एका काॅलगर्लची डायरी| भाग 7 | प्रेम, वेदना आणि समाजातील सत्यकथा

 

  

Marathi story,Marathi sex story, मराठी बोधकथा,मराठी ग्रामीण कथा

 भाग सातवा.

Callgril's Diary
Callgrils Diary

एका काॅलगर्लची डायरी भाग -7

“ही तुमची मैत्रीण?” ते फोटो पाहून त्याच्या चेह-यावर आश्चर्याची अनेक चिन्हं उमटले.तो मोठयानं चित्कारला नाही हे काय कमी नव्हतं.ते फोटो त्याच्या ओळखीचं असतील का?त्याला ते फोटो पाहून नक्की काही तरी आठवत होतं.callgril's dairy
“ओळखता तुम्ही हिला?”हातातला फोटो त्याच्या पुढे नाचवत त्या मोठया उत्साहाने बोलल्या.त्याला लगेच कळलं.आपलं काही तरी चुकलं.तो जरा चपापला.दात चावले.माणसाच्या मनातलं असं चेह-यावर नकळत उमटून जात. हीची तर डेड बॉडी सापडली ना? नसती झझटं आपल्या मागे लागायची. तो जरा सावध ही झाला होता.
“नाही.नाही.मी ओळखत वगैरे नाही पण.” त्यानं स्वत:ला सावरलं.मॅडम त्याच्याकडेचं पहात होता.त्याच्या चेह-यावर उमटणारे भाव त्या अगदी सूक्ष्मपणे टिपत होत्या.त्याला मात्र मॅडमच्या डोळयाशी डोळा भिडता नाही आला. तेवढं धैर्यं त्याच्याकडं नसावं.
“पण काय?ओळखीचा नाही पण पाहण्यातला चेहरा वाटतोय का?”
“पाहण्यातला नाही.खूपचं स्मार्टं होत्या त्या.यांची डेड बॉडी सापडली का? अरे रे…!! हे नक्कीचं मरायचं वय नव्हतं.मृत्यू फारचं क्रूर असतो, नाही?सुंदर आणि तरूण जीवावर पण तो  दया नाही दाखवतं.” तो हळहळला.अर्थात त्याचं ते हळहळणं आणि त्याचं बोलणं मॅडमला बालीश वाटलं.ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू होणारच ना? एका बायकांसारखा कसा विचार करतो हा.मृत्यू कसलेच भेद करत नाही.

“स्मार्टं तर होतीच ना ती?प्रेमात वगैरे तर नव्हतात ना तिच्या तुम्ही?”मॅडमने गमतीने म्हटलं.त्यांनी खडा टाकून पाहिला.त्या खळखळून हासल्या ही.मॅडमच् हसू किती छान असलं तरी त्याला ते भितीदायक वाटलं.इतकी अनोळखी बाई एकदम इतकी कशी मनमोकळे बोलतेय?असं हासते आहे.तो स्त्री लंपट वाटतं असला तरी मूर्ख तर बिलकूल वाटत नव्हता.
“असं काय बोलताय मॅडम? माझं वय काय?तिचं वय काय?”
“प्रेमाला थोडच वयाचं बंधन असत? तिचं एक सिक्रेट सांगू का?”
“तिचं सिक्रेटं?त्यांची डेड बॉडी सापडली ना?” एखादया स्त्रीचं सिक्रेट कोण्या पुरूषाला ऐकायला आवडणार नाही?

“माणूस मेलं की सिक्रेट थोडचं मरतात.तिचा वयस्कार पुरूषातचं जास्त इंटरेस्ट होता.”
“क्काय..?”
“शरीर म्हतारं होतं माणसाचं.मन कधीचं नाही.सारा भाग्यावानेस ग बाई तू.तू लग्न नाही केलेस पण मित्र चांगले गटवत होतीस.”
“ही सारा कोण?असं का बोलताय?मी साधं पाहिलयं ही नाही कधी त्यांना.”
“साधं नाही मग स्पेशलं पाहिलयं का?” त्याच्या डोळयात पहात त्या बोलल्या.मॅडमनं त्याच्याशी इतकं  बोल्डं बोलणं त्याला संशयास्पद वाटू लागलं.त्याच्या मन पटलावर काही रोमांटिक दृश्य ही उमटले. रोंमाटिक होण्याची ती वेळ न्क्कीचं नव्हती.स्पेशल चार्जं असतात कॉलगर्लचे.रांडाचे.ही  नेमकी कोण? कुणी सीआयडी ऑफीर्स की,कॉलगर्ल की रांङ. साधी सोज्वळ बाई अनोळखी माणासाबरोबर इतकं बोल्डं नाही बोलू शकतं.
“साधं पहाणं आणि स्पेशलं पहाणं असतं काय?माणूस म्हणजे काय चहा आहे का साधा आणि स्पेशलं पाहयला?”
“चहा आणि स्त्री ही तुलना जॅम आवडली बुवा आपल्याला.साधा चहा आणि कडक चहा.सोज्वळ,सालस स्त्री आणि कडक स्त्री.” त्याला ती तुलना छान वाटतं असली तरी मॅडम विषयी त्याच्या मनात संशयाचे ढग दाटून आले.
“नक्की तुम्ही कोण आहात? का तिचा माझ्याशी सबंध जोडता?”
“घाबरलात का?खरच मी पोलीस वगैरे कुणी ही नाही.”मॅडम उठल्या.साडी सावरली.पदर पाठीवर फेकला.थोडया हासल्या.उठून उभा राहत बोलल्या.
“तुम्हाला भेटून बरं वाटलं.भेटू पुन्हा कधी इथचं? मी आले की घाबरून पळू नका.”
" मी का पळू?"
" पोलीस  वगैरे समजून" त्यांनी शेक हॅन्डसाठी हात पुढे केला.त्यांनी उभा राहून हात पुढे केला.
“सॉरी..!! नो टच.टचींग इज नो फ्री.”त्या झोकात चालू लागल्या.त्याच्याकडं पाहून डोळा मारला आणि हासत पहात चालू लागल्या.

'टचींग इज नो फ्री…' हे शब्द त्याच्या मनात घेळत राहिले.

आता त्या मागे पहाणार नव्हत्या.त्याच्या मेंदूत मात्र त्यांनीं व्हायरस सोडला होता.तो उभा राहून कित्येक वेळ नुसता पहात होता.त्यांच्या अभिलेष्याची प्रचंड लाट त्यांच्या मनात उठली होती.मनात वासनेचा सागर खवळला होता.मॅडमच्या पाठमो-या रेखीव आकृतीकडे तो नुसता पहात राहिला. त्याच्या मेंदूला हे ठरवता येत नव्हतं की ही नक्की कोण असू शकेल?  कुणी ही असलं तरी त्याला मात्र तीव्रतेन हवीहवीशी वाटली.

 रात्रीच्या आठ वाजत आल्या होत्या.चाणक्य कॉलनीच्या रस्त्यावरून त्या चालत होत्या.कुठं जायचं होतं त्यांना? कुठं जायचं नव्हत.त्यांना नुसतं भटकायचं होत.चौधरीलापण कळतं नव्हतं ही बाई कसला तपास करतेय? राधा मॅडमचे ही पाय थकले होते आता परत धरी निघावं असं त्यांनी मनात ठरवलं ही होतं. कुठं  टेकावं तर?महिलांनी बसावं असं ठिकाण कुठचं सापडत नव्हतं.मॅडमने मागे पाहिले तर चौधरी आणि त्यांचे सहकारी ही कुठेच दिसत नव्हते. आंधार मुळे फार लांबच त्या पाहू शक्ल्या नाहीत.

               तसं त्यांनी त्यांच लाईव्ह लोकेशन चौधरीला शेअर केल होतं.चौधरीला हे कळत असणार की नक्की त्या कुठे आहेत.त्यांनी आजू बाजूला पाहिले पण  कुणीच दिसत नव्हतं.रस्ताही वाहत होता पण तितकीसी गर्दी नव्हती. एखादं दुसरं वाहनं आलं की त्याची लाईट अंगावर पडत होती. डोळयावर चमकत होती? एक गाडी थांबली? हॉर्नं वाजला. त्याचं लक्ष गेलं.

“ ऐ,फडाकडी ?" एक पाॅश गाडीजवळ थांबली.त्या गाडीतून आवाज आला.
"मै फडाकडी?" मॅडमने स्वतःकडे बोट करत गाडीत डोकावत बोलल्या.आपल्याला असे विशेषण देऊन कुणी बोलेलं याची साधी कल्पना ही त्यांनी केली नव्हती.
" हूॅ,तुही रे.आती क्या ?” गाडीत दोन डोकी दिसू शकले.
" तेरी माॅ फडाकडी,तेरी बहन फडाकडी."त्यांना भंयकर राग आला होता. त्या मागे पळाल्या पण गाडी फास्टं निघून गेली.असं कुणी ही आपल्याला असं कसं विचारू शकतं? हा एरिया तर तसला नाही ना? उच्च्भ्रू लोंकांची कॉलनी ही. वृंदावणी...इथं सभ्य लोक राहतात. असं रस्त्यावरून चालताना  सभ्य बाईला कश्या ऑफर येतात.आपण नककीच  सभ्य वाटतो की तसली बाई वाटतो ? नक्कीचं वाटत असणार? उगीच ऑफर दिली काय त्यांनी. त्यांना भिती ही वाटली आणि त्यांच त्यांना हसू पण आलं. त्यांना कुठं माहित होत? ते एक पोलिस अधिका-याला ऑफर देत आहेत. त्यांनी त्यांच्या गाडीचा नंबर चौधरीला सेंट केला.हरामखोर पळून पळून  कुठे जाणार होते?

आता तर पाऊस सुरू झाला होता.तो ओसाड रस्ता अधिकचं ओसाड वाटू लागला होता.आंधार अधिक गडद झाला होता.त्या अर्ध्या ओल्या झाल्या होत्या.चेह-यावर केलेले मेकअप आता पाण्यात विरघळू लागला होता.पावडर,लाली,तेल,शाम्पू या सर्वाचा ओल्या गंधाच मिश्रण झालं होतं.त्यातनू एक अनोखा गंध दरवळू लागला. त्या क्षणी विवेकची त्यांना आठवण झाली. हा गंध विवेकला फार आवडतो.काही प्रणयं धूंद क्षणाच्या आठवणी ही त्यांच्या मनात नाचू लागल्या.आठवणींचा मनातील फेर खूप आनंददायी असतो.त्यांनी शौर्याला फोन लावला.त्या फोनवर बोलत असतानाचं एक गाडी थांबली.कचकन ब्रेक दाबलं की त्याचा आवाज आला. मुळात त्यांच लक्ष नव्हतं.

“मॅडम,तुम्ही भिजलात की पार.” गाडीच दरवाजे उघडले आणि एक रांगडा आवाज आला.मॅडमचं लक्ष नव्हतं मुळी.आवाज आल्या बरेबर त्यांनी पदर सावरला.थोड अंग ही चोरलं.हळूच त्याच्याकडे पाहिलय.तोच इसम होता.जो हॉटेलमध्ये भेटला होता.त्यांच्या ओलत्या अंगावर नजर रेंगाळत तो बोलत होता.दात काढत होता.दात त्याचं फार रंगले होते.त्यामुळे त्याचं हसू फार घाणरेडे वाटतं होते. पण  ते खुशाल दात काढत होतं.तसल्या आंधारात ही त्यांना स्पष्टं जाणवलं.

“पाऊस आल्यावर भिजणारचं की.आणि तुम्ही इकडं कुठं?”मॅडमने आश्चर्य व्यक्त करत म्हटलं आपल्याला हा फॉलो करतच होता हे नक्की.त्यांच्या ट्रॅपमध्ये तो अडकत चालला होता.

“गाडीत या.भिजत आहात तुम्ही.” त्यांनी मधल्या सीटवर बसण्याची त्यांना ऑफर केली.गाडीत बसणं फार धोकादायक होत. त्यानं मोबाईल पाहिला चौधरीनं ते पण फार दूर नव्हते.एवढी तर रिस्क तर घ्यावीचं लागणार होती.

“नाही.नाही.बरी मी.” थोडं अंग चोरत व लाजत त्या बोलल्या.कुणी ऑफर केली लगेच ती स्वीकारायची नसते.त्यांनी लटकेच नकार दिला.खर तर त्या घाबरल्या ही होत्या.अनोख्या पुरूषासोबत रात्री गाडीत बसणं फारच रिस्की होतं. पुढे काही ही होऊ शकतं.त्याचा अंदाज थोडाचं बांधता येणार होता?
“बरी काय?भिजलात आख्खंया.या.या.”  त्याची पार हाताला ओढून बसवण्याची तयारी होती. तो तितका उतावीळ ही झाला होता.

“नको.नको.”मॅडमला गाडीत नेमके किती जण आहेत याचा अंदाज घ्यायचा होता.तो आणि त्याचा ड्राव्हर दोघेच होते.गाडी फार अलिशान होती. मगा भेटला तेव्हा इतका श्रीमंत वाटला नव्हता हा.

“घाबरलात की काय? बसा.नेमकं  कुठं जायचं? मी सोडतो तुम्हाला.”
“तुम्हाला कशाला घाबरू? मला त्या वृंदावनी ब्लिडींगमध्ये जायचं.” मॅडम एकदाच्या गाडीत बसल्या.जोरात पाऊस सुरू झाला.तशी गाडी धावू लागली.
“ रिक्षा मिळतात. टॅक्सी  मिळातात.तुम्ही पायीचं का फिरत आहात.” त्याची शंका पण रास्त होती.अशी इतकी नाजूक स्त्री अशी पायी रस्त्यावरून रात्रीच्या वेळी फिरत नसते.
“अंतर जवळं होतं. तेवढचं चालणं होईल. आता ड्रायव्हरला कॉल केला आहे.तो येईल लगेच गाडी घेऊन.आपण थोड तिथं थांबवू.” ओले केस त्यांनी अलगद झटकले.भिजल्यामुळे अंग थडथडत होतं.त्यानं नॅपकीन दिली.त्या चेह-यावरलं पाणी पुसतं होत्या.त्यांनी जवळ ठेवलेला त्यांचा मोबाईल उचला.मॅडमने हे ताडलं होतं.तो आता ॲक्शन मोडवर आला आहे.

“तुम्ही कुठे जात  आहात? का माझ्या मागे..?” त्यांनी त्याच्या डोळयात पहात  हासत विचारलं. त्याला हसून अजून गुंतून ठेवायचं होतं. त्यांच हासणं बोलणं त्याला पेटवत होतं.
“आपण नक्की कोण आहात.”
“नक्की म्हणजे?”
“खरं बोल. तू नेमकी कोण आहेस? फार नाटक करू नाकेस?” त्यानं मॅडमचा फोन चालत्या गाडीतून फेकून दिला.
“ आहो, असं काय करता? माझा फोन?”

“ चूप राहयचं. बोलायचं नाही.” त्यानं मॅडमला दम टाकला.मॅडम ही घाबरल्या होत्या. चौधरी ही मागे लांबवर दिसत नव्हता.आता लोकेशन ही त्यांना कळणार नव्हत.

“ नो टचींग इज फ्री… फक्त पैसे  बोल.झवाडे.आपल्याकडं पैशाचं पैसा आहे." तो मॅडमचे हात धरत बोलला.मॅडमला प्रचंड राग आला होता.गाडी वेगात धावत होती.पाऊस ही जोरात सुरू  झाला होता.

क्रमशः 

एका काॅलगर्लची डायरी भाग 6

एका काॅलगर्लची डायरी भाग 5

एका काॅल ग्रूपची डायरी भाग 4

एका काॅलगर्लची डायरी भाग -3

एका काॅलगर्लची डायरी भाग 2

एका काॅलगर्लची डायरी भाग 1



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

. एका काॅलगर्लची डायरी भाग 1 | प्रेम, वेदना आणि समाजाच्या वास्तवाची सत्यकथा

युध्द पेटले आहे – जगण्याचा चंग आणि संघर्षाच्या गर्जना करणा-या माणसांच्या कविता.

धर्मयोगिनी अहिल्यादेवी- आजच्या पिढीला मूल्यांचा आरसा दाखवणारं पुस्तक