पोस्ट्स

जानेवारी, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ऐ,प्रभू,तूझं आम्ही मंदिर बांधलयं.

इमेज
  तू देव आहेस तू परमात्मा आहेस आम्ही जीवात्मा.... तूच हे सर्व तूच आहेस ना रे सर्वत्र? तू चराचरात ओतप्रोत भरलेला... इथल्या कणाकणात सामावलेला... पेशीपेशीत तू पेशी द्रव्याच्या अणू रेणूत ही... काय? भक्तांच्या ह्रदयात श्वासात तुच असतोस मग हे मंदिर आम्ही कशाला बांधलंय? असं का विचारतोस? पाचशे वर्ष झालयं तुझं मंदिर आम्ही बांधू शकलो नाहीत. ऊन,वारा,पाऊस,वादळ... सारं तू सोसत आलास तक्रार नाही केलीस कधी तू. आम्ही टोलेदार बंगल्यात राहीलो. एसीत रूम मध्ये राहिलो पण तुला मंदिर नाही ही खंत होतीचं की सदैव. तू परामात्मा असला म्हणून काय झालं? तुला  मी मंदिर पाहिजे ना. गावागावात, गल्लोगल्ली,घराघरात तुझं मंदिरे आहेतच ना. देवा-हयावर ही तू असतोस पण अयोध्येत मंदिर पाहिजेचं होत तुझं. आता आम्ही एक तुझं भव्य मंदिर बांधलंय. सोहळा साजरा करतोय आम्ही भव्यदिव्य....जबरदस्त. एकदम शाहीथाटात. काय म्हणालास? देह हेच मंदिर असतं तुझं..! हो मान्य की, पण तुझं मंदिर तुला हवं की नाही पण ते आम्हाला हवं असतं. भक्तीभावांन माथा टेकायला कधी लोकांची माथी भडकायला तू हवाच असतोस ना आम्हाला हिंदूत्वाची आग पेटायला. हे जग पण पेटतं रा...
इमेज
 नविन वर्षाच्या शुभेच्छा......!!! आज नवीन वर्षाचा पहिला दिवस.रात्री वर्ष २०२३ गेलं.वर्ष २०२४ आलं.बाय बाय २०२३  व वेलकम २०२४.. रात्री बारा वाजता घसाफोड ही झाली.नाचून झाल.गाऊन झालं. जग कैफात बुडालं.  भिंतीवरलं एक कॅलेंडर गेलं नि नवीन कोर करकरीत कॅलेंडर आलं. बस्सं एवढच घडलं. उगवणारा सूर्य तोच असत़ो.त्यातून प्रसवणारा  प्रकाश ही तोच असतो.पृथ्वीच्या परिवलन व भ्रमणगतीत काहीचं फरक पडतं नसतो.सर्व भवताल जसा सदैव असतो तसाच असतो.फक्त नव्याचा भास असत़ो. प्राणी पक्षी कीटक यांना नविन वर्षांचं भान नसतं.माणसाला मात्र २०२३ सरलं म्हणून दु:ख होतं.वर्ष २०२४ आलं म्हणून आंनदी ही होतो.काळ तशी मानवी कल्पनाचं. माणसांन त्याला ही आकार दिला.उकार दिला.आपला सखा-सखी करून माणूस त्याच्या प्रेमात ही पडला. नविन  सालकडून तर किती अपेक्षा....!! निरपेक्ष प्रेम हल्ली कुठं राहिलंय? सारं शुभ मंगलच घडावं अशी अपेक्षा.अशुभ आमच्या ओंजळीत टाकू नको रे बाबा...!! खरंतर अनंत ब्रम्हाडांत दिवस उगवत नाही.दिवस मावळत नाही.काळाच्या अनंत रेषेवर ब्रम्हांड सरकते आहे.असेच सरकत राहणार आहे अनंत काल.      आपल्य...