ह्रदय गुंतता ह्रदय हे.(भाग 4)
.jpeg)
रात्रीचे दहा तरी वाजलं असतील. तृप्ती नि निलेश मार्केटमधून घरी परतत होते.आज निलेशचा मूड ही चांगला होता. बराच वेळ फिरल्यामुळे एक थकवा आला होता.एका हॉटेल जवळ त्यानं गाडी पार्क केली. ते हॉटेलात शिरले. जेवायचं की नुसतं कॉफी घ्यायचं हे त्यांनी काहीच ठरवलं नव्हतं. तसं बाहेर येण्याचं काही प्लॅन नवहता.दोघ ही गप्पात मग्न होते. समोरच्या टेबला वर एक कप्पल होतं. अर्थात त्यांच्याकडं याचं लक्ष नव्हतं.ती बाई सारखं तयांच्याकडं पहात होती. तृप्तीचं लक्ष ही गेलं पणतिनं ते इग्नोर केलं. ती दोघाकंड पहात आहे की एकटया निलेशकडं पहात आहे याचा अंदाजला घ्यावासा वाटला.तिच्या समोर जो माणसू बसला होता. तो नक्की कोण असावा तिचा? नवरा की वडील? समोर छान् अक्क्ल पडलं होतं. देह कसा बसा खूर्चीत मावला होता. इतकं तंतोतंत तो कसा काय खूर्चीत बसू शकला असेल? तृप्तीला प्रश्न पडला. जास्त वेळ त्याच्या कडं पाहण्याचा प्रयत्न तृप्ती करणार नव्हती. ते बावळट पुन्हा पहात बसायचं आपल्याकडं. आपल्या बायका, पोरी बरोबर आसल्या तरी बरीचं थोराडं माणसं दुस-याच्य बायका...