पोस्ट्स

मुद्दे आणि गुददे लेबलसह पोस्ट दाखवत आहे

महाराज, हे पाप कशाने धूवायचे? कीर्तनाला ही गर्दी होऊ शकते.इंदुरीकर तरुणाईला कीर्तनाकडे मोठया संख्येने आकृष्ट करून घेण्यात कमालीचे यशस्वी झाले. त्यांची भाषा विनोदी आहे.उपहासात्मक आहे.व्यंग निर्माण करणारी आहे.ती अस्सलं बोली भाषा आहे.प्रमाण भाषेचा वापर ते करत नाहीत. इंदुरीकर लोकप्रिय होण्याची कारणे अनेक असले तरी ते फार स्पष्टं बोलतं.स्पष्टं आणि खरं बोलले लोकांना आवडतं. त्यामुळेच लोकांनी त्यांना डोक्यावर घेतले होते. इंदोरीकरच्या कीर्तनाची भाषा ग्राम्य असली तरी ती अनेकदा अश्लील व शिवराळ असते.लोक इंदुरीकरला शिव्या खाण्यासाठी पैसे देतात असं ही बोललं जातं. "या बोंकाडी बसा..!!" पठ्याच्या एका डायलॉवर गाणं निघालं.अनेक वरातीत गाजलं.अनेक बेवडे त्यावर थिरकले पण. समाजातील व्यसनाधीनतेवर व अनिष्ट रूढी परंपरेवर ते प्रखर बोलतं असतात. इतकं कटू बोलणं ही लोक एन्जॉय करायचे. इंदुरीकर यांच कीर्तन या व्याख्येत बसत नाही अशी ओरड काही दिवस चालू होती.पुन्हा असल्या विनोदी कीर्तनाची लाटचं आली. कपात माशी पडली तर दूध फेकून देतात येतं. दुधाच्या कढईत जर माझी पडली तर काय करणार? स्वच्छ पाणी शिंपडून कढईतले दूध पवित्र करण्याची प्रथा आहे. तसचं झालं. लोकांनी कीर्तनाच्या नावाखाली कसले ही जोक विनोद सहन केले. वारकरी संप्रदायात कीर्तनाचा एक साचा आहे.त्याची एक शैली आहे.त्याची एक अचारसंहिता आहे.वारकरी संप्रदायाच्या पडठीत इंदुरीकराचं कीर्तन बसत नाही. हल्ली अनेक कीर्तनकाराची कीर्तने वारकरी संप्रदायाचे अचारसंहिता न पाळणारे आहेत. इंदोरीकर एकटेच नाहीत. व्हाटस्ॲपवरचे जोक सांगून,किस्से सांगून करमणूक करणारे कीर्तनकार ही शेकड्याने आहेत. विनोदाचार्य,समाजप्रबोधनकार,गायन सम्राट अशी बिरुदावली घेऊन कीर्तनाचे धंदा करणारे उदंड झाले आहेत. पक्ष व पुढा-यां मागे लाळ घोडमारे ही अनेक पाहिले आहेत. इंदुरीकर व तश्याच धाटणीच कीर्तनकार वारकरी संप्रदायातील लोकांना आवडत ही नाहीत. त्यांना नाही आवडलं तरी लोकांना ते फार आवडतात. आज ही इंदुरीकरांच्या दोन दोन वर्षाच्या तारखा बूक असतात.लोकांना, ते हसवतात.डोळ्यांत, अंजन घालतात.लोकांना इंदुरीकरचं कीर्तन जाम आवडतं. ते,अध्यात्मिक आनंद देते असं नाही पण ते एन्टरटेनमेंट चांगल करतं. इंदुरीकर एका अखंड हरिनाम सप्ताहातील कीर्तनात स्पष्टं बोलले होते की लाख दीड लाखाचा इंदुरीकर व पाच सहा लाखाचा ढोक महाराज ऐकण्याची ऐपत नाही तुमची तरी तुम्ही तो खर्च करता. देव तुमचं भलं करो. इतकं स्पष्टं बोलून ही त्यांच किर्तन लोक आज ही ठेवतात.ऐकतात. आता कीर्तन हा धंदा झाला आहे.उदरनिर्वाहाचं साधन झाले आहे. अनेक जण त्याच्या कडे करिअर म्हणून पाहतात. त्यातील अध्यात्मिक ढाचा गळून पडला आहे. धंदा कुणी कोणता ही करू शकते.कीर्तनाचा धंदा करणं हाडाच्या वारक-याला आवडणार नाही. त्यांना ते पचत नाही. लोकांना मनोरंजन प्राधान्य किर्तन आवडतात. कीर्तनकार ही तसचं किर्तन करतात. लोक वर्गणी करून लाखाच्या खर्चाचे सप्ताह करतात.काही संस्थानाच्या सप्ताहाच्या कीर्तनाचे बजेट कोटीत असतात.लोक वर्गणी करून ते खर्च करतात.लोकांना ते परवडत पण. हरी किर्तन करताना पैसे घेऊ नयेत.तिथं जेऊ,नये.चंगळीत व चैनीत जीवन जगू नये असे अनेक संत प्रमाण आहेत.किर्तनकार सांगतात पण तसं वागत नाहीत. उलट किर्तनकार भलं मानधन घेतात त्याचं ही समर्थन करतात. गावागावात स्पर्धा लावून सप्ताहाचे मोठे इव्हेंट साजरे करून घेतले जातात.महागाडया गाड्या घेतात. ख-या सुखाची व्याख्या करताना अनेक कीर्तनकार भौतिक सुखात गुरफटत जातात. 'संसार दुःख मूळ' आहे हे सांगताना अनेक किर्तनकार त्यात जखडून गेले आहेत. ऐश्वर्य तर ते जमा करतातचं पण त्याचं प्रदर्शन ही करतात. मत्सर तर महाराज लोकांत पराकोटीचा असतो. कोणत्याही जीवाचा ना घडो मत्सर हे कोण्या तोंडानी महाराज सांगतात काय माहित? अध्यात्मिक मूल्य जोपासणारे अनेक महाराज अडगळीत पडले आहेत.लाखोचे मानधन स्वीकारून अनेक बड्या नेत्याच्या,वाढदिवसाला हे महाराज लोक किर्तन करतात. आपले मानधन वाढवून ते आपला बाजार भाव ही वाढवून घेतात. मार्केटिंगचे अनेक फंडे ते आमलात आणतात.आपलं नाणं टिकलं पाहिजे. ते वाजले पण पाहिजे. असा आटोकाट त्यांचा प्रयत्न असतो. 'बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले" असं म्हणतात. बोलणं सोप असतं. तसं वागणं अवघड असतं. इंदुरीकर महाराजांचं पण हेच चुकलं आहे. ते ज्या प्रमाणे बोलत आले तसं वागणं अपेक्षित होते. लोक अपेक्षा ठेवणारं. त्यांना ते जमलं नाही. समाजप्रबोधनकार इंदुरीकरचा त्यांच्यातला बापाने पराभव केला. मोहमायात ते गुतत गेले. षट्कार विजय मिळवणे सोपे नाही. आता अनेक महाराज इंदुरीकरचं समर्थन करताना तुम्हालाच दिसतील. ते अनेक वाईट प्रथाच उदात्तीकरण करताना ही दिसतील. मराठा समाज मुलीच्या लग्नात बडेजावपणाने मोठा खर्च करतात.हे एक मराठा समाजाच्या अर्थिक मागासलेपणाचे कारण आहे. सकल मराठा समाजाने हगवणे हुंडाबळीच्या प्रकरणा नंतर साधेपणाने लग्न करण्याचा एक मनोदय व्यक्त केला होता. जे करून ह्या प्रथेला आळा बसेल. ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनी खर्च केला तर काय होते? विवाह सोहळ्यावर ही अनेकांची पोटं भरतात असा ही युक्तिवाद केला जातो. श्रीमंत व प्रसिध्द लोकांनाच सामान्य लोक फालो करत असतात.श्रीमंत लोकांनी साधे लग्न केले तरचं हा पायंडा पडणार आहे.तरच गरीब लोक कर्ज काढून लग्न करणार नाहीत. हे पायंडे कुणी पाडायचे? गरीब लोकांना तर आपण श्रीमंत आहोत याचा आव आणायचा असतोच.भिका-याला हि भिकारी म्हणून नसतं मरायचं. इंदोरीकर महाराज,तुम्ही साधं लग्न करायचं. लोकांनी डोक्यावर घेतलं असतं तुम्हाला.आता किर्तन कसले बंद करता? का फेटा ठेवता? वारकरी संप्रदायातील ही घाण कोण साफ करणार आहे? इथून पुढ जर काही चांगलच करायचं असेल तर फुकट किर्तन करा.कशाला मानधन घेता? व्हा की जरा खरं संत. किर्तनकार पैसे घेणे हे जर तुम्हाला पाप वाटत नसेल तर तुम्ही वारकरी संप्रदायाशी व संतपंरपरेशी प्रतारणा करत आहात. दया फुकट सल्ले. कीर्तनाच्या गादी कलंकित करण्याचं पाप शेकडो महाराज करत आहेत. हे पाप कशाने धूवायचे? घ्या शपथ की एक रूपया ही मानधन घेणार नाही. तुम्ही जसं स्पष्टं बोलतात ना तसचं बोला पण तसं वागायचा प्रयत्न करा. पुढा-यांच्या दावणीला बांधलेले काही महाराज आहेत त्यांची सुटका करा.या,दास्यातून...!! पक्षाची तळी उचलणारे भटीगंण त्यांच्या डोळ्यांत थोडं अंजन घाला. जाती जातीची पाटलाकी करून जातीयवाद पोसणा-याच्या गढया पण उध्वस्त करा. इंदुरिकर महाराज पुन्हा किर्तन करा...!! शेवटी ही सारी घाण कुणी काढयाची? वारकरी संप्रदायाची निर्मळ गंगा अखंड वाहिली पाहिजे मानव जातीच्या कल्याणासाठी. या विश्वस्वधर्म सूर्य पाहण्यासाठी....!!!

इमेज
 महाराज, हे पाप कशाने धूवायचे? कीर्तनाला ही गर्दी  होऊ शकते.इंदुरीकर तरुणाईला कीर्तनाकडे मोठया संख्येने आकृष्ट करून घेण्यात कमालीचे यशस्वी झाले. त्यांची भाषा विनोदी आहे.उपहासात्मक आहे.व्यंग निर्माण करणारी आहे.ती अस्सलं बोली भाषा आहे.प्रमाण भाषेचा वापर  ते करत नाहीत. इंदुरीकर लोकप्रिय होण्याची कारणे अनेक असले तरी ते फार स्पष्टं बोलतं.स्पष्टं आणि खरं बोलले लोकांना आवडतं. त्यामुळेच  लोकांनी त्यांना डोक्यावर घेतले  होते. इंदोरीकरच्या कीर्तनाची भाषा ग्राम्य असली तरी ती अनेकदा अश्लील व शिवराळ असते.लोक इंदुरीकरला शिव्या खाण्यासाठी पैसे देतात असं ही बोललं जातं.  "या बोंकाडी बसा..!!" पठ्याच्या एका डायलॉवर गाणं निघालं.अनेक वरातीत गाजलं.अनेक बेवडे त्यावर थिरकले पण. समाजातील  व्यसनाधीनतेवर  व अनिष्ट  रूढी परंपरेवर ते प्रखर बोलतं असतात. इतकं कटू बोलणं ही लोक एन्जॉय  करायचे. इंदुरीकर यांच कीर्तन या व्याख्येत बसत नाही अशी ओरड काही दिवस चालू होती.पुन्हा असल्या विनोदी कीर्तनाची लाटचं आली.  कपात माशी पडली तर दूध फेकून देतात येतं. दुधाच्या कढईत जर माझ...

गलिच्छ राजकरणाचा भाडखा प्रशासनाचा बळी ठले डाॅ.संपदा मुंडे.

इमेज
 सरकार आमचं.सत्ता आमची.इथं फक्त आमचं चलं पाहिजे. खासदार,आमदार कुणी असेल? वठं तर आपलाच पाहिजे.  आमच्याशी वाकडं तर नदीवर लाकडं. नोकरी करयाची तर आमच्याशी जुळून घ्या. आमच्या चमच्याशी पण. चेल्याचपाटयाशी पण..... सरंजामशहा असल्याच्या फिलिंग आल्यात अनेक राजकारण्यांना....  ते आणि त्यांचे लाडाचे पाडाचे कार्यकर्ते स्वतःला जहागिरदार समजात.  प्रशासनात पण असे काही चेलेचपाटे असतात. अधिकारी नि पुढारी यांच्यासाठी यांनी कासेची पण सोडलेली असते. प्रशासनातोल हरामखोर अवलादीमुळे राजकारण्याच फावत.  प्रामाणिक, स्वाभिमानी व कर्तव्यकठोर अधिका-याचा डाॅ. संपदा  मुंडे केला जातो.  तुम्ही लाचार असलं पाहिजे. तुम्ही गुलाम असले पाहिजे  सच्चेपणाचा,कर्तव्य निषठतेचा व जनसेवेचा, देशप्रेमाचा पुळका आणला की आम्ही...खपवून नाही घेत. डाॅ.संपदा मुंडे यांची आत्महत्या हा सज्जन नागरिकाला आणि प्रामाणिक अधिका-याला दिलेला सज्जड दम आहे. कळत ना? चड्डीत राहायचं...!!! न्याय द्या..!! न्याय द्या..!!! म्हणून कसली घसाफोड करता तुम्ही? कुठं राहतो तो न्याय? कसला असतो न्याय ? काळा की गोरा...?? गलिच्छ राजकारणाच...

हाके मिटकरी आणि प्राण्यांची सभाLaxman hake and Amol mitkari

इमेज
Laxman hake and Amol mitkari जंगलात सर्व प्राण्याची तातडीने एक सभा भरली.वाघ,सिंह,खोकडं,गेंडे,हत्ती,कुत्री,मांजर,डुक्कर,गाढव कोल्हा,हरीण,ससे एक नाय सारचं प्राणी झाडून आले होते. विषय काय होता तर?माणसं देत असलेल्या शिव्या. Laxman hake and Amol mitkari "त्यांच्या शिव्या आणि आपली सभा कमून बोलीली? माणसा सारख्या बुध्दिमान माणसाच्या फंदयात आपून कशाला पडायचं?"  चतुुर कोल्हयांनं प्रश्न उपस्थित केला.त्याचं भी खरचं होतं.माणसाच्या विरोधात सभा घेऊन काय होतं? "माणसानं त्यांच्या आया बहिणीचा उद्दार करणा-या शिव्या खुशाल द्याव्यात.आपल्याला फक्त मधी घेऊ नये एवढीचं माफक इच्छा. !!" माकडं म्हणालं."ते कशाला आपल्याला मध्ये घेतील? ते माणसं आहेत. सुसंस्कृत असतात.त्यांना धर्म,संस्कृती वगैरे असते." चित्याने स्पष्टीकरण  दिले' Laxman hake and Amol mitkari' "कशाची डोंबल संस्कृती त्यांची? गेल्या आठवड्यात नाही पाहिलय का तुम्ही हायवेवर काय करत होते? आम्हाला हाय शंकराचा शाप पण माणसांना काय?खुशाल भर रस्त्यावर..छी..!!लाज वाटली बुवा आपल्याला." एक कुत्रं आपली व्यथा मांडत बोलल...

आपण फक्त क्रिकेटचे प्रेक्षकरूपी ग्राहक आहोत

इमेज
  RCB नामक कोणे एका टिमच्या विजयोत्सवामध्ये 11 चाहते चेंगरून मरण पावले. जे झाले ते दुर्दैवीच .IPL-2025    #कथा आणि व्यथा आयपीएल-2025 विजयी मिरवणूक बंगलोर  वास्तविक पाहता IPL वगैरे हे शुद्ध व्यवसायिक गणितं डोळ्यांसमोर ठेवून आयोजित केलेला तद्दन व्यवसाय आहे. लिलाव होतात खेळाडूंचे. ते ही ठीक. मनोरंजनही ठीक. प्रत्येक देशाचा एक स्वभावधर्म असतो व त्यानुसार त्या देशाचे वर्तन असते. तशी भारताची राष्ट्रभक्ती ही पाकिस्तान व क्रिकेट या दोन गोष्टींवर ऊतू येते. यानंतर ती कोमात जाते. वास्तविक पाहता उद्योजकांनी विकत घेतलेल्या या संघांचा आणि देशाचा नेमका काय संबंध ? काही उत्पादनांची खरेदी -विक्री व टॅक्स सोडला तर देशाशी याचा संबंध नाही. देशतपातळीवरील क्रिकेट टिम ही देशासाठी खेळते असाही एक समज सातत्याने बिंबविण्यात आला आहे. वास्तविक पाहता हा संघ BCCI या खाजगी संस्थेसाठी खेळतो. यापुढेही कमाल म्हणजे जगात 200 पेक्षा अधिक देश आहेत आणि 12 देशातल्या स्पर्धेला हे विश्वचषक (World Cup ) म्हणवून घेतात. अगदी अलीकडच्या काळापर्यंत या 12 देशांमध्ये इंग्लंड व ऑस्ट्रेलिया देश सोडले तर बहुतांशी मागास द...

गुणवत्ता यादी बंद असातना कोण मुलांना जीवघेण्या स्पर्धेत ढकलत आहेत? Merit list

इमेज
      SSC Merit list प्रस्तावना   नुकताच म हाराष्ट्रातील दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल लागला . गुणवंत विद्यार्थ्यांचे सोहळे , कौतुकाचे ढोल वाजवधक सुरूच आहे. गुणवंतांना प्रोत्साहन पण पाहिजे.अलीकडे याचा ही बाजार सुरू करण्यात आला आहे. ज्या उददेश्यांनी सरकारीनी ही यादी बंद केली. ते सारे हेतू धूळीस मिळवण्याचे काम काही लोक करत आहेत.आता जिकडे तिकडे जाहिरती सुरू आहेत. गुणवत्ता यादीत आपणच कसे अव्वल आहोत अश्या जाहिरती करण्यात येते आहेत.क्लासची आणि खाजगी शाळांची त र सुगी च सुरू होते. पालकांना चुकीची माहिती देऊन त्यांना प्रभावित केले जात आहेत. पण , महाराष्ट्र सरकारने गुणवत्ता यादी ( Merit List) बंद केली असतानाही , खासगी शाळा आणि कोचिंग क्लासेस बनावट यादी तयार करून पालकांना आकर्षित करतात. तसेच अनेक खाजगी परीक्षा उन मुलांना मानसिक ताणास व जीवधेण्या स्पर्धेत ढकलत आहेत. शालेय प्रशासन या सा-या गोष्टीकडे दुललललर्लक्ष करत आहेत.           सरकारने गुणवत्ता यादी बंद करण्यामागील कारणे आणि खासगी संस्था तसेच प्रसारमाध्यमे याचा ...

साहित्य, शिल्प, नाटक, तमाशा व चित्रपट – सत्तांतरासाठीचे विषारी साधन

इमेज
  साहित्य, शिल्प, नाटक, तमाशा व चित्रपट – सत्तांतरासाठीचे विषारी साधन " Love lovestory in Marathi " Chhaava-Hindi move( Vicky Koushalya) | Love lovestory in Marathi  |  Motivational story in Marathi  |  Suvichar Marathi   |   Good Morning Quotes Marathi  |  Lifestory in Marathi  |  Top love story in Marathi प्रस्तावना मानवी इतिहासातील प्रत्येक युगात मनोरंजनाच्या माध्यमांचा उपयोग केव ळ करमणुकीपुरता मर्यादित न राहता समाजमन घडविण्यासाठी, विचारप्रवृत्ती बदलण्यासाठी आणि जनतेचे भान जागविण्यासाठी केला गेला आहे. साहित्य, शिल्पकला, नाटक, लोककला, तमाशा आणि कालांतराने चित्रपट या सर्वांनी समाजाला विचारप्रवण केलं आहे, त्याच्या विवेकाला चालना दिली आहे. समाजातील असमतोल, शोषण, अन्याय, रूढी-परंपरांची चिकित्सा या माध्यमातून प्रभावीपणे केली गेली आहे. या लेखात आपण या सर्व कलामाध्यमांनी समाजात केलेल्या प्रबोधनात्मक कामाची चिकित्सा करणार आहोत. भारताच्या आणि इतर देशांच्या संदर्भात याचा उपयोग कसा झाला, त्यातून काय सामाजिक परिवर्तन घडून आले, आणि सत्तां...