होय ,राजकारण एक धंदा आहे.
.jpeg)
होय,राजकारण एक धंदा आहे. राजकारण हा एक लोकप्रिय धंदा आहे. राजकरणाला धंदा मानायला कुणी तयार नाही.अलीकड सरार्स राजकरणाला एक धंदा म्हणूनच पाहिलं जातं.कार्यकर्ते,नेते धंदा म्हणूनच राजकारण करतात.नव्या पिढीला ही राजकरणात एक चांगल करिअर म्हणूनचं खेचतात पण धंदा आहे हे मान्य करत नाहीत. वेश्येच्या धंदयासारखचं आहे हे. सा-यांना ज्ञात असून ही वाच्यता करता येत नाही.तसं सर्वांना माहित असते यांचा मुख्य धंदा राजकारणच आहे. अड्डयावर बसणारी बाईला सारे जाणतात की ती धंदा करते पण वेश्या म्हणून तिला तरी कुठं ओळख हवी असते. चारचौघीत तिला ही कुणी धंदयावाली म्हणून ओळखलेलं आवडणारं नसतं तसचं हे राजकारणाचं पण.राजकारण करणारी माणसं जनसेवा करतात.त्यांना विकास करायचा असतो असे ते सारखे बोलत राहतात.विकासाचा महामेरू,मतदार संघाचे भाग्यविधाते,लोकनायक,लोकनेते विकासाची गंगा आणणारे अवतारी पुरूष अशी अनेक विशेषण आपल्या नावा भोवती चिकटवून ते राजकारण करतचं असतात. मते मागतानी पण ते सेवेची संधी दया.आपलं मत विकासाल...