पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बापू..!!! तू काही मरत नाहीस.

इमेज
  तू या देशाचा राष्ट्रपिता पण एखादया जातीच्या झुंडीला, एखादया धर्माच्या टोळीला, एखादया वर्णाच्या कळपा ला, एखादया मुलखाला तूर्त तरी फक्त त्यांचा वाटत नाहीस. म्हणून तर  तू  या संपूर्ण देशाचा आहेस. तुझ्यावर त्यांनी गोळ्या झाडल्या पण तू  ठार नाही झालास, वेडे कुठले.....!! तू माणूस नाहीतर विचार आहेस. हे तर अजूनही कळतं नाही त्यांना. तू  मात्र इथं मातीच्या कणाकणात मनात मनात रूजत गेलास. म्हणून त्यांनी तुझ्या मारेक-याचे गौरव सुरू केले. आणि पोवाडे लिहिले. तुला रोज मारण्याचा चंग बांधला आहे त्यांनी पण तू अशानं काही मरत नाहीस. तू  अजून ही अमर होतो आहेस. छाताडं किती ही  इंचाची असू दे. ते फुटूस्तोवर  फुगू दे. पण सदैव या जगात हा देश गांधीचा आहे नि गांधीचाच राहणार आहे. आणि तू अमरचं....!!!     परशुराम सोंडगे,पाटोदा