पोस्ट्स

मे, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पेढयांचे वझं

सांयकाळचं पाच वाजलं असत्याल . फटयावर   जाल्बा नि त्याचं पोरंग तुष - या आलं होतं . त्यांना इथून पुढं बीड गाठायचं होतं . दोघा जवळं भी निबार वझी होती . पिशव्या . बाजकी . म्हतारीनं काही बाही दिलेलं . संगी जालूची बायको नि भी नको नको म्हणून बरचसं वझं केल होतं . दाळी नी दुळीनं . माळवं . काही घरचं काही   दुस - याकडून आणलेलं . दोंघांनी वझी टाकली हूश्य केलं . जाल्बानं रूमालनं सारा घाम पुसला . हाटलात जाउन चौक्शी केली पाची एसटी गेली का तर ? आताच गेली . पाचच मिनीटं झालं आसत्यालं . असं त्या हाटलत्लया पो - यानं सांगितलं . “ आयला , आता पार काशी झाली . आता कसं जायाचं ?” जाल्बाच्या उरावर मोठा दगड ठेवल्यासारखं झालं . माटकुणी खाली बसला . तांबाखूची पिसी काढली नि बसला चोळीत . तुषा - याला काही नव्हतं त्याचं . ते खुशीत होतं . बीडला जायाचं . तिथं राहयाचं . कॉलेजात जायचं . असली चांगली चांगली सपन त्याच्या भोवती नुसतं   फुलपाखरावाणी भिरभिरत होती . ते मनातील मनातचं गुंग झाला होतं . पाचच्या   एस टीनं ...