एका काॅलगर्लची डायरी भाग 4

Callgril's,Dairy
पोलिस स्टेशनच्या आवारात गाडी शिरताना राधा मॅडमच्या लक्षात आलं.गर्दी फारच झाली आहे. मिडीयाची एवढी गर्दी ? त्या जरा सावध झाल्या.वर्दीत असलं की सावरायचं म्हणजे नेमकं काय कराचयं? सावरायला व आवरायला वर्दीला थोडाच पदर असतोच?आपल्या केसावर हात फिरवला.शर्ट थोड नीट केलं.अधिकारी असल्यातरी अनेक पुरूषी नजरांना समोर जावं लागतच ना?शेवटी एका स्त्रीच शरीरचं ते.आंबट नजरांना कसं रोखणार?तेवढयात त्यांचा मोबाईल वाजला.
"राधा देसाई ना?” समोरून आवाज आला.
“ येस.. हो मीच बोलतेय. आपण कोण?” अनोन नंबर होता.
“रमेश सांवत सर बोलताहेत आपल्याला?”रमेश सांवत विरोधी पक्ष नेता.फार बेरकी माणूस. गावठी.
“मॅडम्, हाय का टायेम आमच्यासाठी दोन मिनीटे.”
“असं का बोलता? बोला ना?” असचं कुचक काचक बोलणार.
“त्या गृहमंत्र्याचं ऐकून आमच्या नका घालू तंगडयात तंगडया.” उगीच गडगडाटी हासलं. ते हासणं नकली होत.
“असं काय नाय? कायदयासमोर सारी माणसं सारखीच असतात.कायदा भेदभाव नाही करतं. सरकार –विरोधी असं काही नाही.”त्याला काय उत्तर दयावं म्हणून त्यांनी हे स्पष्टीकरण दिल.
“त्या प्रकरणाचं काय झालाय?तपास कुठपर्यंत आलाय?” मूळ मुद्दयाला हात घातला.
“कुठल्या प्रकरणाचा?” मॅडमनी पण वेडयाचं सोंग घेऊन पेढं खायचं ठरवलेलं दिसत होतं.त्या प्रकरणाशी याच्या एका निकटर्वीयाचं नाव घेतलं जाऊ लागले आहे. मिडियात तीन दिवस चांगलेच गाजत आहे.ब्ल्यूस्टार हॉटेलचे मालक नितीन शर्मा. ब्ल्यूस्टार हॉटेल आणि त्याचा मलाक सा-या देशाला माहीत झाले होते.आपण मिडीयाला बोलायचा पूर्वी काही मिनीटे हा कॉल येतो हा निव्वळ योगायोग तर मुळीचं नव्हता.आपण मिडीयाशी बोलणार आहेत ही गोष्ट याला इतक्या तत्परतेने कशी कळली?आपल्या सहकार्याविषयीचा संशयाचं व्हायरसने त्यांच्या मेंदूत शिरकाव केला. ते खरं होतं.त्या मिडीयाशी बोलणार आहेत हे फक्त एसटी ऑफिसला व चौधरीलाच माहित होतं. या थेरडयाला कसं कळलं.?
“असं काय बोलता?त्या हॉटेलात सापडेल्या भोंगळयाबाईच्या डेड बॉडीचं प्रकरण.”हा माणूस नेहमीच असं विचित्रं बोलातो.भोंगळी शब्दापेक्षा दुसरा पर्यायी शब्द वापरता नसता आला का याला?आपल्याचं पुरूषी ड्रायव्हरसमोर तो शब्द ऐकणं त्यांना लज्जा आणणरं होतं.त्या सांवतला नसेल लाज पण त्यांना होती ना?भोंगळी शब्द ऐकला आणि मॅडमच्या डोक्यात एक प्रकारची चीड निर्माण झाली.असं जाऊन तसाच हातातला रॉड त्यांच्या टाळक्यात घालावा असं त्यांना वाटलं.
“ती भोंगळी डेड बॉडी बेवारस आहे.”राधा मॅडमने ही मुददाम तसाच शब्द उच्चारला. इतक निर्ल्लज कधी कधी व्हावंच लागतं.
“बेवारस आहे पण…त्या राईकर माकडीनीला उगीचं चेव आलाय. चांगलचं काठीचं कोल्हं उभं केंल तिनं?”
“राजकरणात कुणी काठीचं कोल्हं करू किंवा ससं करू.काही फरक पडत नसतो.सत्य असं थोडचं लपवून ठेवता येतं? तपासा अंती ते बाहेर येईलच.” मॅडमनी टिपीकल सरकारी उत्तर दिलं.
“लबाडाचं तोंड लयं मोठं असतं.”
”आमची तपासाची दिशा योग्य आहे आणि आम्ही लवकरचं या गोष्टीचा तडा लावू.”
“प्लीज,मॅडम,असं सरकारी नका बोलू.”
“आम्ही काय करू शकतो?”
“मिडीयाचं तोंड बंद करा ना?"
"एवढा विश्वास देते की काही दिवसातचं दूध का दूध और पानी का पानी होईल.”
“पत्रकार परिषद घ्या. दया ठोकून.वाढवा चॅनलवाल्याचे टी आरपी. तुमचं एक एक सेन्सटेन्स ब्रेकींग न्यूज होतयं बघा आज.”
“आम्ही काय ब्रेकींग न्यूज देणार?”
“ तुम्ही नुसता बोलला तरी न्यूज आज. ती रायकर बाई नुसती पादली तरी त्याच्या ब्रेकींग बनवल्यात चॅनवाल्यांनी. फुल्लं फॉम्र मध्ये ती आता.” महिला आयोगाच्या रायकर मॅडमवर त्यांचा फार राग होता. राजकरणात राग असून काही उपयोग नसतो.वेळेची वाटचं पहावी लागते.
“ब्रेकींग न्यूज करणं हे आमची डीयुटी नाही.”
“हे बघा,ती भोंगळीच मेलेली सापडली म्हणल्यावर वेडं भी सांगल तिथं काय झालय?ती काय आरती करायला आली असेल का आसल्या हाय फाय हॉटेलात?ती तसलीच असणार?”
“कसली?”मॅडमचा एकाक्षरीच प्रश्न पण सांवतला फारचं अडचणीत टाकणारा होता.त्या प्रश्नातून त्या बाईकडे पाहण्याचा दृष्टीकोन कळणार होता.बाईकडेंच नाही संपूर्ण प्रकरणाविषयीचं त्याचं मत व्यक्त होणार होतं? कदाचित तपासाला दिशा ही..!!
“कसली म्हणजे तसली? फालतु…!!! कॉलगर्ल् का फॉलगर्ल असेल.”
”असू ही शकेल? तीनशे दोन तीनशे शहात्तरचं मॅटर ते.यात व्ही आय पी ही असू शकतात.पोलिस सा-या शक्यता गृहीत धरूनच काम करते आहे.”
“आता तसल्या बाया हॉटेलवर आल्यावर मालक काय दुर्बीण घेऊन थोडाच बसणार आहे?बॉडी ताब्यात घ्यायला कुणीच आल नाही.असल्या बायाला कोण माझं म्हणणार आहे?शर्माच्या हॉटेलात ते झालं म्हणून त्याला हया मॅटर मधी ओढू नका.खंदा तुमचा बंदूक मुखमंत्रयाची आणि गोळया गृहमंत्रयाच्या आहेत.आमच्यावर कराल ठो ठो…!!!”ते हासत बोलत आसला तरी तो घाबरला असावा.आवाजात एक थरथर जाणवत होती.मॅडमच्या तीक्ष्ण कानाने ते हेरलं होतं व कुशाग्र बुध्दीने ताडलं होतं.
“दुर्बीण नाही पण त्यांच्या हॉटेलमध्ये झालय.पोलीसाला सहकार्य अपेक्षीत.”
“बस्सं एवढचं ना? इमेज डॅमेज होतेय.दुसंर काय? काही बोला पण तेवढ मिडीयाला बोला आज. तेवढं पुरावे मागा त्या रायकर बाईला. तिला आपटा जरा दातावर.तपासाचा जरा स्पीड वाढवा.खरं खोटं आणा बाहेर.मग बघा.कसे टराटरा बुरखे फाडतो मी त्यांचे. आसल्या लबाड लांडगयाचे कपडे फाडायला लयं मज्ज येते आपल्याला.”
“त्यासाठी अजून थोडा वेळ दया आम्हाला.
“मिडीयाला दया काही तरी माहीती म्हणजे बसेल आख्खा मिडीया दोन दिवस ते चघळतं.”
"एव्ढच ना .आता बोलणारचं आहे मी मिडीयाशी? समोर जत्राच माझ्या…”त्यांचा फोन कट करून मिडीयासमोर जाणं आवश्यक होतं.सारे कॅमेरे त्यांच्यावरच रोखलेले होते.सांवतच बोलणं पुर्ण होताचं त्यांनी फोन कट केला होता.
एका हॉटेलमध्ये अशी एखादी डेड बॉडी सापडणं खर तर ही एक पोलीसासांठी सामान्य घटना होती.जी बॉडी सापडली होती.ती संपर्णं नग्न होती आणि ही घटना एका फाईव्ह स्टार हॉटलेमध्ये घडली होती जे की ते हॉटेल एनएस ग्रूपच्य मालकीचं होतं.एनएस ग्रूपचे सर्वेस्वा नितीन शर्मा हे नाव महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते रमेश सावंत यांच्या निकटर्वीतीय म्हणून महाराष्ट्र ओळखत होता.मिडीयाला या दोन तीन गोष्टी सनसनाटी करण्यासाठी पुरेश्या होत्या.विरोधी पक्षाला राजकरणासाठी. सांवत त्या राजकरणाच्या भोव-यात सापडले होते.
दोन तीन दिवसापासून बातमी सा-या मिडीयात वाजत होती.राधा मॅडला त्याचं प्रेसर नव्हतचं असं नाही.अश्या तपासात प्रेसर घेऊ नाही हे जर खरं आसलं तरी प्रेसर हे येतचं असतं.राज्यातील राजकारण चांगलच तापलं होंत.इतक निराधार बेफीकीर राजकारणी बोलू शकतात.वारंवार मिडयासमोर बोलत राहणं हे तपासाठी चांगल नसत पण नाही बोललं की पोलीसावर ही गंभीर अरोप केले जातात.एंकदरीत पोलीसाच्या हेतूवर व कामावर प्रश्न चिन्ह उभे केले जातात.
एसपी ऑफीसच्या सूचनेनुसार त्या आज मिडीयाला बोलणार होत्या. नेमक काय बोलावं आणि काय बोलू नाही हे मनात घोळत होतं.तसल्या प्रचंड गलक्यात त्यांनी बोलायला सुरू केले.
"ब्ल्यू स्टार हॉटेलमधील सापडलेल्या डेड बॉडी प्रकरणाचा तपास यंत्रणा करत आहेत.तीन पथका मार्फत तपास चालू आहे.तपास योग्य दिशेने होतो आहे.मृत्यू की आत्महत्या ? का अपघात या बाबत ठाम नित्कर्षापर्यंत आम्ही अजनू पोहचलेलो नाहीत.तपास यंत्रणा ही कुणाच्या प्रभावाखाली नाही. सापडलेली डेड बॉडी ही बेवारस घोषीत करावी लागली आहे.कुणी ही ती ताब्यात घेण्यासाठी पुढे आलेले नाही. त्यामुळे कुणाचं प्रेसर पोलीसावर असणारचं नाही.मयता कुणी वाली नाही.हे लक्षात घ्या.
त्या दिवशी जे प्रवाशी हॉटेलमध्ये होते.त्यांना काही लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.हॉटेलचा मॅनेजर आणि इतर स्टाफमधील दोन जण व एक वॉच मन पोलीस कोठीत चौकशसाठी आहेत.गुन्हेगार सराईत असले तरी आम्ही सत्य लवकरचं शोधून काढू. त्यासाठी आमहाला वेळ हवा आहे.”अगदी थोडक्यात मोजक्या शब्दात मॅडमीनी निवेदन संपवलं.पत्रकाराकडे जर हजार प्रश्न असले तरी निवडक प्रश्न घेण्यात येणार होते.
“ ती कोण होती?” एका चष्मा घातलेल्या पत्रकार बाईने प्रश्न विचारला.
“ती सारा मंगेश वाडकर आहे पण तिचा ॲड्रेस सापडला नाही.जे पुरावे हाती आलेत त्या अर्था ती साराचं आहे.”
“ती सारा वाडकर आहे याचे पोलींसाकडे काय पुरावे आहेत?”
“पोलीस सा-याच गोष्टी जाहीर नाही करू शकत. सॉरी..!!!”
“असं कळलं की त्या दिवशी हॉटेल मालकाचा मुलगा. विवेक शर्मा हा पण इथेच मुक्कामी होता.” एका गुळगुळीत चेह-याच्या पत्रकाराने हा प्रश्न केला.
“असू शकेल?हॉटेल त्याच्या बापाच आहे.तो एकटा नाही असे सतरा लोक येथे मुक्कामी होते. त्यात काही फॅमीली पण होत्या.चौकशी सा-याची केलीजाणार आहे.”
“पोलीस अधिकारी बडे,युवा नेता कृष्णाराजे जाधव या व्ही आय पीची पण नावे आहेत का? ते नावे असल्यामुळे पोलीसावर प्रेसर आहे.”
“असे अनेक लोक आहेत.काही पत्रकार ही आहेत.पत्रकार आहेत म्हणून कुणी बातम्या दाखवयच्या बदं करणार आहे का? अश्या बोलण्यात काही तथ्यं नसतं. पोलिसावर ”
“इथं थांबण्याचे सर्वांचे कारणे तपासावे लागणार आहेत.पोलीस ते काम करत आहेत.त्या सर्वाचे कॉल डिटेल्स ही घेतले आहेत.”
“आयोगाच्या अध्याक्षां रायकर यांनी थेट आरोप सांवत वर केले आहेत.त्याबददल तुमचं मत काय?”
“पोलीस या विषयाकंकडे गंभीरपणे पहात आहे.पुराव्याशिवाय कुणावरच कार्यवाही होणार नाही.”
“रायकर मॅडमकडे पुरावे आहेत.असे जाहीर सांगत आहेत. त्यांना मागणार का?”
“कुणाकडे ही पुरावे असतील किंवा महत्वाची माहिती असेल तर ती पोलीसांकडे दयावी. पोलिसांना पुराव्याची ॲलर्जी नसते.तुमच्या माध्यमातून जनतेला आव्हान करते.सर्वांची नावे गोपनीय ठेवले जातील. अजून आम्हाला थोडा वेळ दया. सत्य लवकरचं बाहेर आणू. थँक्स…!!”
राधा मॅडम ताडकन उठल्या. पत्रकार परीषद संपली. पत्रकार ही पांगले होते.सा-या चॅनलवर ब्रेकींग न्यूज सुरू झाल्या होत्या.पोलीस स्टेशनमधिल टी.व्ही स्क्रीनवर राधा मॅडम त्यांचीचं पत्रकार परीषद त्या पहात होत्या.आपण कश्या बोललो? कश्या दिसतो? यापेक्षा त्यांना हा प्रश्न सतावत होता.
'सारा वाडकर ही तिची खरी ओळख असेल तर ती शुभांगी पवार सारखी ती कशी दिसते? तिची बहीण ? तिची डम्मी असेल का सारा? का शुभांगीनीचं सारा नाव धारण केलयं?'
( पुढील भागावर)
टिप्पण्या