सोमवार, ८ एप्रिल, २०२४

सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!!

 सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!!



सरकारला विचार नसतात.राजकीय पक्षांना विचार असतात. तशी विशिष्ट विचारांची सरकार चालवायला अजिबात गरज नसते.सरकार हे आपल्याला घटनेशी प्रामाणिक राहूनच चालवायचे असते‌.घटनेतील उद्देश्यासाठी सरकारने प्रमाणिक काम करावे अशी अपेक्षा घटनेची आहे.सरकारने काय करावे,काय करू नये याचे नियम आहेत.कायदे आहेत.या देशात घटनेपेक्षा कुणी ही मोठा नसतो.जेव्हा कायद्याचा,पदाचा गैरवापर केला जातो आणि स्वायत्त संस्था जेव्हा सरकारच्या हाताच्या बटीक बनतात तेव्हा देश हुकूमशाहीच्या उंबरठ्यावर उभा असतो.या स्वायत्त संस्थेच्या खांद्यावर बंदूक ठेऊनच हुकुमशाही आपले पाय हळूहळू पसरत जाते.आपला झेंडा रोवत असते हे सा-या जगाने पाहिले आहे. हुकुमशाहीची सुरूवात घटना आपल्याला हवी तशी लवचिक करूनच होत असते.आपण लोकशाहीचे किती सुंदर गीतं गायली तरी हुकूमशाही आपली मूळं खोलवर रूजवत जात असते.एक कंपूशाही निर्माण होत जाते.दुर्बल,भित्रे,लाचार लोक कंपूशाहीत सामिल होऊन आपली जागा तयार करून घेतात.सोन्याच्या पिंजरा त्यांना महाल वाटु लागतो.त्यांना गुलामीची जाणीव होतेच असं नाही.झाले तरी ते हतबल असतात.

     भारतीय लोकशाही ही सांसदीय लोकशाही आहे.सध्या दोन तीन दशका पासून घटनेचा हा ढाचा जाणीवपूर्वक बदला गेला आहे.पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरवला जातो आहे. तो जाहीर केला जात आहे.दोन राष्ट्रीय व्यक्तिमत्त्वाची तुलना करत  लोकांचं मत तयार केले जात आहे.संसदीय पक्ष त्यांचा नेता निवडत असतात.दोन  किंवा अधिक पक्षांची तुलना करत लोकांचं मतदान  होणे आवश्यक असते.एखादया व्यक्तीला  महत्व येणे हे संसदीय लोकशाही साठी भयंकर गोष्ट असते.लोकशाहीचा ढाचा पायदळी तुडवण्या  सारखंचं हे आहे. अशी तुलना का? संविधान बदलाची ही नांदी आहे. हे अनेक दशके चालू आहे पण कुणीचं गंभीर घेत नाही.

      एका पक्षाने आपला पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर केला की आपण दुस-या पक्षाकडून तशीच अपेक्षा करतो. हे भारतीय लोकशाहीच अपयश आहे.ही सुरूवात आहे.आपण हळू हळू घटनेचे साचे तोडत तर जाणार नाहीत ना? प्रचंड भिंती वाटते आहे

          धर्म आणि जातीच्या नावाने  पक्ष संघटना निर्माण होताहेत. भेदाच्या भिंती उभ्या  केल्या जात आहेत.सा-याचं निवडणूका या भेदावर  बेतल्या जात आहेत.

संविधान बचाव..बचाव म्हणुन त्रागा करून संविधान वाचवलं जाऊ शकत नाही. त्यासाठी  प्रत्येक नागरिकानी सजग होणे आवश्यक आहे.

बघा,आता काय करायचे ते? ढोंग तर सारेच करत आहेत.

                                                       परशुराम सोंडगे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

साहित्य, शिल्प, नाटक, तमाशा व चित्रपट – सत्तांतरासाठीचे विषारी साधन

  साहित्य, शिल्प, नाटक, तमाशा व चित्रपट – सत्तांतरासाठीचे विषारी साधन " Love lovestory in Marathi " Chhaava-Hindi move( Vicky Kou...