पोस्ट्स

फेब्रुवारी, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

राजे तुम्ही परत या तळपती तलवार घेऊन

इमेज
शब्दांकन: परशुराम सोंडगे autoplay अावाज: परशुराम सोंडगे

पुरस्काराचे खारमुरे

इमेज
कथा अाणि व्यथा --------------------- पुरस्काराचे खारमुरे ************* आज सकाळीची गोष्ट.मी घाईत चाललो होतो.तेवढयात आमचा मित्र विकास लांडगेनी मला आवाज दिला.तेआवाज देणं म्हणजे साक्षात बोंबलणंच होतं.लांडगे फार उत्साहात होता.त्याचा उत्साह इतका होता की तो पार धावतच माझ्या जवळ आला.त्याचं आपल्याकडे काय काम असेल किंवा असू शकेल याचा अंदाज काढणयात मी गर्क असतानाच ती स्वारी पार मला येऊन धडकली. हातानेच ऒढू लागला."चल घरी चहाला."  "चहा? कशाला तसदी देतोस वहिनीला." "त्यात काय तसदी? च्या तर प्यावाच लागेल आज."  "आज काही विशेष?" "विशेषच आहे.पेपर नाही वाचले का आज? "  "नाय बुवा."  "व्हाॅट्स अप तरी पाहीलं का?"  "नाय बुवा." "फेसबुक तरी."  "नाय बुवा.टायमच नाय भेटला." "मग कसं कळेल." "असं काय झालं की ते मला कळलचं पायजे"  "झालं काहीच नाही.पुरस्कार भेटलाय ."  "आता कसला भेटलाय?"  "समाजभुषण...?"  "कुणाला?"   "मलाच .दुसरं कुणाला? हा साधा नाही.राज्यस...

कुणात जीव रंगला

इमेज
कुणात जी व रंगला परवा आमच्या शहरातल्या मोठया कपडयाचा दुकानात जाण्याचा योग आला.असा योग नेहमीचं येतो. सौ.चा हट्टच होता.मेहूणी आली होती. आम्ही त्या अलीशान, भव्य दुकानात शिरलो.ते पण कसबसं... यात नेहमीचं प्रचंड गर्दी असते. दुकानातल्या गर्दीला एक प्रकारची शिस्त असते.या दुकानात तसं काही नाही नसतं.तो एक बाजारचं असतो. नुसता गर्दा... कसं उभा राहयचं . लेडीज विभात गेलोत. त्यात पुन्हा वयानुसार, फॅशननुसार विभाग ... दवाखान्यात जसे सुपरस्पॅशालिटी डाॅक्टर असतात अगदी तसंच इथं ही होतं . सारं सारं स्पशेलचं. दुकानात पोहचल्या नंतर माझं काम संपलं होतं. माझ्या एटीएमचा ताबा त्यांनी कधीच घेतला होता. मी आपलं उग इकडं तिकडं पहात होतो काय करणार? समोरच्या एका कांऊटरवर मला एक मुलगी दिसली. ती सेल्स गर्लच होती. या दुकानात दोनशे तीनशे तरी वर्कर असतील. त्यात ती नवखी वाटत होती .थोडी आर्कषक होती. अगदीचं मोहक वगैरे नाही. बाकीचं पण अनेक मुली मुलं होती.काही प्रौढ ही होती पण ती जरा वेगळीच वाटतं होती. ती तन्मयतेने काम करतं होती. ग्राहकाला तत्पर सेवा देत होती. तिचं बोलणं शांत होतं.ते ब-यापैकी मधूर असावं.मला तर ती प्रमा...

जीवाशी खेळ

इमेज
पहाटं पहाटं नगर गाठलं.जिपडं हास्पीटलच्या दारातचं उभं केलं. शिव्या खाली उतरला .मागं गेला .पल्लीला उचल्लं.तशी ती मोठयांन विव्हळली. तो तिला घेऊन पाय-यावर आला.तिथचं टेकवली .टेकल्याबरूबर ती लगेच कलांडली.तिचा पार आकडा झाला होता.पारचं गळाटून गेली होती.त्याची सासू सारं बोचक घेऊन माग आली. पल्लीच्या त्वांडावर हात फिरवला .तशी पल्ली विव्हाळली,"आयो मेले गं..!!" ड्रायव्हर विलाश्यानं पुढी काढली.ते काय करील दुसऱ...? तसचं धाबाड उचाकलं नि त्यात सोडली अन् पायरीवर टेकला . बसलं पचापचा थुकतं. कचाकचा पाय-यावर चढून तो पार वर आला दुस-या मजल्यावर आला. चौकशीच्या खिडकी जवळ तो आला .तिथं एक नर्स नि एक पोरगा व्हता .त्यांच आपलं काही तरी गुलूगुलू चालं व्हतं. बराचं येळ उभा राहिला तरी ते कशाला आला म्हणून हटकीनात .बरं ते काय बोलतेत. हे भी याला नीट कळन ते काही म-हाटीचं बोलतं पण काही इंग्लीश हाणीत . " मॅडम पेंशट आणलं व्हतं ?" "काय झालयं?" तिनं काय झालं हे इचारलं की गडी जरा बुचकाळयातचं पडला .आता या पोरीला काय सांगावा ? गडयाला लाजच वाटू लागली . तेव्हं जरा इरमलाचं. "काय नाय ...मामीला बोल...

एका माणसाची गोष्ट

इमेज
कथा आणि व्यथा                                        एका माणसाची गोष्ट  शेवटची बस चुकली. आता खाजगी वाहना शिवाय पर्याय नव्हता. पाण्याची बाटली घेतली. ढसा ढसा पाणी प्यायलो. आता खाजगी वाहन जिथं लागतात तिकडं निघालो.थोड पुढं चलत गेलो की एक पोरगा पळत पळत आडवा आला. तो पण ओरडतचं," साहेब, पाटोदा ना ?" " हो, तुला कसं कळलं ?" " असं कसं ? तुम्हाला कोण ओळखत नाही? "  अशी स्तुती केली की मला थोड मूठभर मांस अंगावर चढल्यासारखं वाटलं. " बरं तुझी गाडी कोणती ?' " मॅक्स आहे साहेब " " टेप ?" " आताच नवा कोरा बसविला ...सांऊड सिस्टीम पण.." " पण ड्रायवर चांगला का ?" " एकच नंबर ? त्याच्या ड्रायव्हींगला तोड नाय. लय हात साप त्याचा" " अरे...! तो दारू वगैरे ?" " आता साहेब धंदाच असलाय ? पण स्टेरिंग हातात तोपर्यंत थेंबाला पण शिवत नाही. लयं तात्वीक माणूस .त्याच्या इतकं या लाईनीत शिकलेलं नाही कुणी " तो फार कॅान्फीडन्शली बोलत होता.त्यानं माझ्या हातातली बॅग घेतली व चालू लागला. मी ही अटी मान्य करूनचं ...