एका काॅलगर्लची डायरी | प्रेम, वेदना आणि समाजातील वास्तवाची सत्यकथा

एका काॅलगर्लची डायरी | प्रेम, वेदना आणि समाजातील वास्तवाची सत्यकथा

मराठी कथा marathi story
Callgirl'sDairy marathi story







भाग आठवा

गाडीनं वेग घेतला होता.पाऊस जोरात चालू होता. त्याने मॅडमचे दोन्ही ही हात धरले होते.काचा बदं होत्या.ओरडून ही काही उपयोग होणार नव्‍हता.कॉलनीत क्वचितच गाडया येत जात होत्या.अश्या उच्चभ्रू कॉलनीच्या रस्त्याला मुळातचं कित्तीकशी  रहादारी असणार? ज्या पध्दतीने तो मॅडमला ट्रीट करत होता त्यावरून त्याचा इरादा काही चांगला नव्हता.तो फारच वासना व्याकूळ झाला होता.मुळात त्यांच्या गाडीत बसणचं चूक होतं.दोन पुरूष असतानी आपण कसं त्या गाडीत बसावं?मॅडमचा कॉन्फीडन्स त्यांना नडला की काय?अशी  भीती मॅडमलाचं वाटतं होती.


                      चौधरी ही मागे दिसत नव्हता.त्यांना लोकेशनं ही कळणार नव्हतं कारण मोबाईल त्यानं फेकून दिला होता.मॅडमच्या अंगाला धरधरून घाम फुटला होता.त्यांच पडलेला पदर ही त्यांना सावरता येत नव्‍हता.त्यांनी दोन्ही हात त्यांचे गच्च पकडले होते.

“प्लीज,गाडी थांबवा.मला कुठे नेत आहात.माझा मोबाईल.?” राधा मॅडम कळकळून बोलत होत्या.तो मॅडमचं ऐकण्याचा काहीच ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हता.त्याचा मूडच पार वेगळा होता.त्या मुर्खाला कळतं नव्‍हतं.तो एका पोलीस अधिका-याशी पंगा घेतोय.

“तुला आज सोडणार नाही.”तो टक्कला माणूस त्यांच हात अधिक गठ्ठ पकडत व त्याची वखवखलेली नजर त्यांच्या छातीवर रेंगाळत बोलला.

“मी तसली बाई नाही.सोडा मला.”मॅडम काकळूती येऊन बोलत होत्या.तो अश्यात त्यांना सोडणार नव्हता हे त्यांना ही कळनू चूकलं होतं.आपण पोलीस अधिकारी आहोत असं त्याला डाऊट येऊ नाही म्हणून त्या एका असहाय्य स्त्रीचे नाटक करत होत्या.

“तू कसली आहेस हे कळलं की आम्हाला?”वासनेने पेटलेला माणूस परिणाम वगैरे गोष्टीचा फार विचार करू शकत नाही.

“कसलीय मी ?” तसल्या ही परिस्थितीमध्ये त्याच्या डोळयात पहात त्या बोलल्या.तो इशारा ही सभ्य नव्‍हता.अगोदरचं वासनेने पेटलेल्या माणासाला अजून तुम्ही किती पेटवणार? हे फक्त राधा मॅडमसारख्या धाडसी व जिददी अधिकारीचं करू शकत होत्या.ते टक्कल तर पागलचं झालं होतं.मॅडमची पण रिस्क वाढत होती.

“तुझ्या बोलण्यावरून,चालणवरून कळतं की.तू कोणेस ते? छप्पन्न वाट लावल्यल्यात तुझ्यासारख्या. तुझा क्रमांक सत्तावन्नवा आहे.”

“माझा क्रमांक 57 वा आणि साराचा?” तसल्या ही परिस्थितीमध्ये त्यांनी सारा विषयी त्याला विचारलंचं.त्याचं पित्तचं खवळलं.

“काय सारा सारा लावलंय ग? त्या मेलेल्या बया विषयी मलाच सारखं सारखं का विचारतेस?नेमकी कोणेस तू?”त्याला काही तरी डाऊट आला होता.त्यानं हाताला झटका देत विचारलं.आता ख-या औकतीवर तो आला होता.तो मॅडमला अरे तुरे करू लागला होता.हिला वापरायचं.तसं सोडायचं नाही. त्यानं मनोमन पक्क ठरवून ठेवलं होतं.

“घाबरलात? खरचं ती पोलीस डिटेक्टीव वगैरे कुणी नाही.मी आहे साराची मैत्रिण."आपली ओळख कुणी मैत्रिणाच्या संदर्भाने देतं का?

“छे..!!मी का घाबरू? तू कुणी ही असली तरी मी आज तुला सोडणार नाही.आय वाँन्ट यू.ओन्ली यू.”तो बेफीकीर झाला होता. बेफीकीर माणसं फारचं धोकादायक असतात.

“सारा आणि तुम्ही कधी?”

“कसली सारा.कोण सारा?  कधी पाहिलीच नाही.आता जर तू तिचं नाव घेतलं तर?” त्यांन मॅडमवर हात उचलला. तसा मॅडमने त्याच्या हाताला हिसका दिला.

“मारणार का मला?”

“साराचं नाव घेतलं तर मी मारू शकतो.माझ्या डोक्यात जाऊ नको.”

“साराचं इतका राग येतोय तुम्हाला.”

“साराचा नाही.मला तुझा राग येतोय?” त्यानं मॅडमचे केस ओढले.दात ओठ खाल्ले.केस ओढल्यामुळे मॅडम जोरात ओरडल्या.एका ठोश्यात आपण त्याची बत्तीसी घशात घालू शकतोत हा आत्मविश्वास त्यांना होता.त्या संयम ठेवू शकल्या.त्यांना या घडीला तरी सयंमच महत्वाचा वाटला.

“एका सुंदर व तरूण स्त्रीशी नेहमीचं असंचं वागता का तुम्ही?हात तर सोडा माझे.प्रेमाने स्त्रीचं काय जग ही जिंकता येतं.”

“तुझ्याशी प्रेम करू मी? एका रांडेशी.”

“प्रेम नका करू पण थोडी दया तर करा.फुलं ओरबाडून हुंगण्यापेक्षा अलगद हुंगलेलं कधी पण चांगलं असतं. फुलांच्या मर्जीनुसार  फुलांचा आस्वाद घ्यावा.फुलं आपले रंग गंध उधळण्यात कंजूषी नाही करतं.जरा माझे हात तर सोडा की.”त्यांन हात सोडले. मॅडमने पदर सावरला.आता त्या सावध झाल्या होत्या.

“तू साराची मैत्रिण नाही होऊ शकतं.”

“असं काय तिच्यात वेगळपण होतं माझ्यापेक्षा.”त्या हलकासा डोळयात  पहात मॅडम बोलल्या.

“ कितीदा सांगितले ग तुला? मी नाही ओळाखत तुझ्या त्या साराला.तू जरा अलंकारीक बोलतेस.ती तसली बाई होती ना.तिची भाषा अशी नसणारचं ना?”

"तसली म्हणजे कसली?"

"ती धंद्यावालीचं असणार ना?"

"कशावरून?"

"तिची बाॅडीचं फुल्ल नेकडं सापडली ना? मारताना ही भोंगळी सापडली म्हणजे ती काय सभ्य असेल काय? तसल्या हॉटेलवर  काय आरती करायला गेली असेल काय?ती टाॅपची रंडी असणार."

"तिच्याविषयी बरेच अंदाज काढू शकतात तुम्ही."

"ऐ,छिनाल ,मला तिच्या विषयी काही ही माहिती नाही.तुझ्यात आयला..." तो मॅडमच्या अंगावर धावला.

“बरं ठीक. एक सांगून ठेवते.छिनाल वगैरे काही म्हणायचं. मी एक सभ्य स्त्री आहे.”

“तू आणि  सभ्य?" त्यांच्या अंगभर  नजर फिरवत तो बोलला.

"माझं लग्न झालाय."

"नवरा असला म्हणून काय झालंय? मज्जा आणि पैसा कुणाला नको असतो.नवरा असलेल्या बाया पण बेड शेअर करतात कित्येक.”

”खरयं हे पण.मी तसली नाही. आपला काही तरी गैरसमज झालाय.सारा असचं काही तरी नक्कीच असावी.फार मज्जा करायची ती.पैसा आणि पुरूष? वीक पाँईट होते तिचे.तुमच्या कडे इतकी तीव्र सोंदर्यदृष्टी व पैसा असताना तिनं तुम्हाला सोडलचं नसतं.”

“मला ना ही भेटली ती. आता जर तिच्याशी माझं नाव जोडलाय ना?"

आता कुणाशी नावं जोडून काय होणार?कायमची गेली ना ती.”मॅडम  इमोशनल झाल्या होत्या.

“गप बस.तू नेमकी कोणेस? सांग सांग.”त्यांचे नरड दोन्ही हातान दाबत तो बोलला.विवेक ही कधी कधी रागात असंच गळा दाबतो.या पुरूषांना स्त्री महणजे काय कोंबडी वाटते का?मॅडम घाबरल्या होत्या.आता जास्त वेळ असंच त्या सोबत या गाडीत राहण फारचं रिस्की होतं.मॅडम बराच वेळ गप राहिल्या.आता गाडीत शांतता पसरली.एका गल्लीत गाडी घुसली.रस्ता  निर्मनुष्य होता.पाऊस चालू होता.आंधार गच्च दाअन आला होता.


               तेवढयात त्याचा फोन वाजला.तो आता फोन कट करेल असं वाटलं होतं पण त्यानं गाडी थांबायला सांगितलं.खाली उतरला.गाडीचे दरवाजे लॉक केले. मॅडमला एकटीलाच गाडीत ठेवले. मॅडमच पण बारीक लक्ष त्याच्या हालचालीवर होतं.

“हॅलो,बोल लवकर मी बीझी जरा मी.”मॅडमला ऐकू जाणार नाही याची दक्षता  तो घेतच होता. कॉल फारचं महत्वाचा असावा. बराच पाच मिनीटे ते फोनवर बोलले.गाडीत आला.

“साराची मैत्रिण ना तू ?ती सारा असेल आणि तू नायरा असेल?तुझं नावं नायराचं का?” तो बोलला. तो गंभीर झाला होता.थोडी फार जी दारूची नशा होती. ती पण उतरली आसावी.


“अय्या तुम्हाला कसं कळलं? माझं नाव नायराचं आहे.” मॅडम हासत बोलल्या. ते हसू पूर्णपणे कृत्रिम होतं.

“ती सारा.. तू नायरा…!! नाटक छान करतेस.”

“यात काय नाटक? खरं बोलतेय मी.”

“खरं खोंटं.तुझा खेळ खल्लास. राधा देसाई मॅडम.मला कॉफी हाऊसमध्येच डाऊट आला होता. तिच्या सारखी साडी नेसून आली होतीस. तुझा ट्रॅप मध्ये मी नाही माझ्या ट्रॅपमध्ये तू सापडलीस. आता चलाखी करू नकोस. तुला या कार मध्ये आता जिवंत जळायचं आहे.”त्यानं गाडीचं दरवाजे बंद केले. मॅडम पायाने काचावर लाथा घालत होत्या.ती गाडी बुलेटप्रुप होती. काय होणार होतं? मॅडम आत मधून ओरडत होत्या पण वाचवायला तिथं पडत्या पावसात कोण येणार होत? ते हासत होते. गाडीवर पेट्रोल टाकत होते. मॅडमची अखेरची धडपड चालली होती.पाऊस ही इरेला पेटला होता.

(पुढील भाग लवकरचं)

हे भाग ही वाचा

एका काॅलगर्लची डायरी भाग 7

एका काॅलगर्लची डायरी भाग 6

एका काॅलगर्लची डायरी भाग 5

एका काॅल ग्रूपची डायरी भाग 4

एका काॅलगर्लची डायरी भाग -3

एका काॅलगर्लची डायरी भाग 2

एका काॅलगर्लची डायरी भाग 1






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

. एका काॅलगर्लची डायरी भाग 1 | प्रेम, वेदना आणि समाजाच्या वास्तवाची सत्यकथा

युध्द पेटले आहे – जगण्याचा चंग आणि संघर्षाच्या गर्जना करणा-या माणसांच्या कविता.

झापूक झुपूक मराठी चित्रपट समीक्षा | Zapuk Zupuk Marathi Movie Review in Marathi | Suraj Chavan | Kedar Shinde