पोस्ट्स

आपुलाचं संवाद आपल्याशी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

भोंदूबाबा कॅप्टन खरात आणि मूर्ख राजकारणी.

इमेज
भोंदूबाबा कॅप्टन खरात आणि मूर्ख राजकारणी. कॅप्टन्स फाईल पाहिल्यानंतर तुम्हाला राग आला की हसू आलं?का त्या राजकारण्याची कीव आली? का किळस वाटली?  शेवटी घटना घडल्यानंतर आपल्याला काय वाटतयं हे महत्वाचं आहे ना? मला तर जॅम हसू आलंय.काय पागल लोक असतात हे ? काय थाटमाट असतो राजकरणी लोकांच? काय रूबाब असतात त्यांचे? तुम्ही बघितला ना? भोंदू बाबाच्या मागे कश्या शेपट्या हालवत फिरत आहेत हे लोक?   हे आडाणी आहेत का? हे शिकले नाहीत का? हे उच्चशिक्षित आहेत ना मग यांची अक्कल अशी शेणं  का खाते ?   कुणी माणूस ब्रम्हांडनायक असतो  का? काळी जादू किंवा तंत्रविदया नावाचा काही प्रकार अस्तित्वात असू शकतो का?अंकशास्त्रात पण तो निपुण होता म्हणे..!! तो कृष्णाचा अवतार नि त्याच्याकडे जाणारी प्रत्येक  महिला ही राधा...?? काय भंकसगिरी ही? शाळेत हे सामान्य विज्ञान तर हे शिकले असतील ना? अगदी शाळकरी पोरामध्ये जेवढा वैज्ञानिक  दृष्टिकोन दिसून येतो तेवढा पण यां राजकीय गेंडयांना नसावा का?  थोडी तरी तर्क बुध्दी जागी ठेवा ना? निव्वळ अक्कलच शेण खाल्ल्यासारखं हे कशी वागतात?  त्या...

मृत्यूला जराशी थांबवणारे डाॅ.दिवाकर गुळोजकर

इमेज
मृत्यूला जराशी थांबवणारे डाॅ.दिवाकर गुळोजकर   मरण कुणाला चुकलं नाही.मरणाच्या हजारो वाटा असतात.मृत्यू शेवटी जीवाला गाठतोचं.काही माणसं आसतात एखाद्या जीवाला मृत्यूच्या जबड्यातून सोडवणारे. त्या काळाला पण ठणकावून सांगणारे "जरा थांब रे..!!!"  असतं काही माणसात सामर्थ्य.असेच सामर्थ्य असलेले डाॅक्टर होते दिवाकर गुळोजकर. त्यांच्या निधनाची बातमी ऐकली.अनेक आठवणी उचंबळून आल्या. त्या आठवणी पापण्या ही ओल्या करून गेल्या. 2003 ची घटना आहे.आमच्या आण्णांला म्हणजे वडीलांना त्यांनी मृत्यूच्या दारातून ओढून काढले होते.ठणठणीत बरे ही केले होते.आण्णाला असेच बीड मध्ये एका नामवंत डाॅक्टरच्या हाॅस्पीटल मध्ये आटमीट केलं होतं.ते नामवंत ही होते आणि सिव्हीलमध्ये वैद्यकीय अधिकारी ही होते. आम्ही त्यांच नाव ऐकून त्या हाॅस्पीटल मध्ये गेलेलो.मला भेटलेले ते एक मूर्ख व घंमेडी डाॅक्टर होते.आण्णांच्या तब्येतीत सुधारणा करण्याऐवजी त्यांनी त्यांना बेशुद्ध केले. आण्णा गंभीर झाल्यानंतर तुम्ही त्यांना घेऊन जाऊ शकता असा सल्ला ही दिला.भरमसाठ बील ही हातावर ठेवलं . आण्णा बेशुद्ध झाले असले तरी त्यांचा ताप कमी होत नव्ह...