Phaltan Doctor Death: महिला डाॅक्टरच्या आत्महत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट, पोलिस अधिकाऱ्याने केला अत्याचार, CM फडणवीसांचा सातारा एसपींना फोन
Phaltan Doctor Death: महिला डाॅक्टरच्या आत्महत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट, पोलिस अधिकाऱ्याने केला अत्याचार, CM फडणवीसांचा सातारा एसपींना फोन
Phaltan Doctor Death: डाॅ.संपदा मुंडे यांनी हाॅटेलमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. त्यांच्या सुसाईड नोटमध्ये पोलिस निरीक्षक गोपाल बदने यांनी त्यांच्यावर अत्याचार केल्याचा उल्लेख आहे.
Phaltan Doctor Death:* साताऱ्यातील फलटण शहरामध्ये महिला डाॅक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी पीडित डॉक्टरनं आपल्या हातावर सुसाईड नोट लिहिलेली आहे. या नोटीमध्ये पोलिस निरीक्षक गोपाल बदने याने आपल्यावर चार वेळा अत्याचार केल्याचे म्हटले आहे. तसेच प्रशांत बनकर याने आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याचा उल्लेख आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी साताऱ्याचे एसपींना फोन करून तत्काळ दोनही पोलिसांना निलंबित करत त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची दखल महिला आयोगाने देखील घेतली असून संबंधितांवर कठोर करावाईच्या सुचना पोलिसांना केल्या आहपीडित डॉक्टर महिलेला त्रास दिला जात असल्याची तक्रार पोलिसांमध्ये केली होती. मात्र, त्यांच्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही. त्यांनी आत्महत्या करण्याचा देखील इशारा दिला होता. मात्र, डीवायएसपींकडे तक्रार करून देखील दखल घेतली नाही, असे पीडितेच्या काकांनी सांगितले.
दरम्यान, पीडित महिलेने याआधी त्यांना होणाऱ्या त्रासाबाबत तक्रार केली असल्यास त्यांना मदत का मिळाली नाही याचीही चौकशी व्हावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी, अशा पोलिसांना सूचना केल्याचे महिला आयोगाने ट्विट करत सांगितले आहे.

टिप्पण्या