एका काॅलगर्लची डायरी -भाग 5
भाग पाचवा
![]() |
| Call Gril |
राखाडी रंगाची सिल्क साडी.त्यावर लेमन कलरचा शॉर्ट ब्लाऊज.थोडासा मेकअप करून राधा मॅडम आरश्या समोर उभा राहिल्या.आपण या कपडयात इतका सुंदर दिसतो की,इतक्या सुंदरच आहोत? त्यांचा त्यांनाच हा प्रश्न पडला.मोकळे सोडलेले केस.त्यांनी एकदा विस्कटून पाहिले.छानसं आरश्यात पाहून हासल्या.स्वत:लाच असं स्माईल देणं त्यांना छान वाटलं.विवेकने जर या साडीमध्ये पाहिलय तर त्याला कस वाटेल? कपडयाचे कलर कॉम्बीनेशन्स माणसाचं सौंदर्य खुलवत असेल का? आज त्या स्वत:च्या दिसण्यावर जाम खूश होत्या.आपण सुंदर दिसत असू का सेक्सी की हॉट? विवेकचे नेमके कोणते शब्द असतील आपल्यासाठी आज?अनेक शब्दांचे तरंग मनात उमटत गेले.सेक्सी,हॉटं,मादक,ब्यूटीफूल…!!!
आपण सेल्फी काढून विवेकला टाकावी का?त्यांना सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही.त्याला थोडेच पैसे पडतात?त्यांनी दोन तीन सेल्फी काढून बघितले पण त्यांना जाणवलं की खिडकीतून कुणी तरी डोकावत आहेत.त्या जरा दचकल्या.नेमकं कोणं असेल? चौधरीचं असू शकेल? पण तो का डोकावला असेल?आपलं आवरलं की नाही हे पाहण्यासाठी की त्याला आपल्याला चोरून पाहयचं असेल?अनेक शंका त्यांच्या मनात आल्या.त्याला काय वाटेल असं साडीत पाहून आपल्याला? राधा मॅडम सहसा साडीत नसतातच मुळी पण त्यांनी आज मुददाम साडी घातली होती.डियुटीवर असताना साडी कम्पर्टेबल नसतेच.अर्थात आपण सुंदर, सेक्सी दिसावं म्हणून त्यांनी हा पेहराव केलाच नव्हता.तसं कुणासाठी दिसावं?विवेक तर किती दूर होता?आपण सुंदर दिसावं असं वाटणं आणि आपण सेक्सी व्हॉट दिसावं असं वाटणं या दोन्ही अभिलेषेत फार फरक आहे.आज जे काय परिधान केले होते.ते त्यांच्या डियुटीची गरज होती.
पर्स हातात घेतली.सरासरा चालत त्या गाडीजवळ आल्या.गाडी तयारच होती.त्यांच्या अपेक्षेप्रमाणे चौधरीनं त्यांच्याकडे एकटक पाहिलं.ते पहाणं साधं नव्हतचं.नखशिख्खांत नजर फिरवली त्यांनी त्यांच्यावर.त्यांना जरा ओशाळल्या सारखं झालं.त्या लाजल्या नाहीत पण वरमल्या जरा.एका रोजच्या सहका-यानं असं आपल्याकडे पहावं?हे त्यांना रूचलं नाही.कुणी आपल्याकडं पहावं आणि कुणी नाही पहावं हे आपण नाही ठरवू शकत.गुलाबाचं फुल रंग,गंध व रूप घेऊन बहरत जात.ते थोडसं बहरण्यात कंजूषी करत?आपण कुणाला आवडावं याची भ्रांत ते नाही करत.आपलं आपण बहरत राहावं.मनातली मनात त्यांना थोडं हसू आलं.आपण गुलाबाच्या फुलांची अशी का तुलना का करत आहोत?पुरुष मेले सारे सारखेच..!! त्यांच्या नजरेत विखारी डंक असतोच.
त्यांची टीम आज वर्दीत नव्हती.चौधरी ही सिव्हील ड्रेसवरच होता.गाडी सुरू झाली.ती पण साधीचं. पोलीसाची नेहमीची गाडी नव्हती.मॅडमचे केस वा-यावर उडत होते.रेबनचा गॉगल त्यांनी डोक्यावर ठेवला होता.असा डोक्यावर गॉगल ठेवण्याची त्यांना सवय तर नव्हतीचं पण ते आवडत ही नव्हतं.गॉगल असो की चष्मा तो डोळयावरच असावा.त्याची जागा तीच असते.काही लोक स्टाईल म्हणून गॉगल्स डोक्यवार ठेवतात.
सारा गॉगल अशी लावायची हे त्यांना वेटरने सांगितले होते.ए.आय टेक्निकने तिचे काही फोटो त्यांच्या टीमनं बनवले होते.मॅडमने पुढयात ठेवलेली फाईल काढली.त्यात असलेले सारा वाडकरचे फोटा सावकाश नजर फिरवत होत्या.त्याची आता काय गरज होती?सारा वाडकर आणि त्या.अशी त्यांना तुलना करायची होती का? छे…!! सारा वाडकरासारखं त्यांना हुबेहूब दिसायचं होतं.एका कॉल गर्ल सारख आपल्याला का दिसायचं? सारा सारखं समजनू कुणी आपल्यात प्रेमात पडलं तर?आपली कुणाला तीव्रतेने अभिलाषा झाली तर? भयाचे पुसटसे बुडबुड उठू लागले.
गाडीच्या खिडकीतून येणा-या वा-यामुळे भुरभुरते केस सावरू सावरू त्या परेशान झाल्या होत्या.पदर ही सावरावा लागतच होता.चौधरी मात्र चोरून कटाक्ष टाकत होता.चौधरीच्या अश्या पाहण्याचा त्यांना राग यायला हवा होता पण त्यांना हसू येत होतं.हा मूर्ख पोलीस अधिकारी आपल्याला सारा वाडकरच समजतो की काय? पुसटचंस हसू त्यांच्यात ओठात उमटलं.अर्थात ते मिश्किल होतं.एक मात्र खरं होत आपल्या सौंदर्याचा गर्व स्त्रियांना जन्मजातच असेल का?त्या अधिकारी असल्यातरी त्यांच्या चेह-यावर गर्वाचे पुसटसे रंग अधिक गडद झालेले झाकत नव्हते.
“चौधरी खरं सांगा.हे सारं वेषांतर ओव्हर तर झालं नाही ना? नाही तर माझं होईल सोंग.”
“ओव्हर नाही पण हुबेहूब दिसतायं तुम्ही?”
“सारा वाडकरला तुम्ही पाहिलयं?”मॅडमने चौधरीची फिरकी घेतली.
“सॉरी..! सॉरी..!!!तिच्या क्रिएट केलेल्या फोटो सारखं.”त्यांन पुन्हा एकदा पाहनू घेतल त्यांच्याकडे. पुरूषी नजरेतला विखार लगेच कळतो स्त्रियांना.
“पोलीस म्हणून काय काय करावं लागतय काय माहित? आज हे सोंग?” त्या सोंग म्हणत असल्यातरी त्यांना ते आवडत होतं.नटणं,थटणं हे स्त्रीचा स्थायीभाव असतो.त्या अधिकारी असल्यातरी त्या एक स्त्रीच होत्या ना?
“असं काही केल्यानं आपल्या हाती काय लागेल?”चौधरीला सुरवातीपासूनचं हा प्रश्न पडला होता.मॅडमला डायरेक्ट विचारता नव्हतं आलं.लोकेशनं कळलं आहे.ॲड्रेस आहे हे साँग कशासाठी?आपण एकदा इच्छित ठिकाणी पोहचलो की काही ना काही हाती लागतेच.
“कपडे एक माणसाची ओळख असते.कुणाला सैल कपडे आवडतात.कुणाला फीट.कुणाला गडद रंग.कुणला फेंट..कुणाली साडी कुणला ड्रेस.कुणाला जीन्स्… ही बाई तसल्याचं धंदयाची असणार.तुला काय वाटत?कोणते कपडे जास्त घालत असेल?”
“आता ते कसं सांगणार?आपण कधी तिला पाहिलचं नाही.”
“ती कोण असेल असं वाटत?”
“अजून काहीच धागेदोरे हाती लागले नाहीत.अंदाज कसा काढणार?”
“आहो,बाय प्रोफशनली.सती सावित्री तर नसेलचं ना?”
“ज्या अवस्थेतत ती सापडली त्यावरून तर नक्कीचं नाही?”
“मग ती असे कपडे घालत असेल की,जी पुरूषांना आवडतात.आता माझ्यापेक्षा हे तुम्ही चांगल सांगू शकतात.पुरूषांना कोणत्या कपडयात स्त्रिया पाहयला आवडतात?”
“कोणत्या?” चौधरीला काय बोलावं हेच कळत नव्हतं.मॅडम इतकं बोल्डं बोलू शकतात?ए-हवी सोज्वळ,सालस वाटणा-या मॅडम असं एका पुरूषाला हे विचारू शकतात? या साडीत तर काही विलक्षण शक्ती तर नाही ना?
“पुरुष तुम्ही आहात चौधरी.मी नाही.”चुटकी वाजून त्या बोलल्या.चौधरीला भानावर आणण्यासाठी त्या ही युक्ती नेहमीच वापरतात.
“हे अवघड आहे सांगणं.हे सारं त्या पुरूषाच्या आवडी नुसार असतं.आता हे तुम्ही नका विचारू एखादयाला कॉफीच का आवडते.आवडते म्हणजे आवडते."
“कॉफी..?? कॉफीला थांबायचं का? ही आयडीया आवडली आपल्याला डायरेक्ट कॉफीला थांबूया म्हण्यापेक्षा.अशी कॉफीची आठवण करू दिली.
“असं काही नाही मॅडम.”चौधरी हासला.
“कॉफी तर घेऊच.कॉफीला थांबतो म्हणून हा विषय तुम्हाला टाळता येणार नाही.”
“मी कशाला विषय टाळू?ती जास्त साडीचं घालत असणार. ब्लाऊजच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या तिच्या दंडावर?”
“ माझं ही गेस तसाच आहे.”
“सॉरी ,मॅडम मला एक कळत नाही.ती साडी घालत असेल म्हणून तिच्या मृत्यूचा तपास ही साडी नेसून का करायचा?”चौधरीनं कधी पासून मनात गोंगवणारा प्रश्न विचारला. मॅडम प्रथम खळखळून हासल्या.
“ तू उशीर केलास हा प्रश्न विचारण्यासाठी.अगदी तसं नाही पण तिचा तपास मला साडी नेसून करावा असं वाटतं कारण त्याची मदत तपासाला होईल.नक्की होईल. बघत राहा.” त्या त्यांच्या डोळयात पहात बोलल्या.
“नक्की?” त्याला कशी मदत होईल याचं उत्तर हवं होतं.
“ती बेवारस आहे याचा अर्थ असा नाही की तिला या शहरात कुणी ओळखत नाही.तिला आपलं म्हणारा कुणी नाही.कुणी आपल म्हणावं अशी ती नसेल कदाचित.ती मृत्यू पावली ही बातमी या एरियात नक्कीच गेली असणार.ते लोक आपल्याला येऊन भेटणार नाहीतं.ते दूरूनच पाहणार.खात्री करणार.काही लोकांच्या या हालचाली आपल्याला तिची खरी ओळख पटण्याकडे घेऊन जाणार. तिची ओळख.. गुन्हेगारा पर्यंत…”त्यांनी चौधरीला एक प्लॅन समजावून सांगितला. थोडं पुढे गेल्या नंतर?ते कॉफीसाठी थांबले पण एकत्र नाही.वेगवेगळे. अगदी सुरक्षित अंतर घेऊन.
रस्त्यावर एका पॉश कॉफी हाऊस मध्ये ते शिरले. सायंकाळची वेळ होती.ब-यापैकी गर्दी होती पण एका कोप-याचा टेबल पकडून त्या बसल्या.त्या कॉफी हाऊस मध्ये सिंगल असं कुणी नव्हतं. अनेक कपल्सचं बसल्या होत्या.हातात गुंफून.काही नजरेत नजर गुंफून.इतक्या प्रौढ वयाची कदाचित त्या एकटयाचं असतील.साडी तर त्या एकटयाचं होत्या.सा-याचा नजरा त्यांच्यावर खिळल्या होत्या.अश्या कॉफी हाऊस म्हटलं की कॉलेजच्या काही आठवणी उचंबळनू येणं शक्य होतं.भूतकाळात त्यांना नव्हत जायच.त्यांना आजचा ताजा टवटवीत वर्तमानकाळ हवा होता.
राधा मॅडमने ऑडर दिली.निवांत मोबाईल चिवडत बसल्या.त्यांच लक्ष मात्र मोबाईल मध्ये नव्हते.त्या बारकाईने पहात होत्या.त्यांच्याकडे अनेक नजरा रोखल्या होत्या.कपडयामध्ये एक जादू नक्की असते.ते माणसाचे लक्ष वेधून घेतात.पुरूषाने एका स्त्रीकडे पहाणं त्या समजू शकत होत्या पण एक तरूण मुलगा त्यांच्याकड एकटक पहात होता.त्याचं वय कमी असेल.मॅडमपेक्षा तर नक्कीचं कमी होतं.त्यांची एक दोनदा नजरा नजर ही झाली.तो बारकाईने पहात होता.तो बहुतेक त्यांच्या साडीकडे पहात असावा.त्याला त्यांचा चेहरा दिसत नसेल का? आपल्या प्रेमात पडतो की काय? वेटरने त्यांना कॉफी आणून दिली.त्या कॅफी पित असताना त्याचाकडे पहात होता.त्याचं धैर्य वाढलं.तो चक्क् पुढयात येउन बसला.तो इतकं धाडस कसा करू शकला.मॅडमला ही आश्चर्य वाटलं.त्याला काही तरी बोलायचं असावं पण धैर्य होत नव्हतं,मॅडमने त्याच्याकडे पाहून स्मित केल. का स्मित केल असेल? मॅडम हासल्या पण तो घाबरला.मॅडम उठल्या आणि त्याच्या जवळ गेल्या. सारे लोक थक्क होउन सारे पहात होते.
(पुढील भाग लवकरचं.)

टिप्पण्या