सावर रे..!

ती उठली.खिडकी जवळ आली.पडदा मागे सारला.हळूच बाहेर डोकावली.बाहेर सारं सारं कसं शांत शांत होत.घरासमोरचा रस्ता.निपचीत पडलेल्या अजगरासारखा वाटला तिला.अकाशाचा विशाल कलश कलंडून चांदण जिथं तिथं विखूरल होतं. झांडाच्यापानापानांत.फुलाफुलांत.सृष्टीच्याकणाकणात.गच्चीवच्या रातराणीकडं तिचं लक्ष गेलं.ती तर चांदण्यात न्हाहूनच गेली होती.हलकसं वारं आलं. ते पहाटं वारचं.गारा अगांस झोंबला. तसं थोडसं तीनं अंग चोरलं.तिचं मोकळे केसं नकळतचं भुरं भूरले.भुरभूरते केस तिनं सावरले. तशी इतकीसी गरज नव्हती पण तिची ती स्टाईलच होती. हटकेच स्टाईल.तिची हीच तर स्टाईल तर अनेकांना पागल करून गेली होती. पागलच करत होती. झोंबत्या गा-यामुळे तिनं नकळत अंग चोरलं.शहारलेलं तिचंच अंग न्याहळणाचा मोह तिला आवरता आला नाही.आठवणीच असंख्यं फुलं तिला लगडून गेली. आज ती झोपूच शकली नव्हती. दुपारचा प्रसंग तिला जसाच तसाच आठवत गेला.आठवला कसला? ते चलचित्र नुसतं डोळया समोरून सरकत होतं. पश्चतापाच्या सूक्ष्मं सुईनं काळीज नुसतं टोकरलं जातं होत.समीरची तरी काय चूक होती? मुळात तसा नाहीच तो. पण आज नको तेच झालं.त्यानं ओढलं की तिचं त्याच्या मिठठीत...