तृष्णा, स्वप्न आणि मानवी विकारांचे महाकाव्य : वि. स. खांडकरांची ‘ययाती’
तृष्णा, स्वप्न आणि मानवी विकारांचे महाकाव्य : वि. स. खांडकरांची ‘ययाती’ मराठी साहित्याच्या पटलावर वि. स. खांडेकर यांचे नाव एका दीपस्तंभासारखे आहे. खांडेकरांचे इतर सर्व साहित्य वाचल्यानंतर जेव्हा वाचक ‘ययाती’ या कादंबरीकडे वळतो, तेव्हा त्याला एका गोष्टीची प्रकर्षाने जाणीव होती—लेखकाने आपल्या संपूर्ण आयुष्यातील विचारांचा, जीवनविषयक तत्त्वज्ञानाचा आणि समृद्ध भाषाशैलीचा ‘अर्क’ या एका कादंबरीत ओतला आहे. १९६० चे साहित्य अकादमी पारितोषिक आणि १९७९ चा सर्वोच्च 'ज्ञानपीठ पुरस्कार' मिळवणारी ही कलाकृती आजही वाचकांच्या पसंतीस उतरून 'बेस्ट सेलर' (Best Seller) च्या यादीत अव्वल स्थानी विराजमान आहे. स्वप्नरंजकता की मानवी आशेचा धागा? खांडेकरांच्या लेखनावर अनेकदा अशी टीका केली जाती की त्यांनी 'वास्तविक जगण्यापेक्षा' स्वप्न, कल्पना आणि आदर्शांवर जास्त भर दिला. परंतु, माणसाच्या आयुष्याचे मूळ सत्य हे आहे की—स्वप्न आणि आशा हाच माणसाच्या जगण्याचा खरा धागा असतो. कठोर वास्तवाच्या दाहकतेत होरपळणाऱ्या माणसाला जेव्हा साहित्यातून एका स्वप्नाळू आणि तात्त्विक जगात नेले जाते, तेव्हा त्या ...