भिमा,तू असा सूर्य आहेस .
.jpeg)
भिमा तू, एक असा सूर्य आहेस की मावळलास किती वर्ष झाले तरी अजून ही तुझा तो प्रकाश तसाच आहे. प्रखर होत गिळतोच आहे अंधार... ती आग .... अधिकचं तीव्र होतेयं. युगानुयुगे तू तसाच तेवत राहणार आहेस कारण अंधाराच्या गर्भातच पेरलीस तू प्रकाशाची बीज. ही पहा ना... फुललेली असंख्य फुले प्रकशाची. अंधार तर संपेलच ना आता एक दिवस... आमच्या जीवनातला या जगातला ..... परशुराम सोंडगे,बीड .