राजकारण आहे की बहुरंगी बहुढंगी नाटक?
हल्ली महाराष्ट्रात जनता सरप्राइज शाॅक खाऊन खाऊन घायाळ झाली आहे.उत्सुकता माणसाला पराकोटीचा आनंद देत असते.सस्पेंन्स..आता पुढे काय? पुढे काय..?? पक्ष फुटला..आता राष्ट्रवादी कुणाची ? या प्रश्नांच उत्तर मिळवण्यासाठी कमीत कमी वर्ष भरी तरी महाराष्ट्राला वाट पहावी लागेल.शिवसेना कुणाची या प्रश्नांच उत्तर अजून ही महाराष्ट्राला मिळाल नाही.ते मिळेलंच असं ही नाही.तो वरचं राष्ट्रवादी पक्ष कुणाचा हा प्रश्न महाराष्ट्राच्या मानगुटीवर ठेवण्यात आला आहे. काही प्रश्न कायम प्रश्नच राहतात.नव्या प्रश्नाला जन्म देतात. माणसं बारा बापाचे नसतात पण प्रश्न बाराचंचे काय शंभर बापाचेचं पण असतात. या महाराष्ट्रात मडकी फुटावीत तशी फटाफट पक्ष कसे काय फुटतात? एवढी प्रचंड गद्दारी कशी काय होते?कोण गद्दार ? कोण खुद्दार ?असे प्रश्न मेंदूचा पार भूगा करत आहेत.चक्क वाघाची शिकार हरणं कशी काय करतात? सध्या महाराष्ट्रात काही घडू शकतं?तुम्हाला हरिण वाघाच्या बछड्याला दूध-भात भरवताना लाईव्ह दृश्यं दाखवलं तर तुमचं कसं होईल? ...