एका काॅलगर्लची डायरी - भाग 1
भाग एक
![]() |
| Callgril काॅलगर्ल |
पहाटेचे पाच वाजले होते.पूर्वेला तांबडा रंग दाटून आला होता.वारं मंद वाहत होतं.थंडी ही चांगलीचं बोचत होती.स्वेटर,मफलिरी गुंडाळून माणसं चालत होती.स्ट्रीट लाईट जळत होत्या.गुलमोहरांच्या फुलांचा खचीचं खच पडला होता रस्त्यावर.कुणाकुणाच्या दारात पारिजाताकांचा सडा पडला होता.त्यांचा मंद पण धूंद गंध मनाला मोहित करीत होता.पाच वाजून गेल्या होत्या तरी माणसांची वर्दळ फारसी नव्हती.तुरळक तुरळक माणसं टोळक्या टोळक्यांनी चालत होते.काही नवीन पोरं पळूपळू घाम काढीत होते.
राधा देसाई ही जाँगींग करत होत्या.रनिंग केल्यामुळे अंग सारं घामेजून गेलं होतं त्यांच.अंग सारं थबथबलेलं होतं.थोडसं थकल्या ही होत्या त्या.तेवढयात मोबाईल वाजला.
इतक्या सकाळी फोन एकतरी घरीहून तरी असावा नाहीतर पोलिस स्टेशनवरून तरी.दुसरा कॉल या नंबरवर शक्यचं नव्हतं कारण त्यांचा हा प्राव्हेट नंबर होता.अश्या ऑफिसर्सना असे फोन ठेवावेच लागतात.त्या थोडया थांबल्या.कॉल रिसिव्हं केला.
“हॅलो,मॅडम.डेड बॉडी सापडली.”ठाणे अमंलदार चौधरीचा फोन होता.
“मग?”आता एका पोलिस ऑफीसरला डेड बॉडी सापडणे ही बातमी म्हणजे फार मोठी बातमी नाहीच. है तो चलता रहता है.
“एका स्त्रीची डेड बॉडी सापडली.”चौधरीनं अधिकच पुढची माहिती दिली.
“लेडीजची…??”राधा देसाईचा मूड ऑफ झाला.डेड बाॅडी स्त्रीच काय नि पुरूषाची असली काय फरक पडतो.सकाळीची आल्हाददायक हवा नाका तोंडात घ्यायची त्यांना फार आवङ.मन कसं प्रुल्लतीत असतं सकाळी सकाळी.अश्या रम्य प्रसंगी त्यांना तातडीनं जावं लागणार होतं.नॅपकीनने चेहरा पुसतं त्या जाग्यावरचं थांबल्या.मूड तर ऑफ झालाचं होता.
“कुठे?”
“हॉटेल रूबी गार्डंन.”हॉटेल रूबी गार्डंनं.शहरातील एक फाईव्ह स्टार हॉटेल.ज्याच्या खिडक्यातून आपण अथांग सांगर आणि उसळाणा-या लाटा पाहू शकतो. लोकेशन चौधरीने पाठवलं होतं.
“दॅटस् इट.इनामदारला फोन कर.टीम घेऊन स्पॉटला यायला सांग.मी निघतेय.”सूचना दिल्या आणि त्या परत वळल्या.जावं तर लागणारचं होतं.रनींगंची स्पीड वाढवत त्या गाडीजवळ आल्या.गाडी स्टार्ट करून डायरेक्ट हॉटेल रूबीकडे रवाना झाल्या.अर्थात अंगात ट्रकसूट तसाचं होता.राधा देसाई नुकत्याचं बावळा पोलिस स्टेशनला रूजू झाल्या होत्या.तरूण, तडफदार व कठोर अधिकारी म्हणून त्या ओळखल्या जात होत्या.पोलिस खात्यातल्या डियुटीमध्ये तत्परता महत्त्वाची असते.त्यांच्या ही पूर्वी इनामदार आणि त्यांची टीम पोहचली होती.
रूम नंबर….47 हॉटेलच्या पूर्वेच्या शेवटच्या भागात ही रूम.
त्या अलिशान हॉटेल मधील बेडवर एका स्त्रीचा देह नग्न अवस्थेत पडला होता.तरूण आणि सुंदर देह. वय का असू शकेल?तीसच्या आसपास वय असू शकेल? तिचे कपडे विखुरलेले होते.डेड बॉडी अनेक पाहिल्या पण अश्या अवस्थेत?एकदम नग्न… एक बोटभर भी कापड अंगावर नव्हत.रूम बंद ही नव्हती.सताड उघडी रूम होती.ही आमहत्या की हत्या?आत्महत्या करतानी कुणी असं विवस्त्र थोडचं होतं असतं.आपल्याचं देहाची अशी विटबंना कोण करील? हत्या असेल तर? असं विवस्त्र करून हत्या? बलात्कार करून हत्या केली असेल तर? कपडे सारे व्यव्स्थीत होते.अर्थात ते सारे नीट ठेवलेले नव्हते.धूंद प्रणयाच्या प्रसंगी कपडयाचं कुठं भान असतं? बळजबरी करताना कपडे असे इतके व्यवस्थीत काढणं शक्य नसतं.बळजबरीचं दृश्य नव्हतेच मुळी ते.बळजबरी नसेल ही पण त्या स्त्रीचा मृत्यू का झाला असेल? उपस्थित सारेच लोक आप आपल्या परीनं अंदाज करत होते.
त्या स्त्रीचा चेहरा पाहिला नि राधा मॅडम चकित झाल्या.त्यांना तो शॉकचं होता.डोक्यात 1200 होल्टेजचा शॉक बसावा तसा शॉक बसला.त्या खाली कोसळल्या नाहीत हे काही कमी नव्हतं.
“शुभांगी…!!!”त्यांच्या नकळत तोंडातून शब्द बाहेर पडले.तसे सारेच हबकले.ही स्त्री मॅडमच्या ओळखीची कशी काय असू शकते?उगीचं नाकाजवळ हात नेऊन श्वास बंदच झालेला आहे याची खात्री केली.त्या बॉडीला टच करून पाहिलं ते गार पडलं होतं.श्वास निघून गेलेला दोन तीन तास तरी झाले असतील. साधारण रात्री दोन तीनच्या दरम्यानं ही घटना झाली असावी.त्या मागे सरकल्या.त्यांनी जवळचं पडलेलं बेडसीट त्या डेडबॉडीवर टाकल.त्या दुदैवी स्त्री देहाची विटबंना त्यांना पहावली नाही.सा-या पुरूषासोबत स्त्रीचा देह अशा अवस्थेत कसा पाहयचा? डेडबॉडी असली तरी स्त्रीचं शरीर होतं.ते कपडयातचं हवं.राधा मॅडम काही क्षण नुसत्या पहात राहिल्या.
“मॅडम,शुभांगी नाही.सारा आहे.”मॅनेजर बोलला.राधा मॅडमने नुसतं त्याच्याकडे पाहिलं.त्या पाहण्यात एक तुच्छता होती.अश्या हॉटेलमध्ये येणारे लोक थोडीचं खरं नाव सांगणार होते?अशा हॉटेलमधून काम करणारे मॅनेजर स्मार्ट राहतात.आपल्या पॉश राहण्याचा आणि अक्कलीचा काहीच संबंधच नसतो का?अल्सीएशन कुत्र्याच्या नाही का गळयात फार किमती बेल्टं असतात? तसाचं टाय बेल्टवाला तो मॅनेजर वाटला.
“सारा…?”राधा मॅडमनी त्याच्या डोळयात डोळा घालून प्रश्न केला.पोलिस ऑफिर्सची अशी खास स्टाईल असते.अपराध्याचं डोळे लगेचं कळतात.भीती दाटलेली झाकत नसते डोळयात.हा निश्चित होता.एकतर त्याच्या चेह-यावरील निश्चितपणा कृत्रिम असावा किंवा तो खरचं निश्चित असावा.कर नाही त्याला कसली डर? राधा मॅडमनी त्याच्या पायावर नजर स्थिर केली.तो ओशाळला.
“सारा वाडकर.या नावानं रूम बूक केलीय.”मॅनेजरनी औपचारीक माहिती दिली. या पेक्षा तो जास्त काही बोलणार ही नव्हता.
"ठीक..!पुढे बोल."
"काल रात्री आल्या होत्या."
"ॲकझ्याट टाईम सांग." त्याच्या आवाजात दरारा होता.
"रात्री 9.40 मिनिटे."
"चौधरी सी सी फुटेज चेक करा.एकटीच होती का अजून कुणी?”
“एकटीच होती.”
“तिचा काही आयडेंटी प्रूफ?”
“त्या नेहमीचं येतं.साराचं नाव त्याचं आम्ही सारे ओळखतो?”
“ तुम्ही ओळखता हीच आयडेंटी आहे काय तिची? इटस् गूङ..!!”
“तसं नाही मॅडम.आधार कार्ड नंबर आहे ना नोंदवलेला.”त्या लिहीलेल्या अंकाकड पहात तो बोलला.
“कोण ही?” दरडावून विचारलं.
“सारा वाडकर.फक्त नावच माहीत मला.त्या नेहमी येत.एवढचं माहित मला.”
“कोण होती ही?”
“सारा….!!
“बावळट.बाय प्रोफेशनली.”
“मॅडम,ते कसं सांगता येईल? त्यांना असं विचारलं की राग येई.चिडत त्या.मी सल्लागार आहे असं सांगत त्या.”
“सल्लागार..??? " हा शब्द ब-याचदा नाकात घोळला.
"कधी घडलं हे?" त्याच्या डोळयात डोळा घालत त्या विचारत होत्या.
“सकाळी…. हया वेटरने पाहिलयं.” एक पंचवीस असलेल्या पोट्टयाला पुढे ढकलत मॅनेजर बोलला. मासूम चेहरा.वनसाईड कट असलेला तो मुलगा फारच घाबरला होता. तो थरथरत बोलत होता.
“मी रूम नंबर..45 कडे जात असताना मला साडी बाहेर आलेली दिसली.दार उघडचं होतं.मी हळूच डोकावून पाहिलं. तर या अश्या पडलेल्या दिसल्या.” तो घाबरला असला तरी तो खरं बोलत असावा. खोटं बोलणं इतकं कठीण काम त्याला पेलवणार नव्हतं.नवीन असल्यामुळे पोलिसला फेस करणं त्याला सवयीच नसावं.
“याचे जवाब घ्या. ताब्यात ठेवा.”राधा मॅडमनी त्याच्या डोळयात पहात आदेश सोडला.
“पण मॅडम मी काहीच केलं नाही.”
“हो रे बाबा.तू काहीचं केल नाही पण तू हे सार पाहिलंस ना? तू साक्षीदार आहेस ना? तू फक्त खरं सांग.तुला काही करत नाही.”राधा मॅडमनी त्याला धीर दिला.तो आवश्याकच असतो.
“इनामदार.सीसी टी.व्ही फुटेज..कलेक्ट करा.इथं थांबलेल्याची पण चौकशी करा.कुणी ही आपल्या परवानगी शिवाय हॉटेल सोडणार नाही.”
त्या दुदैवी शरीराची अनेक फोटो काढले गेले.शुटींगपण केली.ते सारं तपासाचा भाग होता.सा-या पुरूषांना बाहेर खिदाडून आपण त्या डेड बॉडीला कपडे घालावेत असं राधा मॅडमला वाटलं पण तसं थोडचं करता येतं?बारकाईनं सारं पहात होत्या.ते पहावचं लागणारं होतं.तो खून होता की आत्महत्या…?का आपघात होता? अपघात? त्या देहाचा पुरेपुर उपभोग घेतल्या नंतर तिचा प्राण कुणी घेतला असेल? का घेतला असेल तर. का घेतला असेल? मर्डरचा हेतू तर कळवाचं लागतो? त्या रात्री दोघं रूम मध्ये असतील की अजून तिसरं कुणी? कदाचित तिसरं कुणी असू शकतं.शक्यतांच व संशयाच पण एक वादळ असतं.तपास अधिका-याच्या मनात ते उठण आवश्यकच असतं.संशयाच्या उठणा-या लाटातूनच तपास अधिकारी गुन्हेगारा पर्यंत पोहचत असतात.
राधा मॅडम एकदम स्क्षूम नजरेनं सारे चेहरे पहात होत्या.त्यांच्या एक मात्र लक्षात आलं होतं.सा-या पुरूषी नजरा त्या बॉडीवर खिळल्या होत्या.हे सारे पुरुषी गिधाडे डेड बॉडीला पण सोडत नाहीत.त्या रूमचा कोपरा नि कोपरा तपासला गेला.काय मिळालं तिथ?कंडोम.रिकामे ग्लास… पर्स…. पर्स मध्ये मेकअपच सामान.थोडेस पैसे?साडे चार हजार रूपये फक्त.हातरूमाल.इतक्या अलिशान रूममध्ये थांबणारी स्त्री ती.तिच्याकडे मोबाईल नसावा हे पटतं नव्हतं.पटण्यासारखचं नव्हतच मुळी.आता या जगात फाईव्हं स्टार हॉटेलमध्ये थांबणा-या व्यक्तीकडे फोन नाही हे कसं शक्यं? माणूस काही क्षण ही मोबाईल वाचून राहू शकत नाही.मोबाईल नव्हता हे मात्र खरं होतं.तिचा हा खून असेल तर गुन्हेगारानं नक्की तो पळवला असेल? आपल्या पर्यंत पोलीस पोहचवू नाहीत.यासाठी सारे पुरावे नष्ट करण्याचा प्रय्त्न त्यांचा असतो.एकनं एक वस्तू ताब्यात घेतली.फिंगर चेकअपसाठी त्या जतन करून ठेवणं गरजेचं होतं.राधा मॅडमनी तोंडावरील कापड मागे सारून तिचा चेहरा निरखून घेतला.
आपले डोळे नक्कीच कसूर करणार नाहीत असं त्यांना वाटलं.दुसरं कुणी असू ही शकेल पण ती शुभांगी सारखीचं होती हे मात्र नक्की.ती शुभांगी नसावी.तिची हम शक्कल असावं अशी राधा मॅडमनी अपेक्षा केली.इतकी हुबेहूब…शुभांगी सारखी.टेबलवर पडलेल्या वस्तू… कंडोमची पाकिट.काही वापरलेले..काही तसेच?ग्लास.. त्यातली दारू.त्या दारूचा वास घेऊन पाहिला..फारच किमंती दारू होती ती.ती स्वत: दारू पित असावी.दारू पिणारी एक स्त्री.सभ्य तर असणारच नाही.
सभ्य असभ्य ठरवण्यापेक्षा ती कोण होती हे ठरवणं महत्वाचं होतं?तिचं या जगात कोणी असू शकेल का?अश्या स्त्रीया त्यांची खरी ओळख लपवत असतात.खोटी ओळख घेऊन त्या या अभासी जगात वावरत असतात.बॉडी पोस्ट मॉर्टेमला पाठवून दिली आणि राधा मॅडम पोलिस स्टेशनकडे निघाल्या.दुसरं तिचं कुणी नातेवाईक असतील तर त्यांना शोधावे लागेल.शुभांगी आणि सारा?दोन नावाभोवती त्यांचं विचारचक्र फिरू लागलं.फॉरन्सिक लॅबला भी काही सँपल पाठवावे लागणार होते. सारे अहवाल आल्यानंतरच तपासाला काही दिशा मिळू शकत होती.
गाडी भरधाव वेगाने धावत होती.राधा मॅडमच्या मनात एक संशयाचं,शक्यतांचं वादळ उठलं होतं.ती शुभांगी.. की सारा असेल?शुभांगीनं नावं बदल असेल का? सारा वाडकर.एक स्त्री असं एकटं येऊन लॉजवर राहवू शकते.ती ज्या अवस्थेत सापडली आहे.ती नक्कीच एकटी नव्हती.असं विवस्त्रं करून.. कुणी तिला मारून टाकून का जाऊ शकतं?मानवी मनाच्या विकृतीला काही मर्यादा नसतात.अनैसर्गिक संबधातून ही असं घडू शकत? माणूस प्राणी इतर प्राण्यापेक्षा जास्त विकृत आहे. शक्यता कोणत्याचं नाकरता येत नाहीत.कल्पना हे सत्य म्हणून स्वीकारता नाही येत.
शुभांगी भेटली होती अश्यात एका लग्नात राधा मॅडमला.शुभांगीचा तो हसरा सुंदर चेहरा त्यांच्या नजरेसमोर तरळला.माणसाचा मेंदू पण मेमरीकार्डं सारखा असेल का? एक फाईल प्ले केली की दुसरी आपोआपच प्ले होत राहते.तसंच काही राधा मॅडमला आठवत गेलं.
( पुढील भाग लवकरचं.)

टिप्पण्या