पोस्ट्स

ऑगस्ट, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मैत्र जीवाचे- विणवूया धागे धागे

इमेज
 माणसाच्या आयुष्यात मैत्रीला फार महत्व असतं.वंशाच्या,कुळाच्या,गावा -शिवाच्या,रक्ताच्या,नात्यापेक्षा ही मैत्रीचं नातं फार महत्वाचं असतं.ऐश्वर्य आणि दारिद्रय, सौंदर्य-कुरूपता, बुध्दी आणि मंद बुध्दी,जाती-पाती,धर्म ,देश- परदेश ,वय  लिंग वगैरे हे असले कृत्रिम भेद झुगारून ख-या  मैत्रीचे धागे अधिक घट्ट होत जातात.हया भेदाच्या सीमा मैत्रीला अडवू नाही शकतं. मैत्रीचे धागे आपल्या मतलबाच्या चिकट लगदाळीने  गुंफणारी माणसं ही कमी नसतात.अगदीच नाही असे नाही.ह्रदयातून निखळ मैत्रीचे झरे ही खळखळत असतातच की. आपल्या स्वार्थासाठी माणसं वापरण्याची वेगळीच पंरपरा हल्ली  समाजात निर्माण झाली आहे.मैत्रीच्या बेगडात स्वार्थाचा चेहरा दडवणारे माणसं  ही कमी नाहीत.मैत्री ही  एखादा व्यवहार नसते. ती कुठे हिशोब ठेवते? निखळ,जीवापाड मैत्र जपणारं कुणीतरी असावे असं सर्वांनाचं वाटतं असतं.तशी आपली सर्वांची एक फॅंटन्सी ही असतेच की. मैत्र जीवाचे शोधत आपण जगत असतो. जगभर वणवण भटकत असतो. ज्याच्या जवळ आपलं ह्रदय उलगडून दाखवावं अशी माणसं कमी भेटतात.ते विरळचं असतात. जे भेटले ते प्रामाणिक असतातचं असं नाही...

निसर्गाचं वेड पेरणारा कवी-ना.धो.महानोर

इमेज
  मनामनात झरणारा हिरवा ऋतू.....ना.धो.महानोर काही माणसं आपल्याला भेटलेली नसतात.पाहिलेली ही नसतात तरी ते काळजात खोल तळाशी कुठतरी रुतलेली असतात. नकळत रुजलेली असतात.त्यांच आपलं एक अनोखं नातं नकळतं तयार होतं.त्या नात्याला आपण नावं नाही देऊ शकतं पण ते असतं  उत्कटं आणि ओतप्रोत प्रेमात चिंबलेले...आपल्या मनाशी  घट्ट गुंफले गेलेले. नात्यांच्या कृत्रिम फ्रेम मध्ये आपण त्याला बंदिस्त नाही करू शकतं. फ्रेमचं नाही करू शकलो की त्याचा शो पीसं करणं तर अशक्यच असतं.तसंच एक नावं आहे.ना.धो.महानोर.मनाच्या तळाशी एक अनोखं नातं कोरले गेलेले. कविता गाणी वाचू लागलो.गुणगुणू लागलो तसं ना.धो.महानोर मनात ठसतं गेले.शाळेतल्या पुस्तकातील कवितेतून ते सर्व प्रथम भेटतं गेले.निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य ते उलगडत गेले.सौंदर्याचे पण पदर असतात का? अलवार ते फेडतं गेले की रूपाचं चांदणं पसरतं जाणारे? महानोरच्या  शब्दांनी भारावून टाकलं होतं आमचं तारूण्यं... रान,शिवाराचं अनोख वेडं ते माणसाच्या मनात पेरतं गेले. निसर्ग आणि सौंदर्य.सौंदर्य आणि प्रेम याचं एक नाजुक बंध असतात.मनात आपसुकचं विणले गेलेले.आभाळ दाटून आलं की मन...