एका काॅलगर्लची डायरी-भाग 6

                                                                                   भाग सहावा

एका काॅलगर्लची डायरी



“तुम्हाला काही बोलयचं का?”धिप्पाड देहाच्या त्या टक्कल्या माणसाजवळ जाऊन राधा मॅडम बोलल्या. ते पण त्याच्या डोळयात पहात.तो अजून ही त्यांच्याकडे ‘ऑ’ वासून पहात होता.तो मॅडमकडे आणि मॅडम त्याच्याकडे पहात होत्या आणि गर्दी दोघांकडे पहात होती.तो टक्कला असला तरी श्रीमंत माणूस असावा.स्टार्च केलेले कडक इस्त्रीचं शर्टं.ब्रँन्डेड जीन्स्.हातात सोन्याच्या अंगठया होत्या.गळयात सोन्याची जाड साखळी.श्रीमंतीचा एक माज असतो तो पण चेह-यावर आतोनात होता.

“नाही.नाही..!!मला कुठं काय बोलायचं?कोण आहात आपण?”त्याला हा अनपेक्षित धक्का होता.त्याच्या नजरेत एक तुच्छता होती.ती इतकी होती की तो थुंकला नाही हे काय कमी नव्हतं.सहज तिच्याकडं पाहिलं आणि ही डायरेक्ट असं विचारते.तो अधिकच गांगरला. त्याला हे माहित नव्हतं की,तो एका पोलीस अधिका-यासमोर आहे.त्याला अंदाज बांधता येत नव्हता ही बाई कोण असू शकते?     


                       अर्थात त्याची नजर चांगली नव्हती म्हणजे तो त्यांच्या बाबतीत चांगला विचार करीत असेल अशी बिलकूल शक्यता नव्‍हती तरी मॅडम त्याच्याकडे पाहून हासल्या.इतकं छानसं स्माईल देऊन ही तो दूर सरकतच होता.त्याला मॅडमला टाळायचं होतं का?अनोळखी स्त्रीचं डायरेक्ट हासणं कुणाला सहज पचेल? मॅडमला मात्र त्याच्याशी संवाद साधायचा होता.संवाद साधणं शक्यं झालं तरचं काही ना काही धागा हाती लागू शकतो? सूतावरून स्वर्गं गाठण्याचा तर तपास अधिका-याचा प्रयत्न असतो.

“खरचं तुम्हाला काही बोलायचं नाही?”शक्यं तितका सोज्जवळ आवाज काढत त्या बोलल्या.मॅडमला ही भीती होतीचं.आपली अँक्टींग ही ओव्हर व्हायला नको.हे बेणं पैश्याचा माज असलेलचं दिसत होतं.

“नाही…!!नाही हो.मला कुठं काय बोलायचं?”तो त्रासलेल्या व तुच्छतेनं भरलेल्या स्वरात बोलला.


“इटस् ओके.सॉरी मला वाटलं आपण काही बोलणार आहात.”त्याच्याकडे एक कटाक्ष टाकत त्या मागे सरल्या.आपण जबरदस्तीनं कुणाशी संवाद साधू नाही शकत.मुळात तो घुम्या माणूस असावा असा अंदाज मॅडमने काढला.


“तुम्हाला असं का वाटल? आपण कधी भेटलोत या पूर्वी?”त्याच्या चेह-यावर प्रश्नचिन्ह अधिकच गडद झालं होतं.

“मला तरी नाही आठवतं.” त्या अगदी त्याच्या जवळ चेअर सरकून बसल्या.तो ओशाळला.ही कोण बाई इतकी आपल्याशी लगट करते आहे?श्रींमत पुरूष पाहिला की,असल्या स्त्रीया लगेच पघळतात.तो बारकाईने त्यांच्या कडे पहातचं होता.पहात कसले?तो त्याच्या डेंजर नजरेनं मॅडमच्या प्रत्येक अवयवाचं स्कॅनींगच करत होता.ती ओंगळवाणी नजर मॅडमला नको नकोशी झाली होती.


                   मॅडमचं विचाराल तर त्या पहिल्यांदाच त्याला पहात होत्या.त्याच्या चेह-यावरून त्यांनी हा नक्की अंदाज बांधला होता की तो एक तर आपल्याला ओळखत असावा किंवा आपल्याला पहिल्यानंतर त्याला कुणाची तरी आठवण येत असावी.मॅडमने डायरेक्ट त्याच्या डोळयात पाहिल.माणसाचे डोळे फार बोलके असतात.त्याच्या मनाच्या तळाशी काय चाललं हे त्यांना शोधायचं होतं.नक्की कारण त्यांना पण सांगता येत नव्हतं पण त्यांना वाटतं होतं की याचा आणि साराच्या केसशी काही संबंध असू शकेल.धागा तर हाती काहीच नव्हता.त्याच्याशी संवाद साधणं आवश्यक होतं.


                            राधा मॅडम त्याला मुददाम इग्नोर करत जरा दूर येऊन खूर्चीवर टेकल्या.त्याचं नाही पण तिथल्या अनेक नजरा त्यांच्यावर खिळल्या होत्या.त्या पाठमो-या बसल्या होत्या.समोरच्या खिडकीच्या काचातून मात्र त्या त्याच्या हालचाली टिपत होत्या.हा इतकं का आपल्याकडे पहात असेल? तरूण मुलं मुलीकड असंच एकटक पहात राहतात.त्या वयात एक आकर्षंण असतं.याला कसलं आकर्षण आपल्याकडं खेचत आहे.आपण नेमक्या त्याला कोण वाटतं असू?आपण जराशी सारा सारख्या दिसतं असू का?सारा सारखी साडी घातली कीच सारा सारख्या कसे दिसू?छे..!! छे..!!!आपण सारा सारख्या दिसत नसू पण तो तसली बाई समजत असेल का?वन नाईट स्टॅन्डसाठी तर आपण त्याला हव्या नाहीत ना?त्याची तशी वापर नाही आली म्हणजे झालं.अशी पैशाची माजोरडी पुरुष कुणाची ही अभिलाषा धरतात.वन नाईट असल्या माणसाबरोबर त्यांना ही कल्पनाच फार किळसवाणी वाटली.मनात उमटलेली ती कल्पना त्यांनी पटकन झटकली.एक दीर्घं श्वास घेतला.


                                सारा अशी साडी घालून इथ अनेकदा येत असेल काय?मुळात सारा सारखी बाई इथ साडीत वावरत असेल का? खरचं सारा सारख्या दिसत असू की सुंदर आणि व्हॉट दिसत असू? त्यांना त्या ही क्षणी स्वत:कडे पाहण्याचा मोह आवरता आला नाही.त्यांनी साडी ठीक केली.ब्लाऊजच्या बहया ओढून टाईट केल्या.माणूस इतका स्वत:च्या प्रेमात असतो तर?स्वत:कडे ही राजरोजपणे न पाहता चोरून पहातो.का आपण साराच्या जवळच कुणी संबंधी तर वाटत नसू ना? तशी सुतराम शक्यता नाही.साराचा चेहरा आणि आपला चेह-यात थोड पण साम्य नाही.साराचं कुणी नातलग तरी असेल का?रक्ताचं नाही पण कुणी तरी प्रेमाचं,जीवाचं तरी असेल  का? आपण साराच्या मैत्रीण वाटत असू.सेम साडया.सेम हेअर स्टाईल.सेम कलर चॉईस.मैत्रिणी मैत्रिणीमध्ये इतकं एकमेंकीला फालो केले जाऊ शकते.


                    पाऊस सुरू झाला.जलतुषार आत मध्ये सरळ अंगावर येऊ लागले.त्यामुळे त्यांना निमित्त सापडले.त्यांना त्या टक्कल्या माणसाला बोलतं करायचं होतं.त्यासाठी त्याच्या जवळजाउन बसणं आवश्यक होतं.त्या उठल्या.साडी सावरत सावरत.त्या टक्क्ल्याच्या शेजारच्या रिकाम्या खूर्चीवर टेकत बोलल्या,“अशी इतकी जवळ बसले तर चालेल ना? अर्थात तुमची हरकत नसेल तर.” सभ्यपणाचा आव चेह-यावर पसरत त्या बोलल्या. त्यानं सुरक्षित अंतर घेण्याचा प्रयत्न केला.आपलं ऐश्वर्य पाहून ही बाई नक्की पघळली असणार.त्याचा अंदाज.असल्या बायांना फक्त पैसेवाले पुरूष हवे असतात.या मज्जा मारायला मोकळया.


“चालेल. माझी कसली हरकत मागताय?.” तो जरा ओठात हासला,त्याचा हासरा चेहरा बरा वाटला.पडता पाऊस आणि जवळ एक सुंदर तरूणी येत असेल तर कोणत्या पुरुषाला आनंद होणार नाही. तो आनंद त्याच्या रापलेल्या चेह-यावर स्पष्टं दिसला.


“घाबरणार तर नाहीत ना?”मॅडमने हलेकच त्याचा चिमटा काढला.त्याच्या नकळत चौधरीला डोळा मारला.प्लॅन सक्सेस होत आहे याचा त्याला सिग्नल दिला असावा.


“तुम्हाला घाबरायला काय तुम्ही बागूल बुवा आहेत का?”


“मी आणि बागुल बुवा?” मॅडम इतक्या खळखळून हासल्या की सारेचं त्यांच्याकडे पाहू लागले.त्यांचा हासरा चेहरा अधिकच मोहक दिसतो.तो पाहू शकला की नाही पण चौधरी मात्र ते हास्यात मोहरलेला चेहरा पाहू शकला.त्या ही चौधरीकडे पाहून हासल्या.चौधरी जरी साध्या वेषात असला तरी त्याची बॉडी झाकत नव्हती.पोलीस अधिकारी असावा इतकं वाटण्या इतपत त्याचं फिटेनस  नक्की होतं आणि हेअर स्टाईल ही त्याचं धर्तीची.त्या इसमाने ही चौधरीकडे पाहिलं.ही बाई त्या माणसाकडे चक्क पाहून का हासते?ही नेमकं कोण असू शकेल?चीटर,चावट,धंदेवाली की कुणी सीआयडी ऑफीर्सं?तो अधिकच गंगारून गेला.सावध ही झाला.


“ते तुमच्या सोबत आहेत का?”त्याला डाऊट आलाच होता.संभ्रमाचे ढग त्याच्या मनात दाटून आले होते.


“छे..! छे..!! अहो मी एकटीचं.घाबरलात की काय?  मी पोलीस तर बिलकूलच नाही.”


“सॉरी,मला तसं वाटलं.पोलिसाला मी का घाबरू?”


“मग असं कसं काही वाटलं तुम्हाला?उदया तुम्हला तो माझा नवरा वाटेल?”मॅडम डायरेक्टचं बोलल्या.इतकी स्मार्टं बाई इतकी बोल्ड..!!त्याचा तर विश्वासचं बसत नव्हता.


“नाही हो.असं कसं वाटेल? सॉरी,तुम्हाला राग आला का?” तो पुरता ओशाळला.


“राग नाही आला पण भीती मात्र जरूर वाटली.”


“भीती कसली?”


“माझ्या विषयी तुम्ही कसले भयानक विचार करतात.मी नेमकं कोण असू शकेल असं वाटतं तुम्हाला?”


“ म्हणजे?”


“ मी एक मध्यमवर्गीय सभ्य स्त्री आहे.प्लीज,असं काही ही वाटून घेऊ नका माझ्या बदल?मी सिंगलच आहे.माझा कुणी ही नवरा नाही.ना कुणी बॉय फ्रेंड आहे मला.मैं आझाद पंछी हूँ…!! गगन छू लू.”त्या उडण्याची ॲक्टींग करत बोलल्या.इतकी मूडी बाई तो प्रथमचं पाहत होता. इतकी थोराड झाली तरी लग्न ही नाही आणि बॉय फ्रेंड ही नाही हे त्याला अजिबात पटलं नवहतं.ओव्हर असली तरी सुंदर,तरूण व जबरदस्त माल आहे हे त्यांना पटलं होतं.असल्या फडाकडया बाया हाताळायला मिळाव्यात अशी प्रत्येक पुरूषाची अपेक्षा असते.त्याच्या मनात वासनेच्या माश्या घोंगावू लागल्या.

“तुम्ही सिंगल?वाटतं नाहीत पण.”सौंदर्याची स्तुती केली की सामान्य स्त्रीया सहज पघळतात हे त्याला माहित होतं.आपल्या सौदर्याच्या स्तुतीसाठी त्या असुसलेल्या असतात.त्यांनी स्तुती टाळली.एकदमच अनोळखी स्त्रीची स्तुती कशी करायची? ती पचली पण पाहिजे ना?


“तुम्हाला का वाटावं की मी सिंगल नाही? चेह-याकडे पाहून कळू शकतं का? माणूस सिंगल आहे की डबल?का इतकी थोराड दिसतेय मी?”आपल्याशी बोलण्याचा त्यांचा इंटरेस्ट वाढतोय हे मॅडमला कळून चुकलं होतं.

“थोराड नाही पण हे लायसन्स दिसतेय ना.”तो त्यांच्या गळयातलं मंगळसूत्र दाखवत बोलला.मंगळसूत्र तर वरचं दिमाखात डुलत होतं.त्यांच्या चूक लक्षात आली.जीभ चावली.


“कुणी घातल नाही मला हे.माझं मीचं घालते आहे रोज.ते घातलं की थोडं बरं पडतं आम्हा सिंगल स्त्रीयांना.”

“सॉरी.मला तुम्हाला दु:खवायचं नव्हतं.आपण इतक पर्सनल ही नको व्हायला.नाही का?”त्यांन स्वत:ला सावरलं.

“सॉरी वगैरे म्हण्याचं काही गरज नाही.माझं अजून एक ही लग्न झालेलं नाही.”

“क्काय?लग्न न करता मंगळसूत्रं?”त्याला हा अश्चर्याचा धक्का होता.असं कुणी मंगळसूत्र घालत का? अनेक विवाहीत स्त्रीया आपण अविवाहीत व कमी वयाच्या दिसावं म्हणून मंगळसूत्र लपून ठेवणा-या स्त्रीया त्यांनी पाहिल्या होत्या. हे अजबच रसायन होतं.


“सिंगल स्त्रीयांना हे जग फार छळतं.तुम्हा पुरूषाशी चिंटींग करते मी. हे लायन्स गळयात घालून.सिंगल पोरी पेक्षा सिंगल प्रौढ स्त्रीयांना फार हे जग छळतं.थोडा बचाव करण्याचा प्रयत्न आहे हा या पुरूषापासून.अर्थात तो केविलवाणाचं आहे.”त्या हासत बोलल्या.ही इतकी बोल्ड बोलते आहे याचा अर्थ ही बाई सभ्य तर नककीच नसेलं असा अंदाज त्यांन बांधून ठेवला होता.आपल्याशी लगट पण करते आहे.


“पण सारेच पुरूष तसे नसतात.”आपला पौरुषी इगो त्यानं कुरवाळला.


“सा-याचं स्त्रिया तरी कुठ तसल्या असतात?”दोघे ही खळखळनू हासले.


                           हासता हासता मॅडमचा पदर पडला.त्यांनी शिताफीनं तो सावरला.तो त्यांच्याकडच पहात होता.एका केसच्या तपासासाठी त्यांना काय काय गोष्टीला तोंड दयावं लागणार होतं काय माहित?अर्थात त्यांना हे असं करणं आवडत नव्हतंचं.एक थ्रील पण येत होतच की.

“वॉव..!! काय छान पाऊस पडतोय.पाऊसात एक लय असतं.पावसाचं एक गीत असत.”आपले भुरभुरते केस सावरत व अंग चोरत त्या बोलल्या.पडत्या पावसात तरूण व असल्या सुंदर स्त्रीच्या हालचाली पहाणं सुभाग्यचं असतं.त्या हालचाली फारच मोहक असतात.ही बाई फडाकडी वाटतं असली तरी नाजूक होती.त्याची नजर काही क्षण त्यांच्या ओठावर रेंगाळली.

“मला कॉफी अजून घ्यायचा मूड झालाय.तुम्ही कॉफी घेणार का?”त्यांनी चक्क कॉफीच ऑफर केली.ही ऑफर ऐकून मॅडम मनोमन सुखावल्या.आता त्याच्याशी बोलता येणार होतं.तसली बाई असली तरी कॉफी शेअर करण्याचा मोह त्याला टाळता नाही आला.मॅडमच्या शरीराची लालसा त्याच्या मनात आणि शरीराच्या कणाकणात पसरली होती.


“कॉफी तर माझा विक पाँईट आहे.आज मला फक्त इथं कॉफी पितचं बसायचं आहे. फक्त कॉफी.आम्ही इथं नेहमी कॉफी घेत असतं.”


“आम्ही म्हणजे?सॉरी,थोड पर्सनल विचारतोय.सांगू वाटलं तर सांगा.इथं सारे प्रश्न अनिवार्य नाहीत.” त्यांन थोडस हासून पाहिलं.

“मी आणि माझी एक फ्रेंङ. तिचं हे फेव्हरेटं कॉफी हाऊस होतं.तास तास बसत असतं आम्ही इथे.”


“इथचं का?”


“ती याच एरियात राहयची.चाणक्य नगरच आहे ना हे?आम्ही तिच्या बॉयफ्रेंडची वाट पाहत बसत असू.तिला बॉय फ्रेडची आतुरता असे आणि मला या कॉफीची.”मॅडम नसलेल्या मैत्रिणीची एक रोमांटीक स्टोरी छान रंगवत होत्या.दुस-याची लफडी ऐकण्यात भारतीयांना फार इंटरेस्ट असतो. विशेष करून स्त्रीयांची लफडी तर फारचं चवीनं ऐकतात माणसं.


“आता दोघं ही येणार आहेत का?”


“नाही.आता ती येणं शक्यं नाही.”


“का?आता त्या शहर सोडून  गेल्यात का?”


“शहर नाही.हे जगच सोडून गेली ती.आता उरल्यात फक्त तिच्या आठवणी.जे माणूस भेटू शकत नाही.ते आठवणीतच भेटू शकते.”


“मग तो बॉयफ्रेंड येणार का?”


“नाही तो कसला येतोय.त्यांच ब्रेक अप झालं होतं.पुरूष फार क्रूर आणि निष्ठूर असतात.फक्त यूज केलं त्यानं तिला.तिच्यापेक्षा पंधरा वर्षांनी मोठा होता.”


“अश्या कश्या प्रेमात पडल्या त्या?त्यांच लग्न तर झालेले नव्हत ना?”त्यांन शंका विचारली.


“प्रेम आंधळ असतं.हे खरचं.”आपल्या पेक्षा पंधरा वर्षापेक्षा जास्त मोठया असलेल्या पुरूषां बरोबर अफेअर करायचं.त्याला प्रेम म्हणायचं.हे बरं कुण्या कवींनी तरी प्रेमाला आंधळ करून ठेवलं.


“त्या बॉयफ्रेंडचा शोध घ्यायचा आहे का तुम्हला?” मॅडम इथं येण्याचं त्याचा कारण शोधायचं होतं त्याला.


“मला वाटलं तुम्ही असचं  काही तरी मला समजत असणार.मी काय डिटेक्टीव्ह वगैरे समजत असणार.मी त्याचा शोध घेऊन काय करणार? मी कसा शोध घेणार? फक्त आठवणी जाग्या करण्यासाठी आलेय इथं मी.आज एका वर्षापूर्वी आम्ही दोघी या अश्या साडया घालून इथचं या टेबलावर काही तास कॉफी घेत बसलो होतो.आज हे हाऊस आहे,कॉफी आहे,मी ही त्याचं साडीत आहे.पाऊस ही तसाच आहे.फक्त ती नाही.माणूस किती पराधिन आहे,नाही?नियतीच्या एका फटका-यानी त्यांनी रंगवलेलं सारं विश्व पुसलं जातं.” एका विचारवंतासारख्या त्या बोलत होत्या.


“ त्यांच्या मृत्यूचं कारण?”


“ते एक गुढ.डायरेक्ट डेड बॉडी सापडली असं म्हणतात.खरचं ती मरण पावली की नाही याची पण मला खात्री नाही.मला तर वाटतं ती जिवंतच असेल? तिच्या मृत्यूचं कारण ही कळू नाही इतकी ती दुदैवी आहे.” मॅडमने समोरच्या टिश्यू पेपरने डोळे टिपले.तेवढयत कॉफी आली.मॅडमने कॉफीचा कप ओठाला लावला.


“सॉरी,मी इतक पर्सनल नको होत व्हायला.मी माझं दु:ख उगळीत तुमची ही रम्य संध्याकाळ खराब केलीय.काय छान पाऊस पडतोय ना? पाऊसाचं पण एक गाणं असतं. रिमझिम..रिमझिम…” त्या उठून कप हातात घेउन खिडकीशी चालत गेल्या.त्यांची फिगर आणि त्यांच्या अवयवाचे आकार पाहणची संधी त्यांनी सोडली नाही.वासना जीवाच्या रक्ताच्या अणूरेणूत ठासून भरलेली असते.ती माणसाच्या मेदूला बधिर करते? ते ही उठून मॅडमच्या मागे उभे राहीले.


“त्या हरामखोराला सोडू नका.”


“जाऊ दया.मी फार त्यात पडणार नाही.सूडाग्नीत पेटून मी माझं आयुष्य पणाला का लावू?माझं ही लाईफ मला जगायचं आहे ना?”


“ते तर खरंचं आहे पण.”


“काही पण नाही बीण नाही.मला माझं आयुष्य मजेत जगायचं.नुसतं जगायचं नाही तर मजेत जगायचं.तुम्ही सोडा ते.एवढं का गंभीर होताहेत?”


“ छे..!! मी कशाला गंभीर होऊ.”तो त्याच्या बाजूला उभे राहून पाऊस पहात.काफी घेऊ लागला.


“तुम्ही कधी पाहिलय का तिला?”


“कुणाला?”


“माझ्या मैत्रिणीला.इथचं नेहमी येत असे ती.अश्या रंगाच्या साडया घालायची हमेशा.”हा त्याच्यासाठी शॉक होता.


“साडी वरून कशी कळणार?मी कधी पाहिलीच नाही त्यांना.”


“फोटो दाखवला तर?” मॅडमने मोबाईलची गॅलरी ओपन केली.सारा वाडकरची बनवलेली फोटो दाखवले.तो त्या फोटो कडे पहातच राहिला. मॅडम त्याचा चेहरा बारकाईने वाचत होत्या.आता धुवाधार पाऊस सुरू झाला होता.


(पुढील भाग लवकरचं)



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

युध्द पेटले आहे – जगण्याचा चंग आणि संघर्षाच्या गर्जना करणा-या माणसांच्या कविता.

धर्मयोगिनी अहिल्यादेवी- आजच्या पिढीला मूल्यांचा आरसा दाखवणारं पुस्तक

एका काॅलगर्लची डायरी - भाग 1