हा मराठी साहित्य, कविता, कथा, ललित लेख आणि सामाजिक विषयांवरील विचारमंथन यांसाठी एक उत्कृष्ट मंच आहे. येथे तुम्हाला भावस्पर्शी प्रेमकथा, प्रेरणादायी लेख, राजकीय विश्लेषण, तंत्रज्ञानविषयक माहिती आणि साहित्यिक चर्चांचे वैविध्यपूर्ण लेखन वाचायला मिळेल. मराठी भाषा आणि संस्कृती जोपासण्याचा आमचा प्रयत्न असून, नवोदित लेखकांसाठी हे व्यासपीठ खुले आहे. नवीन साहित्य वाचण्यासाठी आणि तुमच्या प्रतिक्रिया द्यायला आजच भेट द्या! मराठी ब्लॉग, कथा आणि कविता, मराठी साहित्य, ललित लेख, प्रेरणादायी लेख,मराठी वेबसाईट
रविवार, १६ मार्च, २०२५
श्रावणी बाळ ,'मला माफ कर 'भावूक फेसबुकवर पोस्ट करत संपवलं जीवन.बीड पुन्हा हादरलं.
बुधवार, ५ मार्च, २०२५
मृत्यूही ओशाळला होता…! | संतोष देशमुख हत्या आणि समाजाचा संवेदनाहीन चेहरा"
कालचा दिवस इतक्या दुर्दैवी होता की,मी ते संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो पाहू शकलो.आता ही माझ्या डोळयासमोरून ते दृश्य हालत नाही.डोळयातील आसवांना खंड नाही.मेंदूत चीड,संताप आणि हाताशपण्याच्या लाटा उसळत आहेत.
मीच माझ्याचं चेह-यावर का थुंकत नाही? समग्र माणूस जातीवर ती गिधाडे हासत होती.
पुराणातही राक्षस असाचं मृत्यू एन्जॉय करतं. असं अनेकदा ऐकलं होतं. वास्तवात कुणी इतकं क्रूर असू शकत? ह्या राक्षसाचे चेहरे डोळयासमोर नंगानाच करत होते.
माझी,आज ही नजर त्या रक्ताच्या थारोळ्यात अडकलीय... संतोष देशमुख यांचा निर्घृण खून... त्यांचा पडलेला निपचित देह....!!
...आणि त्याभोवती उभे असलेले ते भावशून्य चेहरे..!! समग्र,माणूस जातीच्या चेह-यावर थुंकणारे ते नराधम.
तो चेहरा कुणा माणसाचा नाही.ते मुत्तेमवार होते इथल्या समाजव्यवस्थेवर,पोलिस यंत्रणेवर.ते निपचित पडलेले प्रेत आहे इथल्या माणुसकीचे.
कुणीतरी फोन काढून फोटो घेत होतं,कुणीतरी "व्हायरल करू" म्हणत होतं, कुणीतरी त्यांच्या जखमांची मोजदाद करत होतं...आणि कुणीतरी निव्वळ तमाशा पाहत होतं.,ते पण ऑन लाईन.ते हसू क्रूर होतं.ते कुठल्याही शस्त्रापेक्षा धारदार होत.काळीज चर्र चिरत गेलयं भाऊ.
हे हात इतके क्रूर का झाले? त्यांची ह्रदय दगडाची का झाली? का आटून गेली माणुसकीची हळवी ओल त्यांच्या ह्रदयातली? मृत्यूचं दान ही का त्या दुर्देवी जीवाला ते देत नव्हते?
सत्तेतून पैसा,पैशातून सत्ता,अंगात माज.सत्ता रखेल झाली. त्या भ्रष्टतेच्या रगीवर,उशीवर हे सैतान पोसत गेली.उन्मतपणा असाच पोसत गेला.
आता सावा सारखं त्यांची फाशीच मागणी तेच करतील. दगडाच्या काळजाने संवेदना ही व्यक्त करतील.
ही सारी जागी जाणती माणसं थुंकतं का नाहीत त्या नराधमावर? सत्तालोलुप त्या गिधाडांवर?
मला नक्की आठवतं.माझी तीस वर्षा पुर्वी ताई वारली होती.तिचा चेहरा....शेवटचा पाहण्यासाठी मला असचं त्या प्रेतापुढे उभं केले होते.मी डोळे झाकून घेतले होते.मला नाही पाहयचा चेहरा तिचा.आयुष्यभर नाही तिचा हा मलूल चेहरा मी माझ्या अंतरंगात साठवू शकत?
का?
मला तिचा कायम चेहरा हसरा चेहरा माझ्या ह्रदयात कोरून ठेवायचा आहे.
त्या वैभवीला ... तिचा वडिलांचा हासरा चेहरा आठवेल का? तिच्या अंतरंगात काय काय चिखल्या गेलयं?
उरात हे धगधगत दुःख घेऊन तिनं असच जगायचं का?
एकेकाळी मृत्यूला शोकांतिका समजलं जायचं. आज मात्र तो केवळ एक "कंटेंट" बनलाय... सोशल मीडियावर शेअर होणारा, मिम्समध्ये रूपांतरित होणारा, आणि काही तासांत विसरला जाणारा... जसा संतोष देशमुख विसरला जाईल. नराधम पुन्हा नंगानाच करतील तुमच्या आमच्या छाताडावर.
संवेदनशिलतेपेक्षा तुम्ही जर सत्तेच्या खुर्च्या उबीत बसणार असाल तर काय होईल?
या देशात नराधमाच्या आरत्या होत असतील तर दुसरं काय होईल?
सोमवार, ३ मार्च, २०२५
स्वारगेटला शिवशाही बसमध्ये झाला तो बलात्कार की लफडं? का पेड सेक्स...??? संशय कल्लोळात महाराष्ट्र.
पहाटेची वेळ आहे.गजबजलेलं पुण्यातील स्वारगेट बस स्टेशन आहे.
एक तरूणी येते आहे. स्कार्पने तोंड बांधलेले आहे.तिला फलटणला आपल्या घरी जायचं आहे.गाडी लवकर येत नाही.बस सहसा वेळवर येत नाहीत हे सर्वांचा अनुभव राहिलेला आहे.त्यामुळे ती बेचैन होते.असं वाट पाहून पाहून थकल्यावर झालं की माणूस हैराण होतो.तसं ती ही झाली.बस येणार आहे की गेली असेल? हा प्रश्न माणसाला फार त्रासदायक असतो.बसच्या वे॓ळा तर विचारूच नका.स्वारगेट स्टेन्शनच तर माझा वैयक्तिक अनुभव फारच वेगळा आहे. असो.
तिला एक तरूण भेटतो.त्याला ती विचारते.,कारण,तिथूनही बसलेले नीटस सांगत नाहीत.कुत्रे जसे भुंकणारे तसे ते येणा-या माणसावर नुसते तुटून पडत असतात. चौकशी कक्षात चौकशी नको रे बाबा..!!
"ही गाडी फलटणाला जाते आहे.अस तो सांगतो.हायसं वाटतं.बस स्थानकावर फक्त तुम्हाला हायसे वाटू शकते. या गुड फिलींग तिथे काय असू शकते?ती गाडी शिरते. बसते. पहाटेचा वेळ आहे.बस रिकामी आहे येतील पॅसेंजर अशी ती वाट पहात बसते.
आपल्यासोबत पुढील काही मिनिटांत काय घडणार आहे हे तिला माहित नाही. तसं ते कुणालाचं कळत नाही.
तिला तरी कसं कळणार? नंतर तो आला.तो लांडगा होता.,तिचे लचके तोडू लागला. एखाद्या स्त्रीसोबत या पेक्षा भयंकर काय घडू शकते.तेच घडले.तिचं सर्वस्व लुटलं.तिला न ओरडता आलं ना बोलता आलं.आपली इज्जत लुटली हे सहज पुढे येऊन कोण सांगते? स्त्री असेल किंवा तिचं कुटुंबातील लोक असतील? हे इज्जतीला फार घाबरतात. अश्या हजारो कळ्यांचे टाहो हुंदक्यातच विरतात. पुन्हा जीवे मारण्याचा दम. ती भितीने थरथरतं बाहेर येते.
ती गाडीतून उतरते.तो नराधम निघून जातो. त्यानं डाव जिंकलेला. ताव मारलेला असतो. ती मस्ती काही औरचं असते.
ती येते पोलिस स्नटेशनला.गुन्हा नोंद होतो.तो कोण माहित नाही.हल्ली पोलिसांवर विश्वास नाही. तिनं गुन्हा नोंदवण्याचा धाडस तरी केले.तिला हे पण माहित नव्हतं की तो कोण आहे? तो कोण असू शकेल? तो भयंकर क्रूर माणूस होता.तो हैवानचं होता. हे तर तिनं अनुभवलचं होतं.त्याच्याशी पंगा घ्यावा लागला.तो मोठ्या लोकांच्या बॅनरवर झळकणारा जीव जंतू आहे.त्याला पळून जाण्यासाठी त्याला इथले बिलंदर पुढारी मदत ही करू शकतात. हे तिला माहित नसतं.तिचा विश्वास होता.इथल्या कायद्यावर पोलिसांवर, घटनेवर...!! ती गुन्हा नोंदते. गुन्हा नोंदवला की,
सुरू झाल्या ब्रेकींग न्यूज.न्यूजचं न्यूज..!!!बातम्या या एन्टरटेनमेंट साठी असतात का? नसतील ही..!! पण आमचा छान करमणूक होते.बोथट झाल्यात जाणीवा आमच्या.एकच सुरू होते. सणसणाटी.
(सौजन:टी.व्ही 9 मराठी)
वाजवा रे वाजवा...!!! बलात्कार झाला आहे.मिडीयावर सध्या सारं असं सुरू आहे.पोलिसांनी त्याची ओळख पटवली.त्याच्या गावातूनच त्याला उचलला.तपास सुरू झाला.बातम्यांचा धुमाकूळ सुरू झाला.
एवढं सारं घडते आहे.चला,त्याचं थोडं राजकारण करू.खेळ सुरू झाला.
बलात्कार करताना ती ओरडली का नाही? हा बलात्कार कुणी पाहिला का नाही? तिचं कपडे फाटले का नाहीत. बचावासाठी तिनं काहीचं प्रयत्न केला का नाही?
प्रश्नचं प्रश्न. !!!
हे सारं पुण्यात घडते आहे. सारख्या बातम्या सुरू आहेत. पुणे पण बदनाम होऊ शकते ना? बीड सारखं? पुण्याच्या नेत्यांना टेन्शन..!! त्या एसटीत जाऊनचं मिडीयाचे कॅमेरे धडकले.काय काय सापडलं त्या एसटीत? ओढणी..कंडम्स...साडया .अजून काय काय?स्वारगेट सारख्या स्टेन्शनची तर पारचं नालास्ती केली. गपा ना यार..!!या शहरांना जिल्ह्य़ांना पण इज्जती कधी चिकटवल्या. कुणी चिकटवल्या त्या ?
प्रत्येक गोष्ट घडली कीच राजकारणी लोकांनी बोललं पाहिजे का?किती बोलतात हे लोक?कायदा,तपास काही असतो की नाही?
अरोपीचे वकील दावा करतात संबंध झाले पण सहमतीने.
आता खरं कुणाचा? तिचं का त्याचं?
बलात्कार झाला की, लफड होते ते..का पेड सेक्स?
एका पुढारनीने तर निकाल देऊन टाकला.
पैशाच्या व्यवहारातून सारं हे झालं.
होऊ दया तपास... लागू द्या निकाल... इतका दम कुणाला?
साहित्य, शिल्प, नाटक, तमाशा व चित्रपट – सत्तांतरासाठीचे विषारी साधन
साहित्य, शिल्प, नाटक, तमाशा व चित्रपट – सत्तांतरासाठीचे विषारी साधन " Love lovestory in Marathi " Chhaava-Hindi move( Vicky Kou...

-
युध्दं पेटले आहे – जगण्याचा चंग आणि संघर्षाच्या गर्जना करणा-या माणसांच्या कविता. 'युध्द पेटले आहे 'हा बाळासाहेब नागरगोजे यांचा पहिला...
-
पाराकं आरगन वाजल . बॅन्डवाल आलं . ते आलं की सलामी देत्यात . आरगनाचा मोठा आवाज सा - या गावात घूमू लागला . तशी बारकाली पोरं ... पोरी चींगा...
-
Group phota of Poet &Staff पाटोदा येथे सामाजिक समता सप्ताहानिमित्त भव्य काव्यसंमेलन – कवींच्या प्रभावी सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध #सामा...