैराश्यीच्या गर्तेत ढकलते.सकारात्मकता माणसाला यशाचं शिखरावर घेऊन जाते. सकारात्मकता व नकारात्मकता माणसाच्या विचार करण्याच्या पध्दती आहेत.फक्त कोणती ही गोष्टं सहज आणि सकारात्मकतेनं घेणं जमलं पाहिजे. ते तेज विलोभनीय असतं. या शिवाय सक्सेस पासवर्ड दुसरा नाही.जादूची कांडी हीच तर असते.
चला,आज सकारात्मकतेने ऊर भरून घेऊया.
सुप्रभात
परशुराम सोंडगे
|| Youtuber||Bloger||
रविवार, ३० ऑक्टोबर, २०२२
वीरचक्र विजेते माळी साहेब -अमर रहे
वीरचक्र विजेते तालुक्याचे भूषण माळी साहेब आपल्यात नाहीत ही गोष्टचं फार वेदनादायी आहे.संपूर्ण स्वच्छता अभियान मध्ये काम करत असताना त्यांच्या सोबत काम करण्याची संधी भेटली. वय झालं तरी कमालीची धडाडी व सकारात्मक विचारांची उर्जा त्यांच्या अंगी होती.त्यांच्या गावाच्या व पाटोदा तालुक्याच्या स्वच्छता चळवळीला गती देण्यामागे त्यांचा फार मोठा वाटा आहे.
आजची सकाळ शुभ नाही. माळी साहेब आपल्या नाहीत.ही अतंत्य दुंखद घटना आहे.मृत्यू जरी अटळ असला तरी आपल्या तून आपल्याचं एका माणसाला घेऊन जातो ही बाब जीवनाची क्षणभंगूरताच अधोरेखीत करते.मानवी जीवनाची ही पराधिनता सांगून जाते.
माळी साहेब शरीराने आपल्यात नसतील पण त्यांच्या आठवणी कायम मनात राहतील.तारूण्य ओसरलं तरी घडाघडी आणि जिद्द कशी उरात तेवत ठेवायची ,आपणच आपल्याशी प्रमाणिक कसं राहयच हे त्यांच्याकडून शिकायच. मी एकदा त्यांना विचारलं होत," वीर चक्र भेटलं यासाठी तुम्ही अतुलनीय शौर्य दाखवलं असेलच ना?"
ते हासत हासत म्हणाले," सरजी असं काही नाही.मी माझं काम प्रमाणिकपणे केले.अतुलनीय वगैरे काही नाही.मी लढाईत खेळत नव्हतो.मी लढाई लढत होतो.माझ्या समोर माझे नाहीतर देशाचे शत्रू होते.माणसानं आपलं काम प्रमाणिकपणे करावं.लोक तुलना करत असतात.कुणाला पायाशी,कुणाला डोक्यावर,कुणाला ह्दयात जागा देत असतात.दुस-याच्या ह्रदयात जागा मिळणे ही सात भारविकत घेण्या इतकी सोपी गोष्ट नक्कीच नाही.
त्यांच्या विचाराने आठवणीने ते कायम मानाच्या गाभा-यात तेवत राहतील.
माळी साहेब अमर रहे
शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०२२
पोळा
पोळयाचा सण महणजे बैलाचं लगीन. शेतक-याच्या आनंदाला या पारावर राहत नाही.बैलाची अांघोळ.खांदेमळणी,तेलपाणी,मिरवणूक आणि बैलाचं लगीन,पुरणपोळीचा घास.आपल्या शेतात राबणा-या बैलाला वर्षात प्रथमचं पुरण पोळीचा घास खाऊ घालून नंतर दोन घास खाले जातात.
हे सारं आता राहिलं नाही.पोळयाचा सण आलं की सारं आठवतं राहतं. पोरांना मातीची बैल आणून पुजील जाते.पोरं जमवून पोळयाच्या आठवणी उगळीत बसायच.पोळयाच्या जश्या चांगल्या आठवणीत तश्याचं या कडू आठवणी पण काळजाचा चावा घेत राहतात.
अशीच एक ह्रदय पिळवटून टाकणारी ही
दादा,
आज
पोळयाचा क्षण. मी आता कॉलेज वरून आलोय. आयीचं लयीचं फोन आलं
होतं.पोळयाचं
सणाला गावाकडं ये. गावाकडं ये.
पोळयाच्या सणाला गावाकडं येऊन काय करू? बैल जित्राब
नाही दावणीला आता.दावणं सारी सुनी सुनीच आहे. नाहीत.एक ही
दादा,खरं सांगू का? पोळयाला येऊच नाही वाटत मला
गावाकडं. पोळा आठवला की तुझ्या आठवणी नुसत्या झोंबत राहत्यात अंग भर आग्या मोहळाच्या माश्या सारख्या.आता तू जाऊन पाच सहा वर्ष झाल असतील.तो पोळा नि तू.ते बैलं…राज्या
नि
पवळया नुसत आठवत राहतात.
त्या साली मी नववीला होतो.त्या वर्षी ही आखडी पडली होती.आखडीच्या नंतर श्रावण चांगला बरसाला.झिम झम पाऊस सारखा चालूच राहीला.चांगला मूर पाऊस झाला होता.शेत ही तररारून आली होती.सारीकडं हिरवळ माजली होती.हिरव्या पोपटी रंगानं रान नं रान,शिवार नं शिवार रंगून
गेलं होतं.श्रावण्याच्या सरी ही अधून मधून बरसतचं होत्या.खांदमळणीचा दिवस म्हणून गुरूजीनं दुपारूनच सुटटी दिली होती.रानात बैल चांगल्या शेलक्या
बांधावर चारून चारून तू टम करून दिली होती.बैल जोगली होती.
उन्हं-पावसाचा खेळ चालूच होता.अधून मधून कोल्हयाचं
भी लगीन लागतचं होतं. तशाचत तू बैलाची कासर माझ्या हाती दिली.
शेजारच्या नालाबंडीत म्या लयं बैल
पोहीली.आंगाची साबण लावून बैल धुतली.चांगल्या
बांधाला चारले. दुपारपासून मीच बैल ताब्यात घेतली होती.बैलाचं खांदमळणीचा दिवस म्हंजी बैलाचा हळदची दिवस.पोळा म्हंजी बैलाचं लगीनचं असत ना?तशीचं तयारी घरात चाललेली.बैलाचं खांद मळून घेतलं होतं.तॅल पाणी केल.हिरवं हिरवं गवात टाकलं.आपल्या खिळयाच्या पटटीतून लुसलुशीत शिप्पी आणली होती.रातच आठ साडे आठ झाले असतील.तसल्या अंधारात शिंदया सावकाराचा शिव्या नि विक्राम्या आलं.वटयावर टेकलं सुध्दा नाहीत.उभ्यानचं तुला पैसं मागया लागलं,“सांग पैसं कवा देतो?”
शिव्या डाफरला.ते पावरातचं आला होता तेवळं असाचं
कुठं भी पाऊर दावीतचं असतो.
“देतो की.आता माल टालं झाला
की.” एकदम लव्हाळया वाणी वाकून तू म्हणलास.ते एकदमच ताठ होतं माडागत.
“शहाण्या, उग बाता कमून हाणतो रं?
कशाचा माल न टालं रं तुला? पावसानं असं हात आखडीलाय
व्हता. आखडी पउल्यामुळे सा-या धानाचं कॉळ झालं.तुहयचं बरं पीक आलय.”
“आखडीत तर पडलीचं होती.ती मला कशी
सोडीनं पण थोडं फार माल हुईलचं की.काळीमायचं वटी भरिली ती वांझ नाही जायची.काहीना काही पसा खोंगा पदरात टाकीणचं ना?”
“तुझ्या आसल्या मालाटालावर आमचं पैसं
फिटत नसतेत.कुठं दात टोकरून प्वाटं भरतं असतयं का?दुसरं काही तरी कर.पण पैस दे
आजची आज.” शिव्या डाफरतचं बोलला.
“दुसरं काय करू?म्या आसला फाटका माणूस दुसरं काय माझ्याजवळ?मोलमजुरीचं तर ते खायलाचं पुरतं नाय.”
“आर,मग कमी खात जा ना.”शिव्यानं मोठया आवाजातचं सल्ला दिला.त्याच्या तसल्या बोलण्यानं काळजाला पार डोबरं पडलं होतं.आय नि मी तर नुसतं गप गप झालोत.
“शिवा तात्या कसं
खातोत कसं राहतोत आमचं आम्हला माहीत.त्याचं ग-हाण
तुमास् सांगून काय उपेग? तुमचं देणं हाय. म्या काय नाय म्हणतोय का?”
“नाय म्हणतं नाहीस पण देत भी नाय.आर,
नाम्या तुचं सांग कव्हरं थांबायचं?”
“करा ॲडजेस्ट ,सिवाभैय्या.हातावरलं प्वाटं.पोरगं शिकतं.तिचं माग दुखलं.लयचं ज्यारं झालोय बघा.तुम्हला ठावं नाय व्हयं?”
“ठाव हाय मला सारं.मग काय करू आम्ही?दयावात का सोडून?”
“थोडा टायेम दया.पै ना पै देईल बघा.”
“ऐ तुझं तुणतुण नेहमीचं वाजू नको.ते ऐकायला इथं नाय आलो.तुझं हे कवा भी चालूचं असतं.बैल दिसतेत की.टाकायचं फुकून व्हायचं मोकळं.”
“बैल फुकून जमत्यात व्हयं?त्यांच्या जीवा वरचं चाललयं सारं.”
“सारं तुझचं कसं ऐकायचं? बैल घेतोत लावून… दुसरं हाय काय तुझ्याजवळ?”
“’शिव्या भैय्या,तसं नका करू.बैल गेल्यावर.हातचं मोडणं बघा माझं.”तू गयावया करत होतास.त्यांना काय त्याचं? ते इचार करतेत व्हयं?
“विक्राम्या सोड बैल.जाऊ दे याला मराठी कळतचं नाय.कव्हरं हयाचं रडगाण ऐकायचं?”
“असं नका करू.म्या काय पैसं बुडीतोय काय?आतापुतोरं कुणाच्या नरकात नाय गेलो कवा.”
“हे बघ.आमचं पैसं कुणीचं नसतं बुडीत.तुचं काय?शिंदया सावकराची पैसं बुडवीणारा जल्माचा अजून.
एखादा मेला तरी थडग्याकडून आम्ही पैसं वसूलचं करीत असतो.
पैसं आणून दी तुपलं बैल घेऊन ये.” विक्रम्या लगेच पुढं सरकला.खात्या दावणीचं बैलं सोडलं.तुझ्या देखतं.तू पुढा सरकला त्यांना गयावया करू लागला.शिव्या कुठं ऐकत असतो व्हयं?लगेचं शिव्या आडवा
आला.
“इंथचं थांबायचं.उग गाव जागा करायचा
नाय.पैंस आणायचं नि बैल घेऊन यायचं.उग नाटक केलं तर फोडून काढीत असतो.माहित ना तुला?”शिव्या नुसता दम देत होता.
“बैल का न्यायनात पण उदयाचा एवढा पोळयाचा सण हुदया.पैसं देयील नाहीतर महया हातानं बैल तुमच्या दावणीला बांधीनं.एवढा इश्वास ठेवा.खांदं मळीलेत.असं सणासुदीचा नका दावणं सुनी करू.”तू ज्यारं झाला तरी त्यांनी बैल सोडलचं.
“विक्राम्या थोबाड वर करून काय थांबलास. तेव्हं असंचं इव्ळत असतो.ओढेव बैल.”चरकात ऊस घालावा व पीळवटून रस काढवा.तसं तुझं झालं होतं.काळजाचा पार चौथा झाल्यागत उभा होतास.
“अहो,शिवाभैय्या,तॅल पाणी केल्यालं बैलाला.का असं करू.उदया सण झाला की आणून बांधतोत दावणीला.”
“लय देणारी होतीस तर कमून दिल्लं नाहीस आतापर्यंत.उदया काय जादू
करणारसे.का लॉटरी लागणारे काय?महीन्याचा
वायदा केला होता.नाय तर मागच्या महीन्यातचं ओढले असते बैल म्या.”
“महया पोरा शपथ सण झाला की बैल तुमच्या दावणीला बांधतोत
आणून.”आई विनवणी करत होती. पदर पसरीत होती.शिव्याचं काळीज लयचं निबार.त्याला पाणी फुटतयं
व्हयं?
“पोरांच्या शपथा कशाला खाती?आपल्याकडं
पैसंच हायेत त्यांच.तसं कसं कुणाच्या जित्राबांच्या कास-याला हात लावतेल.”आईला मागचं ओढलं. आईल माग ओढलं होतं तुम्ही पण तुमचं शब्द जड झालं
होतं.सोताच्या जीवापेक्षा जास्त जीव होता तुमचा आपल्या बैलावर.
विक्राम्यानं
बैल सोडलं.तेव्हं गोटयातून बैल बाहेर काढयला लागला.मला राहवलचं नाही.मी पळतचं गेलो नी पवळयाच्या गळयात मिठी मारली.विक्राम्यानं हातानी ढकलील पण मी मिठी सोडीणारचं
नव्हतो.
“नाय नेऊ देणार मी बैलं..नाय नेऊ देणार..”एकचं घायटा घेतला.बैलाच्या पुढच उभा राहिलो.शिव्यानं
भी मला ढकलनू पाहिलं.मी बैल सोडीतचं नव्हतो.
“आर, पोराला दापेव.हयो काय तमाश्या उभा केलाय.”
“अहो तात्या… त्याचा लयं जीव बैलावर.
आठ दिवसापासून.. त्यानं
फुगंन ते आणून
ठेवलेत.दया त्याला बैल रंगाचेत.लय नाद बघा त्याला.एवढा सण होऊस्तोवर
ठेवा.”
“बैलाची लयचं पोराला हौसं तर पैसं..फेकून दयावेत थोबाडावर.. बसावं
लाड करीत पोरांच.”
“आकाश्या, सोडं बैलं त्यांच.”
तू डाफरलास.मी रगेलवाणी तसाचं आडा उभा.
“त्यांचे नाहीत बैल.आपली बैलेत.
म्या नाय जाऊ देणार.”
“आर, बायको नि पोराला पुढं करून तू बरी मज्जा घेतोस.चांगली आयडीया गडया तुझी.”शिव्यानं असं तुला हिणीलं की तुझं
मशीन गरम झालेलंच होतं.दादा, तू मला हिंजाडलस
तरी म्या बैल नाही सोडलं.
“काय पोरग बुवा?बापाचं पण ऐकत नाही.”
तुझा रागाचा पारा वाढत गेला.तू सणासणा माझ्या थोबाडीत
हाणल्या.आयी धरायाला गेली तर तिला भी तू ढकलनू दिलं.फरा फरा मला ओढलं.
“जावा.. घेउन..” तू अजून ही दात ओठ खातच होता.मी थरथरं कापतं आईच्या पदरात शिरलो. आपल्या सा-याच्या समोर ते बैल घेउन गेले.तू राग रागचं घरात गेलास चंगाळी.गोंड,फुगं रेबनं सारा चवाराचा सराजम तू एक एक पराळात मांडला.आम्ही सारं बघत होतो.आता तू हे काय करतोस?
“आता काय करता?” तुमचं हात धरतं आई
म्हणाली.
“देतो काडी लावून.टाकू फुकून.मालकचं गेल याचं.पोळयाच्या सणाला दावणीला जितरांब नाही.कशाचं कुणबाटतं आपून.हे सारं कश्याला ठेवायच?”
“असं येडयावाणी करीत असतेत काय?” तुझ्या
हातातली काडी घेत आई म्हणाली. चंगाळी, गोंडं
,घुंगरं सारं फेकायाला लागलास.भिताडावर हाणायाला लागलास.रागानं इतका लालबुंद झाला होतास.धाप लागली होती.
“हयो सराजम नक्कू ठेवू डोळया पुढं.नुसतं आतडं तुटतेत तटातटा.”
आय तशीचं थिजून गेली.तिनं तुला काडयाच पेटी नाही दिली.अंगणातला सारा सराजम गोळा केला. डोळया देखत बैलं नेलं.तुझ्या काळजाला ढोबरं पडलं होतं.तू
जेवला नाहीस.कुणीचं जेवलं नाही.सुतकं पडल्या सारखं सारं गपगप झाले.
सकाळी सकाळी तू आणि भऊ बैल घेऊन आलात.आंनदाला पारावर राहिला नाही माझ्या.मोठया थाटात आपण पोळा साजरा केला.तो आपला शेवटचा पोळा साजरा झाला. उचलं घेतलीस.बेलापूराला गेलास.पोळा साजरा करण्यासाठी तू तुझं अख्ख आयुष्याचं काटयावर घातलं होतंस.कर्जाचा डोंगर वाढत गेला नि एक दिवस हे जग.. सोडून गेलास.आईला मला सोडून गेलास.हे जग इतकं दुष्ट आहे तरी तू आम्हला तसाच या जगात का ठेऊन गेलास,दादा
आता मी रामकाटीच्या रानात उभा.ते आंब्यांच झाङ माझ्या डोळयासमोर.आयघलं वठलं आता.ज्याला तू लटकून तुझं आयुष्या संपवून टाकलं. भऊ नि रम्यानं ते बैल चारतेत रानात.पोळयाचाच दिवस ना आज भी… मला काहीच पाहू नाही वाटत आता. नुसती तुझी आठवण येते रे.वाटतयं तू.. बैल घेऊन येशील.म्हणशील पोहवं बरं बैल..आकाश्या….
तसं होणार नाही.तू कसला परत येतोस आता.आसल्या दुनियेत येऊ भी नक्कूस.दादा तुज्या शपथ सांगतो मी पोळयाचा सणचं कधीचं
साजरा करणार नाही.ज्या सणानं माझा दादा माझ्या
पासून हिरावून नेला तेव्हं सण मी साजरा नाही करणार.. नाही करणार…
कुण्बटयाचा शिक्का मला पुसून टाकायचा.. पुसून टाकायचा.
झापूक झुपूक मराठी चित्रपट समीक्षा | Zapuk Zupuk Marathi Movie Review in Marathi | Suraj Chavan | Kedar Shinde
झापूक झुपूक : हास्य, हृदय आणि हिट संगीत यांचा परिपूर्ण मेळ..!! झापूक झुपूक मराठी चित्रपट Suraj Chavan | Kedar Shinde झापूक झुपूक मराठी च...

-
युध्दं पेटले आहे – जगण्याचा चंग आणि संघर्षाच्या गर्जना करणा-या माणसांच्या कविता. 'युध्द पेटले आहे 'हा बाळासाहेब नागरगोजे यांचा पहिला...
-
धर्मयोगिनी अहिल्यादेवी- आजच्या पिढीला मूल्यांचा आरसा दाखवणारं पुस्तक परीक्षण : सोंडगे परशुराम , बीड 9527460358 धर्मयोगिनी अहि...
-
पाराकं आरगन वाजल . बॅन्डवाल आलं . ते आलं की सलामी देत्यात . आरगनाचा मोठा आवाज सा - या गावात घूमू लागला . तशी बारकाली पोरं ... पोरी चींगा...