एका काॅलगर्लची डायरी भाग 4| प्रेम, वेदना आणि समाजातील सत्यकथा
Callgril's,Dairy पो लिस स्टेशनच्या आवारात गाडी शिरताना राधा मॅडमच्या लक्षात आलं.गर्दी फारच झाली आहे. मिडीयाची एवढी गर्दी ? त्या जरा सावध झाल्या.वर्दीत असलं की सावरायचं म्हणजे नेमकं काय कराचयं? सावरायला व आवरायला वर्दीला थोडाच पदर असतोच?आपल्या केसावर हात फिरवला.शर्ट थोड नीट केलं.अधिकारी असल्यातरी अनेक पुरूषी नजरांना समोर जावं लागतच ना?शेवटी एका स्त्रीच शरीरचं ते.आंबट नजरांना कसं रोखणार?तेवढयात त्यांचा मोबाईल वाजला. "राधा देसाई ना?” समोरून आवाज आला. “ येस.. हो मीच बोलतेय. आपण कोण?” अनोन नंबर होता. “रमेश सांवत सर बोलताहेत आपल्याला?”रमेश सांवत विरोधी पक्ष नेता.फार बेरकी माणूस. गावठी. “मॅडम्, हाय का टायेम आमच्यासाठी दोन मिनीटे.” “असं का बोलता? बोला ना?” असचं कुचक काचक बोलणार. “त्या गृहमंत्र्याचं ऐकून आमच्या नका घालू तंगडयात तंगडया.” उगीच गडगडाटी हासलं. ते हासणं नकली होत. “असं काय नाय? कायदयासमोर सारी माणसं सारखीच असतात.कायदा भेदभाव नाही करतं. सरकार –विरोधी असं काही नाही.”त्याला काय उत्तर दयावं म्हणून त्यांनी हे स्पष्टीकरण दिल. “त्या प्रकरण...