अंनतरावांच प्री-विडींग आणि आमचा रम्या

अंनतरावचं प्रि- विडींग आणि आमचा रम्या त्या अंबानींच्या पोटयाचं प्रि-विडींग लयईचं गाजलं.नट नि बीटं ,नट्या न् बिटया...सा-या जगातलं टाॅपची सेलेब्रिटी तिथं आल्ते जणू. आपल्याला काय आमंत्रण बिमंत्रण नव्हतं.असल्या एकदम मोठ्या लोकांच्या लग्नात गावोगावी पंक्ती उठाया पाहिजेत. अन्न दान करायला पाहिजे.उग म्या आपली आपेक्षा केली. तसल्या झंझटीत तसली मोठी लोकं कशाला पडतेलं? काही का असेना मला मात्र मेरा देश महानच्या खळाखळा उकळया फुटल्या हायती. त्याचं कारण मी तसंच हाय. हे अंनतरावाचं प्री -विडींग सइम्पलं प्रोग्रॅम नाय.त्या प्रोग्रामनं देशाचं नाक भलं मोठं उंचावलयं. हलक्यात घेऊ नका. आपल्या देशास कमी समजण्याची टाप कुणी करायचं नाय.त्या भिकारडया पाकिस्तानात तर असं ग्रेट लगन पण कधी झालं असलं का? कवा होईल का? प्री-विडिंग तर सोडाचं. म्या तर नुसते ह्या प्रोग्रमचं फोटू पाकिस्तान्यांना टॅग करणार हाय. एक हजार कोटी का काय? नुसता खर्च झालाय जणू. या प्री-विडींगचा.जोक हाय काय? बजेट नसेल पाकडयांच इतकं. मला लग्नात जायला भेटलं नाय म...