सागरी किनारा ,ती आणि मी
सागरी किनारा ती आणि मी. तुम्ही समुद्र कधी पाहिला? नक्की आठवत नाही ना? मी प्रत्यक्ष समुद्र पार उशीरा पाहिला आहे. मात्र समुद्राविषयीचं माझं आकर्षण फार लहानपणी तयार झालं होतं. मी एक चित्रपट पाहिला होता. तो पण व्हिसीसी आर वर.लहानपणी आमच्या गावात लग्न झालं की वरात साजरी केली जाई. ती वरात म्हणजे अख्ख्या गावांसाठी पद्धतीचं असायची. वरातीत गावक-यांच मनोरंजन करता यावे म्हणून चित्रपट दाखवत असतं. एका वरातीत मी हा चित्रपट पाहीला होता.मुंबईचा फौजदार.त्यातलं हे एक गाणं मनात खोलं रूतून बसलं होतं.त्या गाण्या सोबतचं समुद्र ही मनात घर करून बसलेला. 'हा सागरी किनारा.... ओला सुगंध वारा. ' अथांग सागर, उसळणाऱ्या लाटा आणि तरूण जोडप्याचं ते प्रणय धुंद गाणं... मनात नुसतं रेंगाळत राहिले अनेक दिवस. माझं वय ही तसचं होतं.बालपण सरून तारूण्याच्या उंबरठ्यावर आलेलं.तारूण्याचा बहर तनामनावर मोहरून आलेला.ते शब्द,ते स्वर, संगीत आणि अभिनय मनात सारचं नुसतं रूंजी घालतं होते.ते गा...