अर्धा कोयता’ – श्रमिकांच्या संघर्षाचा जिवंत दस्तऐवज

अर्धा कोयता’ – श्रमिकांच्या संघर्षाचा जिवंत दस्तऐवज अलकानंदा घुगे - आंधळे यां चा ' अर्धा कोयता ' हा कथासंग्रह नुकताचं वाचनात आला.कथासंग्रहाचे शीर्षकावरून आपला असा समज होतो की , हा ऊसतोड कामगाराच्या जीवनावर अधारित क थां चा संग्रह असेल पण अगदीच तसा नाही तो.या कथासंग्रहात ग्राम्य जीवनाच्या खडतर संघर्षाच्या चटके देणा-या ही अनेक कथा आहेत. वाटयाला आलेला संघर्ष , खेड्यातील कष्टप्रद खडतर जीवन , दारिद्रय , अज्ञान , मतलबी राजकारण , व्यवस्थेने निर्माण केलेली अनेक आव्हान व त्या आव्हानाला भिडणारी कमालीची जिद्दी माणसं या सा-या गो ष्टीं नी लेखिकेचे भावविश्व समृध्द झालेले दिसते आहे. ...