म्हतारीचं कॉन्फीडन्स

कथा आणि व्यथा म्हतारीचं कॉन्फीडन्स दुपारची वेळ होती. मुलांची मधली सुट्रटी ची वेळ झाली होती. खिचडी तयार झाली होती.घंटी वाजली.तसा मुलांचा लोंढा बाहेर पडला.सारी किलबील सुरू झाली.भातावाली बाई तयार झाल्या होत्या. मुलांची रांग केली. त्यांना काही सूचाना केल्या आणि तिच भींतीला टेकलो.मुलं येत होती .जात होती. तेवढयात एक आजीबाई आल्या.हातात एक डबा होता.त्या काठी टेकून तिथचं शांत बसल्या.त्या खाली जमीनीकडं बघत होत्या.त्यांच लक्ष तिथं नव्हतं.त्यांच्या हातातला डबा पण त्यांनी लपवला होता.बहुतेक मी तो पाहू नये म्हणून त्यांनी तसं केल असावं. मी उगच जरा अलीकडं सरकलो.आता त्या मला पाहू शकत नव्हत्या पण मी थोडं पुढं सरकलो की सारं पाहू शके. सा-या मलांची खिचडी वाटून झाली. आजी उठल्या. डबा पुढं केला.त्या आमच्या...