एकाचं एक सण असा होता तो आमच्यावर फुल डिपेंन्ड असायचा.पोरा नि जर शिमगा लयं सिरीअस नाही घेतला तर आमच्या भेटू पाटलांकडून लयं टेन्शन यायचं.लाकडं गोव-या कश्या आणणार.लोक लयीत दिलदार असत्यात.त्यांना म्हटलं कुणी लाकड किंवा गोव-या आणा तर कोण आणतोय. सारं हात हालवली येणार.त्यामुळे पाटलांकडून आमची म्हणजे बाप्पाची व परम्याची गँग लागे.तेव्हा सरकारला नापासाची चिंता नसे.आमचा बाॅस बप्या सलग पाच बा-या नापास झाला होता.त्याच्या बरूबरची पोरं पार दहावीला गेले.हा आमच्याच वर्गात.सा-यात टोंगळा..!! त्याची सरकारला नाही व कधी त्याच्या बापाला ही नापास होतोय म्हणून चिंता वाटली नाही. बप्या तर डेंजरस माणूस होता.
टेन्शन लेने का नही देने का? हा त्याचा मंत्र.
भैरू पाटील देई आम्हाला चिमकून.पाटलाचा पाठींबा भेटला वर आम्हाला कोण आठवीत असतं? तेव्हा कॅलेंडर हा प्रकार नव्हताच.मग शिमगा जवळ आलाय हे कसं कळणार? गोव-याची कलवड व लाकडं लोकांनी लपायला सुरू केले की,आम्हाला क्लिक होणार.शिमगा आ रहा है. करो तय्यारी..!!
आमच्या गँगचा प्रमुख बप्या त्याला टेन्शन येणार गोव-या व लाकडं जर नाही चोरली तर शिमगा कसा होणार? मग काय शाळा सुटली की,आमचं हे धाडसत्र सुरू होणार.कुणाच्या परसात शिर, कुणाच्या गोठयात शिर.कुठून कुठून गोव-या सरपण आणलयंच जायचं.जाताना लपून छपून जायचं.येताना मात्र बोबलत यायचं.आम्ही सारी होळीची लेकरं....
आडव येईल त्याला मूठ मूठ खापरं. बोलला आता..!!
कधी हरताळ खेळत जायचं.लाकड घेऊन यायचं.छत्रपती महाराजांचा गनिमी कावा मास्तर आम्हाला शिकवी.त्याचा उपेग आम्ही शिमग्याच्या सणासाठी वापरतं.गनिमी कावा करूनचं आम्ही हे करत.सुरांची लूट केल्यासारखं आम्हाला ते वाटे.त्यात बाप्या आणि गँग कुणाचा कसूर भी काढत.घराच्या भांडणाचा भी राग निघ.एखादयाचा आख्खा कलवड खल्लास करायचा.बोलायची सोय नाही.होळीचं लेकरं...!!कोण ऐकून घेतेय? गोव-या लाकडं नाही आणलं की होती कशी करणार? आमच गॅग जुळली की अजून एक दोन गँग ही आम्हाला येऊन मिळत.
होळी है बुरा न मानो ही बोंब तर ठरलेलीच असे.
आम्ही असं चोरून गोव-या वगैरे आणतो हे आमच्या घरी ग-हाणं केलं.कुणी टोमणं मारलं,तर मग मर गया वहो. आमच्याशी वाकडं,म्हंजी परसात नाही लाकड . असा पंगा घेणारं कुणी भेटलं तर त्याच्या मागे आम्ही बोंबलत चालणार. त्याला पार जेरीस आणणार.
गावात आम्ही असं मेहनत करीत म्हणून होळी पेटवली जायची. गोव-या लाकडं आणण्यचं कोण? भला मोठा डोंगर रचावा तसा लाकड व गोव-याची होळी रचली जाणार.पाटील ती पेटवणारं.तिचा डोंभ झाला की पोरं...नुसते बोंब मारत. त्या भोवती नाचतं.
एक होत पोरी आणी बाया तिकडं फिरकत नसतं.लयी घाण घाण...शिव्या पोरं देणार. घाण बोलायचं.बोबंलायचं. उड्या मारायचं...!! नुसती मज्जाच मज्जा...!! पोरं शिमग्याची दिवशी लयी भी उंडारू नाहीत म्हणून शाळाला मास्तर सुट्टी देत नाहीत अस आम्हाला पक्कं वाटत होतं. शाळाला सुट्टी नाही दिली तरी आम्ही थोडचं शाळेचं तोंड बघणार असतो.एखादा शाळात गेलाच तर सारे जण त्याला घेरात घेई.त्याला कशाची तलप होणारयं पुन्हा?
लाकडं गोव-या चोरी न करता मागून घ्यावीत बोंब मारू नाही असे छान छान सुविचार आमचे सर सांगत पण आमच्या गावची लोक फार दलिदंर ते सहजा सहजी लाकडं नि गोव-या देत असतेत व्हयं? सरला काय माहितीयं? पाटलांचा भी रेटा असचं की.लाकडं नि गोव-या चोरलची का पण लय भारी मज्जा असते?होळीच्या लेकराला कुणीचं काय म्हणतं नसे.घरी एखादं कलागत व्हायची पण त्याला काय आम्ही जुमानत नसतं.घरी जायचं.पोळी नि दूध वरपायचं? आलेच बाहेर.भारी मज्जा असे.गोकूळया लयं भारी सोंग घेणार. पारध्याचं. झोळी घेणार.. फाटकं तुटक बंडी घालणार." तुकडा वाढं ग माय म्हणणार. पालख्यांच्या आवाज काढणार. त्याच्या मागे चिगुरखाना असे. नुसती फिदीफिदी हसतं.
तेव्हं फक्त भज्याची भीक घेणार. दुसरं काहीचं झोपी घेणार नाही.
"आयला,हयो लयीचं माजुरा पारधी दिसतोय लका." असं कुणी म्हणं.तसं गोकुळात फुगत असे.घरोघर फक्त भजं मागत फिरत चांगल पाचपन्नास घर घेतली की ते साँग कुठं तरी थांब. त्याला रामदास्या हेल्प करी.भजाचं लयी मोठा स्टाॅक त्याच्याकडे होई पुन्हा आमची गँग त्या भजावर तुटून पडे. गोकुळात आमचा बाॅस असे.अशी बोळीतले सोंग सारे मंदिरापाशी येतं.मग ऐका ऐकाच सोंग साजरं होई.ते सोंग म्हणजे नुसता तमाशाचा असे.स्क्रिप्ट नाय आणि ब्रिप्टं नाय.लगेच सुरू.
एखाद्या वर्षी जर ह-या ना-याचा तमाशाला आला तर सोंग आटोपते घेतं.तमाशाला रंग चढे.तारी व वैशी या नायकीणी पारं माणसाला येडं करून सोडीत.त्यांच चावट बोलणं.पोर सोरं- पोरी बाकी म्हतारी कोतारी तरणी ताठी माणसं एन्जॉय करीत.संस्कार बिस्कारं अश्या भानगडीत कुणी पडतं नसे.तमश्या नाही आला की सोंग रंगत जाई.ना-याचं सोंग ठरलेलं असं.ना-या खर तर सालगडी पण सोंगात मालक होऊन राहयचा.त्याचा लयं रूबाब असे.त्याचे तीन सालगडी असत. गडयाच व मालकाचं हे सोंग फारच रंगे.मालक गड्याला नुसतं पळी.गडी भी सटकरं असावी लागतं. नुसता पळू पळूच घाम निघे.
माजं घोंगड कुठे रे? मालक जोरात घोंगड फेकून देई. गड्याने घोंगड आणून द्यायचं तेव्हां गडायाचं लंगोट फिटायचंमाझं लंगोट फिट रे.
माजं गठूठं कुठं रे... मालक भिर्र दिशी गुठंठ फेकून द्यायचा. त्या तीन गडयाची हालहाल करून सोडं. लोकांची मात्र हासून हासून पोटं दुःखाची येळं येई. नुसता हशाच हशा..!!! शिमगा असा फुल्ल एन्जॉय करतं.दुस-या दिवशी तर धुळवडचं.कसले रंगबिंग आलेत.चिखूल, रेंदा आणि गटारचं पाणी यानचं माणस एकमेकाला बरबटून घेतं.सिलव्हर कलर फासून कुणी ही कुणाचं माकडं करून टाकत असे.
गडी माणस ब-यापैकी चंद्रावर गेलेली असतं. ते हवेतच चालतं.त्यात छुटूरमुठूर कलागती भी होतं पण बेवडयाच्या कलागती कोण सिरीअस घेतयं? माणसाला सारं हवं असे.आता यातलं काहीचं राहिलं नाही.सारं सारं संपून गेले आहे. शहर बदली आहेत तसे गावं ही बदली आहेत. गोव-या लाकडं आता पाहयाला भेटत नाहीत.पर्यावरणाचं पण टेन्शन नव्हतं तव्हा.आता सण आला की पर्यावरणस्नेही नावाचे प्राणी येतात जगाची चिंता करत बसतात असले चिंतातुर जंतू फार नव्हते. गावची पंग झालेली माणसं जग बुडत म्हणल्यावर कंबर कसून कामाला लागली असती.नाय तरी हे जग कुणाला पायजे असते?
आता माणसं सोशल मिडीयावर होळी साजरी करतात फेसबुक व व्हाटस् अप वरून शुभेच्छांचा धो धो पाऊस पाडतात.होळीच्या शुभेच्छा देतात. दुर्गुणांचा नाश केला जातो. आपण आपले दोष जाळून टाकण्यासाठी होळी पेटवायची असते.असे सारे म्हणतात.होळी तर दरवर्षीच येते.पेटते पण सद्गुणी माणसं कुठचं दिसतं नाहीत. नेमकं होळीत आपण काय जाळत आहोत?
होळी नि संस्कार ? हे नाय बुवा आपल्याला पटतं.
होळी फुल्लं एन्जॉय करायचा सण..!! उपदेशाचा डोस पिण्याचा नाही.
मस्ती करायचा सण..!!
आता ठरवा.आपुन काय करायचं?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा