पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वीरचक्र विजेते माळी साहेब -अमर रहे

इमेज
 वीरचक्र विजेते तालुक्याचे भूषण माळी साहेब आपल्यात नाहीत ही गोष्टचं फार वेदनादायी आहे.संपूर्ण स्वच्छता अभियान मध्ये काम करत असताना त्यांच्या सोबत काम करण्याची संधी भेटली. वय झालं तरी कमालीची धडाडी व सकारात्मक विचारांची उर्जा त्यांच्या अंगी होती.त्यांच्या गावाच्या व  पाटोदा तालुक्याच्या स्वच्छता चळवळीला गती देण्यामागे त्यांचा फार मोठा वाटा आहे.    आजची सकाळ शुभ नाही. माळी साहेब आपल्या नाहीत.ही अतंत्य दुंखद घटना आहे.मृत्यू जरी अटळ असला तरी आपल्या तून आपल्याचं एका माणसाला घेऊन जातो ही बाब  जीवनाची क्षणभंगूरताच अधोरेखीत करते.मानवी जीवनाची ही पराधिनता सांगून जाते.   माळी साहेब शरीराने आपल्यात नसतील पण त्यांच्या आठवणी कायम मनात राहतील.तारूण्य ओसरलं तरी घडाघडी आणि जिद्द कशी उरात तेवत ठेवायची ,आपणच आपल्याशी प्रमाणिक कसं राहयच हे  त्यांच्याकडून शिकायच. मी एकदा त्यांना विचारलं होत," वीर चक्र भेटलं यासाठी तुम्ही अतुलनीय शौर्य दाखवलं असेलच ना?" ते हासत हासत म्हणाले," सरजी असं काही नाही.मी माझं काम प्रमाणिकपणे केले.अतुलनीय वगैरे काही नाही.मी लढाईत खेळत नव्हतो.मी लढ...

मरगळ

इमेज
दिवा जळत राहतो.प्रकाश उधळत राहतो.निरतंर. जळता जळता दिवा काजळत जातो.नकळतं.त्याचं त्यालाच कळतं नाही.हळू हळू अंधूक होतो.काजळी त्याच्याच शरीराचा काही अंश असते.तोच अंश त्याचं तेज गिळतो. ती काजळी झाडली की तो पुन्हा नव्याने पेटतो.प्रकाशाने फुल्लारून येतो.पुन्हा जळत राहतो.अंधाराच्या उरावर प्रकाश रेषा अधिक गडद करत राहतो. माणसाचं भी तसचं आहे ना? माणसाला येणारी मरगळ म्हणजे काजळीच की. अधिकचं प्रकाशमान होण्यासाठी,तेवण्यासाठी  अंग झटकावचं लागतं ना? ती जगण्याची अपरिहार्यताच असते.आपल अंग झटकून पुन्हा तेवत राहवचं लागतं. आपल्याला काजळीने वेढलं तर गेलं नाही ना? अंग तर झटकून पाहूया.कालच्या पेक्षा आज अधिक प्रखर तेवायचं आहे ना? आपलं असणं अधिकचं ठळक करूया.              शुभ प्रभात.                                  परशुराम सोंडगे  भेट दया :prshuramsondge.blogspot.com