पोस्ट्स

डिसेंबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अटलजी: एक संवेदनशील कवी

इमेज
  Member of Parliament    # prime minister of India   Lok Sabha . Bajpai . भारतीय राजकारणातील कुशल नेता अटल बिहारी वाजपेयी हे केवळ एक राजकीय व्यक्तिमत्त्व नव्हते, तर एक संवेदनशील कवी होते, ज्यांच्या कवितांनी मानवतेचा, देशभक्तीचा आणि जीवनाच्या विविध पैलूंचा उदात्त स्वर व्यक्त केला. त्यांचे साहित्यिक मन त्यांच्या प्रत्येक कृतीत आणि निर्णयांत दिसून येत असे. अटलजींच्या कवितांनी केवळ राजकीय विचारसरणी व्यक्त केली नाही, तर त्या समाजाच्या गाभ्याला भिडल्या, विशेषतः भारतीय शेतकऱ्यांच्या जीवनाशी. अटलजींच्या कवितांमध्ये जीवनाचे तत्वज्ञान, संघर्ष, आणि प्रेरणा यांचा मिलाफ दिसतो. त्यांची कविता "हार नहीं मानूंगा, रार नहीं ठानूंगा" ही केवळ त्यांच्या जिद्दीची अभिव्यक्ती नव्हे, तर देशवासीयांना दिलेला आत्मविश्वासाचा संदेश आहे.           त्यांच्या कवितांमध्ये मानवी भावना, सामाजिक स्थिती, आणि देशाच्या समस्यांवर एक हळवा दृष्टिकोन दिसतो. त्यांनी शब्दांमध्ये संघर्ष व्यक्त केला, पण कधीही निराशा झळकू दिली नाही. त्यांच्या प्रत्येक ओळीत सकारात्मकता आणि आशेचा संवाद असे...

तुमचा गाल आमची थप्पडं

इमेज
 तुमचा गाल आमची थप्पडं मी काॅलेजला असताना एक एकांकीका पहिली होती.पूर्वी एकांकिकाचे टायटल फार भन्नाट असतं.सोशल मिडीया नव्हती तेव्हा नाहीतर एका एका टायटेलनं तुफान राडा केला असता  सोशल मिडीयावर....!!  'तुमचा गालं..!!, आमची थप्पड..!!" अशी भन्नाट  टायटल असलेली सामाजिक  व राजकारणावर भाष्य करू शकेल अशी  एकांकिका एका स्पर्धेत  पाहण्यात आली होती. एका सामान्य नागरिकाची कशी ससेहोलपट केली जाते या व्यवस्थेमध्ये याची काही प्रसंग मोठ्या कौशल्याने त्या एकांकिकेत गुंफले होते. आम आदमीची प्रत्येक वेळेला कशी  प्रत्येक टप्प्यावर हारेशमेन्ट केली जाते हे दाखवण्याचा अफलातून  प्रयत्न त्यात केला होता. या व्यवस्थेचे आणि तुमचं नात काय ?, तुमचा गाल आणि आमची थप्पड..!! तुम्ही फक्त  मुकाटयाने गाल पुढे करा....आम्ही एक थप्पड  लावतो. थप्पड लगावण्यात एक प्रकारचा परमानंद असतो.हा आंनद दुस-याला देताना तुम्ही तक्रार करू नका.हसू नका पण सोसा.रडू नका फक्त कण्हा. तुमच्या गालात जर कुणी जोरात थप्पडं मारली तर तुम्ही काय कराल? आपल्या चिंतनशीलतेला भरपूर वाव देणारा हा प्रश्न आहे. ए...

आपण सारे पागल ठरतो तेव्हा...!!!

इमेज
संसद हे आपलं सर्वोच्च सभागृह आहे.भारतात  संसदेपेक्षा सर्वोच्च असं काही  ही नाही.असं मी नागरिक शास्त्राच्या पुस्तकात शिकलेलो आहे. नागरिकशास्त्र शिकवणारे आमचे शिक्षक भारी शिस्तीचे होते.ते आमचे हात फोडून काढत पण नागरिकाची सनद ,कर्तव्य व अधिकार असल्या गोष्टी पाठचं करून घेत असतं. एखादा अधिकार आपण त्यांना  सांगितला की ते त्याचं कर्तव्यं विचारतं त्यांच म्हणणं स्पष्ट  असे अधिकार आणि कर्तव्य  हया नाण्याच्या दोन बाजू आहेत.नागरिक आपले अधिकार  मागतात पण कर्तव्य मात्र जाणूनबुजून विसरतात.सुजाण  नागरिक  तोच जे कर्तव्य  विसरत नाही.                            आम्हास कर्तव्य  सांगता नाही आले की ते चड्डी ओली होई पर्यंत बेजरब मारत असतं.त्यावेळी  सुजाण आणि सजग पालकांच्या टोळया नसतं.त्यामुळे शिक्षकांना आवरायला कुणी नसे.शिक्षणात ही आंनदायी शिक्षण हा प्रकार  तेव्हा सुरू झालेला नव्हता. जेव्हा मी इतिहासात हिटलर नाव ऐकलं तेव्हा पासून मी त्या सरांना हिटलर समजत असे. ते हिटलर सारखचं वागतं...

ग्रेटभेटः सुधीर रसाळ आणि साहित्य अकादमी पुरस्कार

इमेज
 ग्रेटभेटः सुधीर रसाळ आणि साहित्य अकादमी पुरस्कार   पुरस्कार राव, हे लयं भारी झालयं बघ.गुरूवर्य  सुधीर रसाळला सरांना तू एकदाचं कसतरी गाठलंस. यार,तू लयचं लेट केलसं. जाऊ दे ते. लेट पण थेट भेटलास. हल्ली तू पण हॅक झाल्यासारखा वागतोस.चांगली  चांगली ग्रेट माणसं तुला भेटतच नाहीत बुवा. उगीच आपलं कुणाच्या भी गळयात पडतो. ग्रेट माणसाला तू शोधलं पाहिजे.तुझं भी इम्प्रेशन डाऊन नाही झालं पाहिजे ना? काय म्हणतोयस ?गर्दीच लय झालीय..!!  तुझं भी खरं म्हणा.तू तरी काय करणार? काही माणसांनी तुलाचं कॅपचर करून टाकलयं! त्यामुळे तुझा भी नाईलाजच असतो म्हणा. तू तरी काय करणार? आता खारमुरे वाटाव्यात तसचं तुला कुणाच्या गळयात बांधतात म्हणल्यावर गर्दी तर होणारचं ना? देतेत म्हणल्यावर घेणारे येणारच ना? रेवडी पहिलवानाला काय कमी असते?ते तर कवा भी लंगोट बांधून उभीच  असत्यात की. क्काय..? हौसे नवसे गवसे सारेचं येणार ना? पण पुरस्कारराव, प्राॅब्लेम काय होतोय. गुरूवर्य रसाळ सारखी ग्रेट माणसं गर्दी कसली घुसतेत? ते तिकडं फिरकत भी नसतेत.त्यांच काय आडलं तुझ्या वाचून? त्यांना तुला गळयात घालून तरी फिरायची थ...

पुष्पा-2:- राडाच पण हवाहवासा..!!

इमेज
पुष्पा-02:- एक हवाहवसा राडा..!! 'पुष्पा-02 तुम्ही  पाहिला का?' हा प्रश्न सध्या जनरली तुम्हाला कुणी ही कुठं ही विचारू शकतं.तुम्ही शाॅकेब्लस् व्हायचं नाही.साधा पिक्चर  आहे तो ..!!  नाही पाहिला तर नाही पाहिला त्यात काय एवढं? असं तर बिलकुल म्हणायचं नाही.मग 'पुष्पा-01चांगला होता की पुष्पा-02 ?' ओटीवर पाहिला की थेटरात?अशी अनेक प्रश्न तुम्हाला विचारली जाणार मग या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय देणार? आहे की नाही पंचाईत? पुष्पा-02  न पहाणं म्हणजे दिवाळीच्या सणाला लाडू न केल्यासारखं आहे.गटारी साजरी न केल्यासारखा कमी पणा आहे. अजून यांनी पुष्पा -2 नाही पाहिला रे.बिच्चारा...!! तुमची अशी कुणी कीव ही करू शकतं. तुम्ही चहा पितात,नास्ता करता,सिगारेट  ओढता ,जेवण  करता,पानं खाता आणि पुष्पा- 2 पाहत नाही? का पहात नाही तो? छे..छे..!! तुम्ही एक भयंकर चूक करत आहात. पुष्पा-2 पहाणं फार अपरिहार्य  करण्यात आलेलं आहे.कुणी केलेयं इतकं अपरिहार्य..?? तुम्ही  मला केलं.मी तुम्हाला केलं.आपणचं आपल्याला. पुष्पा-2 ने तुफान राडा केला बाॅक्स  ऑफिसवर...!! त्या राडा करणा-या गर्...