गुंतता ह्रदथ हे..!! भाग 5

भाग 5 तृप्ती हो ना?रात्रं झालीय.” त्याचं लक्षं नव्हतं तिच्याकडं.तृप्ती फ्रेश झाली होती.तिनं कपडे ही चेंज केलं. निलेशचं चित्तं कुठं जाग्यावर होतं? रेवाच्या अनेक छबी त्याच्या डोळया समोरून हालत नव्हत्या. खरतर त्याला यातलं काहीचं आठवायचं नव्हतं पण आठवणीची पण उबळ असेल न थोपवता येणारी.आठवणीची मळमळ त्याला सहन होत नव्हती.माणूस त्या उपसून नाही टाकू शकतं. रेवाची अनेक वर्षची रूप त्याच्या डोळयासमोर उभी राहिली. हासरी ,लाजरी,भित्री,रागातली,प्रणयातूर,लटक्यारागतली व संतृप्तं.अश्या अनेक भाव मुद्रा तिच्या निलेशच्या मनावर उमटतं. काही क्षण त्याला वेडावत नि अदृश्य होतं. रेवा अशी आज नको होती भेटायला. आपल्याला हवं तसचं सारं नाही होऊ शकतं. ती अचानक भेटली. भेटली तर भेटली पण तृप्ती सोबत असताना तरी नको होती भेटायाला.तिला असं काहीच बोलता आलं नाही.तिच्या डोळयात ही पहाता आलं नाही. डोळ तरी कसं वाचणार? खर तर ती पाहील्यानंतर सुरवातीला प्रचंड भिती वाटली. रेवा येऊन जर काही बोललं तर तृप्त...