एका काॅलगर्लची डायरी भाग 2

call gril
एका काॅलगर्लची  डायरी 

 

                                                           

         भाग -2

ब्ल्यूस्टार हॉटेलच्या भव्य हॉल मध्ये लग्‍नाच्या गर्दीत राधा मॅडमला अचानक आवाज आला.त्या वर्दीतच होत्या.त्याचं एकमेव महिला त्या लग्नात असतील की त्या साडीत नव्हत्या.नटलेल्या,सजलेल्या नव्हत्या. त्या ऑनडीयुटी सहभागी झाल्या होत्या.त्यामुळे वर्दीतच होत्या.

“तुम्ही राधा.. देसाई ना?”ओळखीचा चेहरा.ओळखीचा आवाज.कोण असावा याचा अंदाज त्या बांधत बसल्या.खरतर त्यांना काहीच आठवत नव्हतं.गर्दीत असं कुणी तरी अचानक येते आणि डायरेक्टं नावानंच बोलत.त्यावेळी इतकं गोंधळून तर माणूस जाणारच ना?एक सुंदर बांधेसूद तरूण महिला त्यांच्याकडे हासत येत होती.काही क्षण त्या नुसत्या तिच्याकडे पहात राहिल्या.त्या एकटयाचं तिच्याकडे पहात नव्हत्या.अनेक नजरा तिच्यावर खिळल्या होत्या.ती बाई नटलेली असली तरी ओव्हर मेकअप मुळीच केला नव्हाता तिने.

“मी बरोबर असेल तर….?”ती गोड हासत ती बोलली.हासताना ती अधिकची सुंदर दिसली.ओठांच्या गुलाबी पाकळयाच्या मधून तिचे शुभ्र दात चमकले.ओठांचा गुलाबी रंग आणि दाताची शुभ्रता या रंगसंगती मुळे ते हासणं कमालीचं आकर्षक दिसत असेल का?
“हो.तुम्ही बरोबरच आहात पण… सॉरी हं..!! मी ओळखू नाही शकले.”राधा मॅडम खजिल झाल्या.

“माणूस मोठया पदावर गेलं की जुन्या ओळखी विसरतचं.इटस् नॅचरल.”तिनं खंत व्यक्त केली.आपली बेधडक नजर त्यांच्या डोळयात घुसवत ती सुंदर व तरूण महिला बोलली.
“असं काही नाही पण आपण नककीच फार दिवसांनी भेटत असू.मे आय राईट?” तिच्या  खांदयावर थोपटतं मॅडम बोलल्या.त्यांच्या मेमरीत बरचसं काही क्लिक झालं होत.आठवत बरचसं काही होत पण नेमके संदर्भ जुळत नव्हते.
“तब्बल दहा वर्षांनी.”
“तुला सारं इतकं आठवते आहे आणि मला का नाही?”राधा मॅडमनी डोकं खाजवून पाहिलं.थोडसा मेंदूला ताण देण्याचा एक प्रयत्न केला.तितकसं नीट आठवल नाही.
“आता तू मोठी ऑफीर्स झाली ना?”
“असं काही नाही ग.वेट प्लीज...!! ”राधा मॅडमनी थोडासा वेळ घेतला.डोक्याला बोटं लावून फिरवल. स्क्रू फीट केल्यासारखं.खरंच असं काही केलं की आठवत असेल काय? त्या मोठयाने ओरडल्या.
”शुभांगी…पवार…!!मे आय राईट?”
“आहेत म्हणायचं आमच्यासारखी माणसं अजून आठवणीत. थँक्यू..मॅडम.”
“शुभ्दे.थँक्यू कायम्हणतेस? अग किती बदलीस….? कशी ओळखू येशील? तुझा लूकच इतका बदलाय की.”
“माझा लूक आणि तुझा वट.”
“जशी जशी म्हतारी होत जाशील तशी सुंदर होत जाणार आहेस की काय तू?”तिच्या खंदयावर हलकीशी चापट मारत राधा मॅडम बोलल्या.
“तुझं आपलं काही तरीच असतं.”मॅडमचं कौतुकांन तिला ओशाळल्यासारख झालं.खजीलपणाची एक पुसटशी छटा तिच्या चेह-यावर उमटली.
"इतकं कसं फीट ठेवलसं ग तू?असं काय खातेस? का काही जादू तुझ्याकडं?”त्या तिच्या शरीराकडे सूक्ष्म पहात होत्या.
“तुम्ही काय कमी नाहीत?एकदम…”तिनं हातांनी छान अशी ॲक्टींग करत म्हटलं.
“एकदम काय?...??”राधा मॅडमला ही आपली स्तुती ऐकण्याची अपेक्षा झाली.स्तुती न आवडेलं असा माणूस या पृथ्वीवर राहत असणं अशक्यचं की.
“हॉट ॲन्ड सेक्सी पण..!!”हासत आणि मुरडत मॅडमच्या हातावर टाळी देत ती बोलली.
“तुझं आपलं काहीतरीच..” राधा मॅडमच्या चेह-यावर लज्जेचे पुसटसे रंग गडद झाले.
                  हा संवाद मात्रं त्यांच्या शेजारी असलेल्या राठोड या डीवायएसपीन ऐकला.त्याच्या ओठात एक स्मित रेषा मॅडम स्पष्टच पाहू शकल्या.एका पुरुषासमोर एका स्त्रीच्या सौंदर्याची स्तुती कशी करावी?काय वाटलं असेल त्यांना. दोघीनं एकमेंकीकडे पाहिलं.दोघी ही वरमल्या.दूर जाऊन बोलत्या झाल्या.आता आपण नक्की सुरक्षित अंतर घेतले आहे याची खात्री केली.चहा,गप्पा झाल्या.कॉलेजच्या  अनेक आठवणींचे पदर त्या किती तरी वेळ उलगडत राहिल्या.
“अग.लग्न केलस की नाही?”राधा मॅडमने प्रश्न केला.इतका औपचारिक प्रश्न विचारावा लागतो म्हणून त्यांनी विचारला.
“ते तर प्रत्येकालाच करावं लागतं ना? तू…??” आपण उत्तर न देता तिनचं उलट प्रश्न केला.राधा मॅडमला त्यात दोन शक्यता जाणवल्या.एक तर हीच अजून लग्नच झालं नसावं किंवा झालेले लग्ना संदर्भात ती आंनदी नसावी.आपल्याबरेबर शिकणा-या पोरीची लग्न कुणासोबत झालं आहे हा एक जिज्ञासाचा विषय असतो.
“केलयं की.बँकेत असतो विवेक.तुझा नवरा..?” काहीच कारण नसतानी राधा मॅडमनी नाव पण सांगून टाकल.
"नवरा होता मला पण आता नाही.”
“काय झाल ग?”
“झालं काही नाही ग.माझ्या शिवाय राहयचं त्याला.तो राहतो माझ्या शिवाय आणि मी त्याच्या शिवाय?” नव-याशिवाय कशी राहते ही? त्याला ही तसं का वाटावं? राध मॅडमला अनेक प्रश्न पडले पण त्यांनीते विचारले नाही. कुणाची भळभळती जखम असेल तर आपण कशाला खपली टोकरायची? तिच्या वैयक्तिक जीवनात इतक कशाला डोकायचं. खरतर आपण लग्ना विषयी प्रश्नचं मुळी विचरायला नको होता.खंत वाटली.
“सॉरी हं.मला तुला दु:खवायचं नव्हतं.” 
“दु:खवण्यासारखं काही नाही.सा-याचं लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधतात असं काही नसत.काही लग्न हे अपघात पण असतात.अपघात हे आपल्याला किती ही नको असले तरी घडतच असतात की.”ती उदास हासली.फारश्या त्या पर्सनल त्या झाल्या नाहीत.तश्या त्या फारश्या पर्सनल नव्हत्याच मुळी. औपचारिक निरोप घेऊन त्या पांगल्या.ती एक योगायोगाने भेट झाली होती.त्या भेटीनंतर कधी तिची पुन्हा कधी भेट झाली नाही.

                           आज अचानक ती भेटली.हा पण योगायोगचं.आपल्याचं कार्यक्षेत्रात तिला असलं विचित्र मरण यावं. मरण अटळ असलं तरी ते पण चांगलं यावं अशीवअपेक्षा आपण करतोच की.कोणत्याचं स्त्रीला असं मरण येऊ नये.कसल्या भंयकर अवस्थेत सापडली ती आपल्याला.काय घडावं आणि काय घडू नाही हे आपल्या हाती नसतं.जे घडलं ते फारच विकृत आणि भंयकर होत.सारा वाडकर नावाच्या  एका तरूण सुंदर स्त्रीचा मृत्यू झाला आहे आणि त्याचा तपास आपल्याकडे आहे.हे सत्य आहे.

                   त्या हॉटेलमधील दृश्य राधा मॅडमच्या डोळयासमोर पुन्हा एकदा तरळल.नग्न मृतशरीर.पडलेले अस्ताव्यस्त अंतवस्त्रं.कंडोम. वापरलेले.न वापरलेले…!! सताड उघड ठेवलेलं दार.अनेक पुरूषांनी ते शरीर पाहिलं.डेड बॉडी असली तरी संपूर्ण नग्न शरीर पुरूषांनी पहावं ही त्या स्त्री देहाची विंटबनाचं नव्हे काय?अनेक मर्डर पाहिले.तपास केले पण असा मर्डंर?त्या सारा वाडकर या स्त्री बरोबर त्या रात्री काय काय झालं असेलं?अनेक शक्यतांचे तरंग त्यांच्या मनात उमटू व विरू लागले.कोण असेल तो? एक असेल? दोन?बलात्कार असेल की? ती तसली असेल? का काही तिची मजबुरी असेल काही ? नुसते तर्कविर्तक मनात घोळत राहिले.तर्काच्या शेपटाला कुठं शेवटं असतो?
               पोस्टमार्टंम व फॉरन्सीन्क लॅबचे अहवाल आल्यानंतर ब-याच प्रश्नांची उकल होणार होती.त्यांच मन स्थिर राहत नव्हतं.तपास करताना फार इमोशनल होऊन जमत नसत.केस स्टडी करताना त्यां भवनांचा परिणाम  केसच्या तपासावर होत असतो.सत्य दूर जाऊ शकते.तपासाची दिशा ही बदलू शकते.तपास भरकटू ही शकतो.त्यासाठी ह्रदय दगडाचं करावं लागत ऑफिर्संना.हया केसमध्ये किती ही नाही म्हटलं तरी इमोशनल टच त्यांना होता.सारा वाडकर असेल तर त्या भावबंधनात जास्त गुरफटणार नाहीत.एक स्त्री म्हणून त्या डेड बॉडीशी त्यांच्या काही संवेदना नक्कीच गुंफल्या गेल्याचं होत्या पण सारा वाडकर हीच जर शुभांगी पवार असेल तर? त्यांना स्व:तला फार सावरावं लागणार होत.आवरावं लगणार होत.
शुभांगी  पवारचा हासरा चेहरा त्यांच्या डोळया समोरून  सरकत होता.डोक्यात व मनात त्यांच्याकाही घडत असेले तरी त्यांची गाडी मात्र वेगाने धावत होती.

                  (पुढील भाग लवकरचं)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

युध्द पेटले आहे – जगण्याचा चंग आणि संघर्षाच्या गर्जना करणा-या माणसांच्या कविता.

धर्मयोगिनी अहिल्यादेवी- आजच्या पिढीला मूल्यांचा आरसा दाखवणारं पुस्तक

जत्रातील प्रेमाची गाेष्ट