पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नशिबाचे रडगाणं

इमेज
 माणसांना नशिब नावाचं काही तरी असतं.आपल्या आयुष्यात चांगल वाईट काही घडत असते त्याचे कारण नशिब असतं.आजी सांगायची सटई नावाची कुणी तरी एक दैवशक्ती असते. ती आपलं नशिब आपल्या कपाळावर कोरून जाते.तिनं लिहिलं कुणीचं बदलू शकत नाही. हे पटवून देण्यासाठी ती अनेक गोष्टी सांगत असे.त्या गोष्टी  छान असतं.नेमकं सटईने आपल्या कपाळावर काय लिहून ठेवलं आहे हे आरश्यात आम्ही कपाळ न्याहाळत बसतं असतं.नशिबाचे शिलालेख वाचण्यासाठी धडपडत असतं. माणसांना ते दिसतं नाही.               नशिब सा-यांनाच असतं.ते मागील जन्माच्या तुमच्या पाप पुण्यावर ते अंवलंबून असतं.त्याला प्रारब्ध असं ही म्हणतात.प्रारब्ध बदलता येत नाही. पुढे काय घडणार आहे याचा एक प्लॅनच तयार असतो.ज्योतिषशास्त्र याचं गोष्टीवर अवलंबून असतं.थोडक्यात ज्योतिषी तो प्लॅन समजून घेतात. लोकांना सांगतात.आपलं पोट भरून घेतात.तुमचा विश्वास आहे या गोष्टींवर ? तुम्ही विश्वास ठेवा अथवा न ठेवता हे घडतं असतं.जे मी घडतं असतं ते माणसाच्या हातात नसतं.भुतकाळ आता लिहून ठेवता येतो. त्यालाचं आपण इतिहास म्हणतो.आठवणींच्या रूपात तो मनात साठवू...

भावनांचा बाजार

इमेज
 ||आपलाच संवाद आपुल्याशी| आंनद असो की दु:ख.माणसाला व्यक्त व्हायचं असतं.राग तर अनावरणचं असतो.ठरवून ही तो आवरता येत नाही.कुणाचा मत्सर तुम्ही झाकून नाही ठेवू शकत. एखाद्यावर तुमचं प्रेम बसलं तर चेहरा प्रेम रंगात चिंब होऊन जातो.तुम्ही एखाद्या प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रियेशीचा चेहरा पाहिला आहे का?प्रेम रंगाचा उत्सव असतो तिच्या चेह-यावर.सृष्टी पण  ऋतू टाळू शकत नाहीत. पानगळीच्या शिशिर असो असो की अंग अंग पल्लवित करणारा वसंत असो.ऋतू सोसणं ही आलं आणि मिरवण ही आलं. भावभावनांचे तरंग मनात उठले की ते चेह-यावर उमटतं जातात.चेहरा एलडीच्या स्क्रीन सारखा असेल का?कळत नकळत भावरंग आणि भावरेषा  चेह-यावर उमटतं राहतात.काही गडद काही पुसटं.....  भावचित्राचं विलोभनीय प्रदर्शनच असतं चेह-यावर. माणसं फार चतुर तरी काही भावना लपवून ठेवतातच.मनात कोंडुन ठेवतात भावनांना.अवखळ जनावर कोंडून ठेवावे कोंडवाडयात तश्या कोंडतात मनात.भावना ही  उलगडून दाखवण्यासाठी खास असं आपलं माणूस असावं लागतं.डोळयातील आश्रूचे ही तसचं आहे.त्यांना सुध्दा हक्काचं माणूस असावं लागतं ओघळण्यासाठी.आपल्या हक्काचं माणूस समोर असलं की...

आनंदाचे गाणे - कष्टाचे तराणे

इमेज
गेल्या दोन आठवाडयापुर्वी एक रील्स प्रचंड व्हायरल झाली.एक ऊसतोड कामगांर असलेल्या कपल्सची ती रिल्स होती.भर रस्त्यावर ऊसाच्या गाडीवर ती शूटं केली होती.ओठावरलं गाणं आणि गोड हास्यात चिंबलेले त्यांचे चेहरे.... महाराष्ट्राला फार काही सांगून गेले. त्यांच्या चेह-या वरील हसू अनेकांना अप्रुप वाटलं.अप्रूप  वाटणारचं ना?काम करताना रडगाणे आणि ग-हाणे गाणारांना तर ते आश्चर्यचं होतं. अरे,असं हासतं हासत काम करता येऊ शकतं? वेतन आयोग,भत्ते ,सवलती आणि मोठं मोठे पॅकेज देऊन ही  हे  हसू आणि गाणं आपणं  कर्मचा-यांच्या ओठांवर नाही आणू शकत.    कामातला आंनद आपण हिरावून बसलो की तेचं काम सक्त मजुरी वाटू लागते.मजबूरी आपल्याला  गाणं नाही तर रडगाणे देते.रडगाणे ऐकायला कुणालाच आवडतं नाही.       रिल्सं  व्हायरल करण्यासाठी शार्ट कपडे घालून प्रसिद्ध रील्स स्टार असलेल्या परपुरूषाच्या  मिठीत शिरणा-या लोंचट स्त्रिया काही कमी नाहीत.प्रसिध्दीचा हव्यास व लोचटपणाशिवाय त्यांच्या मेकअप चोपाडलेल्या चेह-यावर तुम्हाला दुसरं काय दिसलं? आपल्याचं कुंकवाच्या धन्यासोबत आपल्या फाटक्या...