झापूक झुपूक मराठी चित्रपट समीक्षा | Zapuk Zupuk Marathi Movie Review in Marathi | Suraj Chavan | Kedar Shinde

झापूक झुपूक : हास्य, हृदय आणि हिट संगीत यांचा परिपूर्ण मेळ..!! झापूक झुपूक मराठी चित्रपट Suraj Chavan | Kedar Shinde झापूक झुपूक मराठी चित्रपट समीक्षा | Zapuk Zupuk Marathi Movie Review in Marathi | Suraj Chavan | Kedar Shinde प्रदर्शन तारीख : २५ एप्रिल २०२५ दिग्दर्शक : केदार शिंदे मुख्य भूमिका : सूरज चव्हाण, जुई भागवत, इंद्रनील कामत, मिलिंद गवळी प्रकार : रोमँटिक कॉमेडी ड्रामा कथासारांश: 'झापूक झुपूक' म्हणजे प्रेमाची गंमत "झापूक झुपूक" ही गावातील निरक्षर शिपाई सूरजची (सूरज चव्हाण) प्रेमकथा आहे. त्याला नव्या शिक्षिका नारायणी (जुई भागवत) वर प्रेम जडते, पण तिला इम्प्रेस करणं हे काही सोपं नसतं. प्रेमपत्र लिहिण्यापासून ते गावकऱ्यांच्या कुजबुजीपर्यंतचा प्रवास थट्टा-मस्करीतून उलगडतो. मात्र शिक्षिकेच्या भूतकाळातील गुंतागुंतीमुळे आणि तिच्या आमदार वडिलांच्या दबावामुळे गोष्टी वेगळ्या वळणावर जातात. Reel Star to Hero अभिनय: सूरज चव्हाणची चमकदार एंट्री हा चित्रपट सूरज चव्हाणसाठी अभिनयातील पहिलं पाऊल आहे, पण त्याची सहजता आणि नैसर्गिक अभिनय शैली डोळ्यात भरते. गावातील टि...