पोस्ट्स

जुलै, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

राजीनामा झाला; पण लोकशाहीचा विजय तेव्हाच, जेव्हा युवकांचा विश्वास परत मिळेल | विश्लेषण

इमेज
राजीनामा झाला; पण लोकशाहीचा विजय तेव्हाच, जेव्हा युवकांच्या जखमांवर विश्वासाचे फुंकर घातले जातील राजीनामा हा पराभव नाही; उत्तरदायित्वाची सुरुवात आहे अखेर राजीनामा झाला. खरं तर तो खूप आधी व्हायला हवा होता. कारण काही निर्णय केवळ राजकीय नसतात, तर ते नैतिक जबाबदारीशीही जोडलेले असतात. जनतेचा रोष उफाळून आला, युवक रस्त्यावर उतरले, आंदोलन तीव्र झाले आणि राज्यकर्त्यांवर उत्तरदायित्व स्वीकारण्याची वेळ आली. अशा वेळी राजीनामा हा पराभवाचा नव्हे, तर लोकशाहीच्या सन्मानाचा निर्णय मानला जातो. लोकशाहीत सत्ताधारी आणि आंदोलनकर्ते यांच्यात संघर्ष होऊ शकतो; पण तो संघर्ष लोकशाहीच्या चौकटीत राहिला, तर त्याचा शेवट विजय-पराभवात होत नाही. तो उत्तरदायित्व, संवाद आणि विश्वासाच्या पुनर्स्थापनेत होतो. आंदोलनात हार-जीत नसते काहीजण या आंदोलनाकडे "सरकार हरले" किंवा "आंदोलन जिंकले" अशा नजरेतून पाहत आहेत. ही मानसिकता लोकशाहीला शोभणारी नाही. लोकशाहीत आंदोलन हे विरोधाचे शस्त्र नसून, संवादाचे माध्यम असते. सरकारने जनभावनांचा आदर करून निर्णय घेतला, तर त्यात सरकारचा पराभव नसतो. त्याचप्रमाणे आंदोलनकर्त्यांनी...