एका काॅलगर्लची डायरी भाग 2
एका काॅलगर्लची डायरी भाग -2 ब्ल्यूस्टार हॉटेलच्या भव्य हॉल मध्ये लग्नाच्या गर्दीत राधा मॅडमला अचानक आवाज आला.त्या वर्दीतच होत्या.त्याचं एकमेव महिला त्या लग्नात असतील की त्या साडीत नव्हत्या.नटलेल्या,सजलेल्या नव्हत्या. त्या ऑनडीयुटी सहभागी झाल्या होत्या.त्यामुळे वर्दीतच होत्या. “तुम्ही राधा.. देसाई ना?”ओळखीचा चेहरा.ओळखीचा आवाज.कोण असावा याचा अंदाज त्या बांधत बसल्या.खरतर त्यांना काहीच आठवत नव्हतं.गर्दीत असं कुणी तरी अचानक येते आणि डायरेक्टं नावानंच बोलत.त्यावेळी इतकं गोंधळून तर माणूस जाणारच ना?एक सुंदर बांधेसूद तरूण महिला त्यांच्याकडे हासत येत होती.काही क्षण त्या नुसत्या तिच्याकडे पहात राहिल्या.त्या एकटयाचं तिच्याकडे पहात नव्हत्या.अनेक नजरा तिच्यावर खिळल्या होत्या.ती बाई नटलेली असली तरी ओव्हर मेकअप मुळीच के...