पोस्ट्स

मार्च, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पळस-धगधगती अग्नी फुले

इमेज
               पळस -धगधगती अग्नी फुले                      पळसं-धगधगती अग्नी फुले वक्षावरती तुझ्या एकदा मी असा रंग पाहिला होता. रानातल्या रान पळसाला तो कधीच सुचला नसता .      कुसूमाग्रज गावाकडं जाण्याचा योग आला . उन्हाळाचं दिवस होते . रा नं रानं भकास झालेली . दुष्काळां चं सावटं   गाव शिवा री पसरलेलं होतं . वर आग ओकणारा सूर्य . अख्ख्या शिवारात कुठं पाण्याचा थेबं नाही . रान रान रणणत्या उन्हात भाजतं होतं . दूरवर क्षितीजावर मृगजळाचं तळं घुसमुसतं होतं . तापलेल्या मातीतून चटके बसते होते.आता गाव बदलली . गावाची शहरं होऊ लागलीत. रान - वन ही बदलेले . शिवारं बदलं . सारं सारं बदलं आसलं तरी   भर उन्हाळयात भेटणारा पळसं मात्र अगदी पहिल्यासारखचं दिमाखत भेटला . पळसं . भर उन्हाळयात लाल फुलांची उधळणं करत तो बांधा बांधावर बहरला होता . नदीच्या तरी , टेकडीच्या कुशीत , डोंगराच्या दरीत द...